Saturday, April 29, 2017

*असे का ?*

जो प्रामाणिकपणे काम करतो
त्यालाही नाव ठेवतातच
 त्याच्या उणिवा शोधून काढून
 त्याला दुखावत असतात
*असे का ?*

जो काहीच करत नाही
इकडचे तिकडचे करत
 असतो
तोंड चोपडेपणा करत
 बसतो
तो बरा म्हटला जातो
*असे का ?*

जो हजर नसतो
मात्र उपदेशाचे डोस
हजर वाल्यांना पाजले
 जातात
*असे का ?*

देणारे देत असतात
घेणारे घेत असतात
बोंबाबोंब दुसरेच
करणारे असतात
*असे का ?*

सर्वांना दिसते
सर्वांना समजते
समजून उमजून सुध्दा
गप्प सर्वजण बसतात
*असे का ?*

जबाबदारी स्विकारून
तळमळीने काम करून
कामात व्यस्त राहून
त्याच्याच मागे जास्त
ससेमिरा राहतो
*असे का ?*

जो करतो
तोच मरतो
त्यालाच संघर्षाला
सामोरे जावे लागते
*असे का ?*

तोंड दाबून बुक्क्याचा मार
बळी तो कान पिळी
नको कटकट म्हणून
गुपचूप जावून मिळी
*असे का ?*

कितीही कमवा
कितीही करा
तरी मेल्यावर
सोबत काहीही
नेत नाही
*असे का ?*
-------------------------------
*रचना* ✍🏻 *शांतीसुत*
         *पी .टी. पाटील.*
                   *जामनेर*
🙏🏻🙏🏻✍🏻💐💐✍🏻🙏🏻🙏🏻

Wednesday, April 26, 2017

Watts app group link

          ❣💫❣💫❣💫❣💫❣💫❣                                                       1,विचारमंथन ~1
https://chat.whatsapp.com/43CeNnzWLXc2sDezNWxGSc
2,विचारमंथन ~2
https://chat.whatsapp.com/0JBwgNorYx3JZ5gfdMNCHy
3,आठवणीतील कविता ~1
https://chat.whatsapp.com/IzV6KsfhaMgHyk7aqjIGvD
4,आठवणीतील कविता ~2
https://chat.whatsapp.com/LY9JdRCaw6F3Ux1C0dObmI
5,माझी शाळा माझे उपक्रम ~2
https://chat.whatsapp.com/4yCebHs8FSe0PR0aWSbKA2
6,माझी शाळा माझे उपक्रम ~1
https://chat.whatsapp.com/JiS6awU4p3NHNlS03PL9Nw
 7,वाचन प्रेमी ~ 1
https://chat.whatsapp.com/48U8zGWa9gqAMO3shPasFQ
8,वाचन प्रेमी ~2
https://chat.whatsapp.com/AZ7ZtPbNyOKI2wg9qFfZys
9,हास्य कट्टा
https://chat.whatsapp.com/2RWrwrWXMJcA58EQlyjhwN
❣💫❣💫❣💫❣💫❣💫❣                     समूह प्रशासक ~ विजय चौधरी भुसावळ
🎯✏📚🎥🔈🎧🎼🎞        

Saturday, April 22, 2017

महागाई भत्ता गणक

📟 *महागाई भत्ता गणक*📱

🎯 *१ जुलै २०१६ पासून महागाई भत्ता १२५ % वरून १३२% झाली आहे*

🎯आपला वाढलेला महागाई भत्ता बघण्यासाठी खालील लिंक वापरून चेक करू शकता*

http://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=22438

Saturday, April 15, 2017

आज गझलसम्राट माननीय श्री.सुरेश भट यांची जयंती.या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून मी संकलीत केलेले मराठी वर्णमालेतील ‘अ’ ते ‘ज्ञ’ पर्यंतच्या सर्व अक्षरांनी* सुरु होणारे त्यांच्या  गझला, कविता या मधील काही निवडक शेर, आज खाली देत आहे..( *काही अक्षरांचा अपवाद वगळता)

(हे संकलन पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या सर्व मित्रांचे आभार).

-- देवदत्त संगेप

 (अ)
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?...सुरेश भट.
*
(आ)
आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली...सुरेश भट.
*
(इ)
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते....सुरेश भट.
*
(ई)
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?...सुरेश भट
*
(उ)
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली....सुरेश भट.
*
(ऊ)…

(ए)
एक मी निःशब्द किंकाळीच होतो
ऐकण्यासाठी सुना बाजार होता ….सुरेश भट.
*
(ऐ)
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले...सुरेश भट.
*
(ओ)
ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो...सुरेश भट.
*

(औ)...
(अं)...
(अ:)...
**

(क)
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली....सुरेश भट.
*
(ख)
खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?....सुरेश भट.
*
(ग)
‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’...सुरेश भट.
*
(घ)
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते...सुरेश भट.
*
(च)
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!.....सुरेश भट.
*
(छ)
छाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाट्यांचे करावे?..... सुरेश भट.
(credit : Shiv Doijode)

(ज)
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’....सुरेश भट.
*
(झ)
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!....सुरेश भट.
*
(ट)
टाकली हातातली मी सर्व पाने
कोण,जाणे,हारलो की जिकलो मी...सुरेश भट.
(credit: चंद्रशेखर राजपूत)

(ठ)
ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना...सुरेश भट.
( credit : निलेश कवडे)
*
(ड)...
(ढ)...

(त)
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही....सुरेश भट.
*
(थ)
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्या  कसलीच खंत नाही....सुरेश भट.
*
(द)
दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता....सुरेश भट.
(credit : Sureshkumar Vairalkarr)
*
(ध)
धन्य ही श्रद्धांजली जी वाहिली मारेक~यांनी,
संत हो आता बळीचा न्यायनिर्वाळा कशाला ?.....सुरेश भट.

(न)
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा....सुरेश भट.
*
(प)
पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!....सुरेश भट.
*
(फ)
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते....सुरेश भट.
*
(ब)
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!...सुरेश भट.
*
(भ)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एव्हढे मी भोगिले की मज हसावे लागले ...सुरेश भट.
(credit : मंजुषा हेलवाडे पवार )
*
(म)
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !...सुरेश भट.
*
(य)
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते...सुरेश भट.
*
(र)
रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे...सुरेश भट.
*
(ल)
लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा....सुरेश भट.
*
(व)
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?...सुरेश भट.
*
(श)
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही....सुरेश भट.
*
(स)
सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती....सुरेश भट
*

(ह)
हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा....सुरेश भट.
*
(क्ष)…
(ज्ञ)
ज्ञानदेव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी....सुरेश भट.
(credit::Sudhakar Kadam)
**
या महान गझलसम्राटाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

Wednesday, April 5, 2017

कुठलेही पाठ्यपुस्तक pdf स्वरुपात download करण्यासाठी या link वर click करा http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx