Tuesday, January 30, 2018

६० दिवसांत इंग्रजी वाचन 36

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*छत्तिसावा◀*
        
       *oचा उच्चार आॅ*

👉 आजचे शब्द
1)pond        11)spot       21)doff
2)pour         12)stop     22)flog
3)roar          13)tore      23)flop
4)rock         14)torn      24)honk
5)shop        15)toss      25)loft
6)shot        16)upon       26)loss
7)sock       17)worn       27)pomp
8)soft         18)bond       28)posh
9)soil         19)boss      29)prod
10)song      20)chop      30)prop

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  loss या शब्दामध्ये lo चा एक व ss चा दुसरा   गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
loss मध्ये lo चा लाॅ व ss चा स  म्हणजे लाॅस

    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  bond- बाॅन्ड
       
?񲰽񲰠*आजचा स्वाध्याय* *?🖋🖋आजचा स्वाध्याय🖋🖋*
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

Monday, January 29, 2018

*६० दिवसांत इंग्रजी वाचन*

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*पस्तिसावा◀*
        
       *oचा उच्चार आॅ*

👉 आजचे शब्द
1)con        11)sob       21)frog
2)cop        12)body     22)from
3)fog         13)cock      23)horn
4)hog        14)copy      24)join
5)lop         15)corn      25)knot
6)mob      16)cost       26)long
7)mop      17)crop       27)lost
8)rob        18)doll       28)onto
9)rod       19)drop      29)plod
10)rot       20)form      30)fort

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  plod या शब्दामध्ये plo चा एक व d चा दुसरा   गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
plod मध्ये plo चा प्लाॅ व p चा ड  म्हणजे प्लाॅड



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  copy - काॅपि
       
?🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

*६० दिवसांत इंग्रजी वाचन*

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*चौतिसावा◀*
        
       *oचा उच्चार आॅ*

👉 आजपासुन आपण o चा उच्चार आॅ असणारे शब्द पाहणार आहोत.
दोन व्यंजनामध्ये o हा  स्वर आल्यास व दुसर्‍या व्यंजनानंतर e  हा स्वर नसल्यास व  बय्राचदा o चा उच्चार आॅ होतो.

👉 आजचे शब्द
1)of        11)god     21)odd
2)on       12)got      22)off
3)or        13)hop      23)oil
4)ox       14)hot      24)pop
5)box     15)job    25)pot
6)boy     16)joy     26)top
7)cot       17)log       27)toy
8)dot      18)lot     28)bog
9)for      19)nor     29)cod
10)fox    20)not     30)cog

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  top या शब्दामध्ये to चा एक व p चा दुसरा   गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
top मध्ये to चा टाॅ व p चा प  म्हणजे टाॅप



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  oil - आॅइल
       
?
🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

Friday, January 26, 2018

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
 *तेहतिसावा◀*
       
       *iचा उच्चार अ*

👉 आज आपण i चा उच्चार अ असणारे शब्द पाहणार आहोत.
i या स्वरानंतर r हे व्यंजन आल्यास व नंतर इतर व्यंजन आल्यास बय्राचदा i चा उच्चार अ होतो.

👉 आजचे शब्द
1)irk    11)devil   21)circle
2)sir   12)dirty    22)circus
3)bird    13)first    23)birthday
4)dirt     14)mirth    24)swirl
5)evil   15)shirk   25)twirl
6)girl    16)shirt    26)whirl
7)firm    17)shirk     27)squirl
8)stir     18)third    28)shirker
 9)birth   19)skirt  
10)chirp 20)family  



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.


👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  first या शब्दामध्ये fi चा एक व rst चा दुसरा   गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
first मध्ये fi चा फ व rst चा र्स्ट  म्हणजे फर्स्ट





   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  family - फॅमलि
       
?

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

Wednesday, January 24, 2018

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-बत्तीसावा*◀
       
       *iचा उच्चार आइ*



👉 आजचे शब्द
1)tiger    11)shine   21)pineapple
2)tight   12)smile    22)science
3)tired    13)trike     23)stripe
4)title     14)blind     24)surprise
5)twice   15)decide   25)variety
6)while    16)design     26)arrive
7)bribe    17)mobile    
8)chide    18)write    
9)chime    19)climb  
10)crime  20)silence  



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.


👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  mobile या शब्दामध्ये mo चा एक व bi चा दुसरा  व le चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
mobile मध्ये mo चा मो व bi चा बाइ व le चा ल म्हणजे मोबाइल





   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  silence - साइलेन्स
       
👉 *वेगळे  उच्चार*
ght - ट    nce- न्स

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

Tuesday, January 23, 2018

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-एकतिसावा*◀
       
       *iचा उच्चार आइ*



👉 आजचे शब्द
1)wild    11)rife     21)knife
2)wipe   12)side    22)light
3)wire    13)tile     23)might
4)bile     14)wile     24)night
5)wise   15)wine   25)prize
6)cite    16)alike     26)quite
7)dice   17)alive     27)right
8)dine    18)brite      28)skies
9)dive    19)child    29)slice
10)nice  20)fight    30)slide



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.


👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  alike या शब्दामध्ये a चा एक व li चा दुसरा  व ke चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
alike मध्ये a चा अ व li चा लाइ व ke चा क  म्हणजे अलाइक





   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  prize - प्राइझ
       
👉 *वेगळे  उच्चार*
ght - ट  

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

Monday, January 22, 2018

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-तिसावा*◀
       
       *iचा उच्चार आइ*

आजपासुन आपण i चा उच्चार आइ असणारे शब्द शिकणार आहोत.
यामध्ये बर्‍याचदा i या स्वरानंतर व्यंजन येऊन e हा स्वर येतो तेव्हा i चा उच्चार आइ होतो तर e चा उच्चार अ होतो.

👉 आजचे शब्द
1)site    11)kind     21)ride
2)mine   12)kite    22)ripe
3)nine    13)life     23)rise
4)wine  14)like     24)side
5)bike   15)line   25)sign
6)bite   16)ice      26)size
7)dine   17)mind     27)tile
8)find    18)pile      28)tiny
9)fine    19)pine    29)wide
10)high  20)rice    30)wife



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

🐊
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  bike या शब्दामध्ये bi चा एक व ke चा दुसरा  गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
bike मध्ये bi चा बाइ व keचा क म्हणजे बाइक





   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  pine - पाइन
       
     

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

Sunday, January 21, 2018

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-एकोणतिसावा*◀
       
       *iचा उच्चार इ*

👉 आजचे शब्द
1)finish    11)little     21)pigeon
2)fridge    12)middle  22)pillow
3)ginger  13)minute     23)rabbit
4)giraffe   14)mirror     24)radish
5)inner     15)dimple    25)ribbon
6)insect   16)mister    26)river
7)inside   17)mitten     27)sickle
8)itself     18)nibble   28)window
9)kitten    19)pickle    29)winner
10)listen   20)picnic    30)winter



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *काही वेगळे उच्चार* ie-इ
dge- ज
e-अ
ay- ए

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  mister या शब्दामध्ये mi चा एक व ste चा दुसरा गट व r  चा तिसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
mister मध्ये mi चा मि व steचा स्ट व r चा र म्हणजे मिस्टर


👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये insect या शब्दात ct चा उच्चार क्च


   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. inside - इनसाइड
       
     

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*
✍🏻
*100% मूलभूत वाचन* क्षमता विकास कार्यक्रम राबवण्यासाठी ऊपयुक्त माहिती.

*#वाचणार रे वाचणार १०० %वाचणार #*
 हे आमचे ब्रीद वाक्य

*💫काय करायचे-*
👍
*वाचन विकासाचे टप्पे :*
१)वाचन पूर्वतयारी
२)श्रवण
३)भाषण संभाषण
४)वाचन

🎯 *उपक्रम -*

वाचन पूर्वतयारी -
1) कागद फाडणे
2)कागद चुरगाळणे
3)चिखलाचे गोळे तयार      करणे
4)चालणे
5)उड्या ,लोटांगण
6)खेळ :
     अ)टायर फिरवणे
     ब) सागरगोट्या
     क) काच कवड्या
     ड)जीबल्या
     इ) काचपुरणी
     ई)गोट्या
     फ) आंधळी कोशिंबीर
         इत्यादी
7)इतर कृती :बाटलीला टोपण लावणे, शेंगा फोडणे, डाळ तांदूळ निवडणे इ.
8)वास ,चव, रंग ,स्पर्श, ध्वनी अनुभव
9)जोड्या लावणे
10)चित्रातील मार्ग शोधणे
11) वर्गीकरण करणे, आकृतीबंध

🎯 *श्रवण -*
1)डबीतील विविध वस्तूंचे ध्वनी ऐकवणे
2)प्राणी, पक्षी, वाहणे आवाज ऐकवणे
3)गाणी ,बड्बडगीते, संवाद
4)गोष्टी ऐकवणे, वाचून दाखवणे
5)सहभागी वाचन
6)संवाद , नाटुकले
7)खेळ : कानमंत्र, राजा म्हणतो, चिमणी भुर्रर्रर्र
8)सूचना

🎯 *भाषण संभाषण*
1) ओळख
2)माहिती
3)चित्रवाचन,चित्रवर्णन,चित्रगप्पा
4) गप्पा
5) संवाद ,नाटुकली तयार करणे
6)घटनाक्रम सांगणे
7)गोष्टी
8)कृतियुक्त गाणी
9)खेळ: वन मिनिट शो, हुमान, शब्दभेंड्या, थीम


🎯 *वाचन* -
1) चित्रावरून वाचन
2)चित्रातील वेगळेपणा
3)चित्रगाडी
4)चित्रयुक्त दिशादर्शक    पट्टी
5)चित्रातील वेगळा    ओळखा
6)चित्र साम्यभेद
7)समान अक्षरांच्या जोड्या
8)अक्षरगाडी
9)अक्षरातील वेगळा ओळखा
10)उपस्थिती पत्रक
11)चित्रशब्दकार्ड वाचन
12)शब्दचक्र
13)चित्रवाक्यसाचे
14)अक्षर गटावर वाचन तयार करणे
15)मुळाक्षरे वाचन
16)चौदाखडी वाचन
17) वर्णानुक्रमे शब्द लावणे
18)जोडाक्षर वाचन
19)चित्रमय उतारे
20)शब्द डोंगर
21)आदर्श प्रकट वाचन
 
  सुंदर आणि मनोरंजक वातावरणात ही प्रक्रिया झाली पाहिजे.
 
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
                   चला तर मग सर्व विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहुया. त्यासाठी या माहितीचा आपल्याला निश्चितच फायदा होईल.

🏆"वाचणार रे वाचणार १००% वाचणार"🏆
💎 *एकच ध्यास वाचन विकास*👍🏻

Saturday, January 20, 2018

९९ पर्यंत पाढे तयार करण्याचा मेसेज पाठवा

I didn't know this. It was a good learning for me.

How to write Table of any two digit number? 👇

From  R. K. Malik. Ranchi

For example Table of *87*

First write down *table of 8 than write down table of 7 beside*

  8            7                    87
16         14    (16+1)    174
24         21    (24+2)    261
32         28    (32+2)    348
40         35    (40+3)    435
48         42    (48+4)    522
56         49    (56+4)    609
64         56    (64+5)    696
72         63    (72+6)    783
80         70    (80+7)    870

Now table of 38

  3         8                   38
  6       16   (6+1)      76
  9       24   (9+2)    114
12       32   (12+3)  152
15       40   (15+4)  190
18       48   (18+4)  228
21       56   (21+5)  266
24       64   (24+6)  304
27       72   (27+7)  342
30       80   (30+8)  380
33       88   (33+8)  418
36       96   (36+9)  456

Now table of 92

    9         2                     92
  18         4                  184
  27         6                  276
  36         8                  368
  45       10      (45+1)460
  54       12      (54+1)552
  63       14      (63+1)644
  72       16      (72+1)736
  81       18      (81+1)828
  90       20      (90+2)920
  99       22      (99+1)1012
108       24      (108+2)1104

This way one can make Tables from10 to 99

Share & teach children

This is Vedic Mathematics!!

Tuesday, January 16, 2018

🚺 *दहावीचे वेळापत्रक* 🚺
तारीख वेळ विषय

७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
९ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - हिंदी
११ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इंग्रजी
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - बीजगणित
१६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूमिती
१८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - १
२० मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - २
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - इतिहास
२५ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूगोल

🚺 *बारावीचे वेळापत्रक*🚺
तारीख वेळ विषय

२८ फेब्रु सकाळी ११ ते दुपारी २ इंग्रजी
२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भौतिकशास्त्र
६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - गणित
८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - रसायनशास्त्र
१० मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - जीवशास्त्र
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इतिहास
१७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भूगोल
२० मार्च -११ ते १.३० आयटी (शिक्षणशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १.३० आयटी (ग्रंथलाय व माहितीशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१

  *परिक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्याना, परिक्षेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

🌹😊

Wednesday, January 10, 2018

*चला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीला लागू* 🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥 सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नृत्याविष्कार पाठवीत आहे नक्की बघा आणि मुलांचे आपल्या शाळेसाठी प्रोग्रॅम साठी नृत्य बसवा. 👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾 *https://www.youtube.com/channel/UCl2goxlFKgiGGgkzWnrpI_Q* 👁👁👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/UWNEQ9ghJH4* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/m5opSyt6_Gw* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/2rYewlvro5s* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/DsZ1N4tnPsw* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/Zd-WZr4m06Q* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/VziaW0fQBgM* 👁👁👁👁👁👁👁👁 *नाटक आई विना भिकारी -https://youtu.be/8BXzBMNdLAQ* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/h5HVhr8Xbf0* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/BlyLhLj1L2s* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/UkP_GmiBxV8* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/5rOK9Bkf7Lk* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/DTdzxy8N7eE* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/oRNU8Jj2aqw* 👁👁👁👁👁👁👁👁 *https://youtu.be/KyPaNfjSxEw* 👁👁👁👁👁👁👁👁 Like आणि शेयर करा. त्वरा करा आणि शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम घ्या. सर्वांना शुभेच्या💐💐💐💐💐
माझ्या शाळेतली पोरं ही......

काय सांगु तुम्हा माझ्या शाळेची गोष्टss
मूलभूत वाचन हे लय भारी, मस्त

रमेश , राजु अन् ज्योती सुजाता
लागली शाळेत रमायला
लागली शाळेत रमायला
माझ्या शाळेची पोरं ही sss
लागली खडाखडा वाचायला

कागद मातीचे गोळे हो करता
वास , रंग , चव ध्वनी ओळखता
वर्णन, गप्पा अन् संवादी रमता
लागली गाणी हो गायला
माझ्या शाळेतली पोरं ही......

गप्पा , गाणी अन् शब्दांची कोडी
साम्य भेद अन् चित्रांची गाडी
गटात बसता कृती हो करता
लागली विचार करायला
माझ्या शाळेतली पोरं ही........

शब्दचक्र ही तयार झाली
शाळा साऱ्या कृतींनी सजली
वाचनपाठ हो कराया लागली
सिद्ध ध्येय गाठायला
वाचन उदिष्ट साधायला
माझ्या शाळेची पोरं ही.......

Tuesday, January 9, 2018

कृतीयुक्त गीते--

🌹🖊🕉🇮🇳: कृतीयुक्त गीते--

*१)एक फुगा अहा एक फुगा*

गंम्पू ने आणले साबणाचे फुगे - 2
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे - 2
एक फुगा अहा एक फुगा - 2

एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला
गंम्पूला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले ......

एक फुगा आजीच्या गालावर बसला
गंम्पूला तो लाडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....

एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंम्पूला तो चेंडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....

*संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद*
[🌹🖊🕉🇮🇳:

२)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर

औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
        गुरुजी छडी नका

शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी
आरसा त्याला उलटे करी
     गुरुजी छडी नका मारुजी


संकलक:तोटावाड एस
🌹🖊🕉🇮🇳:

३)उरात होतय धडधड
पाटी पूस्तक हातात आलि
अंगात भरलय वार
शाळेची घंटा झाली
अता अधिर झालोया
मग तयार झालोया
पाटि दप्तर घेवून शाळेत आलोया
वाचतय बूंगाट लिहतय झिंगाट
रंगात आलोया
वाचलय

झिंगझिंग झिंग झिंगाट

झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग

समद्या शाळेला झालि
माझ्या वाचनाचि घाई |२
कधि येणार हो बाई
माला आ ,म्हणजे आई
अता खेळून आलोया
लई वाचून आलोया
दूरून माळा वरून
तूमच्या शाळेत आलोया
ढिंच्याक जोरात
डिजिटल वर्गात
वाचाया आलोया
वाचलय
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग


अता उताविळ झालो
चित्र पाहून रंगलो
श्बद वाचून दंगलो
पट्य्या वाचून हसलो

अता तयार झालोया
तूमच्या वर्गात आलोया

लई खेळून वाचून या वर्गात आलूया

समद्या पोरात म्या लई जोरात वाचून आलोया

वाचल झिंग झिंग झिंगाट ......
...........,झिंग झिंग झिंग।।

🌹🖊🕉🇮🇳: *👩‍⚖👩

४)‍⚖सुंदरा👩‍⚖👩‍⚖*
➖➖➖➖➖➖➖
सुंदरा शाळेला येशील काय

मला शर्ट पण नाही
 मला स्कर्ट पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll 1ll

मला पुस्तक पण नाही
मला दप्तर पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll2ll

मला पेन पण नाही
मला पेंसिल पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll 3ll

तुला शर्ट पण देईल
तुला स्कर्ट पण देईल
तुला पुस्तक पण देईल
तुला दप्तरपण देईल
तुला पेन पण देईल
तुला पेंसिल पण देईल

तु येणार का शाळेला
सुंदरा शाळेला येशील का

मी येणार शाळेला ॥



🌹🖊🕉🇮🇳:
" मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण" घेऊन उत्तम 'सुलभक' म्हणून तयार झालेल्या गुरुजींनी मुलांना शिकवल्यानंतर मुलांमध्ये आत्मविश्‍वास आला आणि...

*"वाचणार रे वाचणार 100% वाचणार"*

हे मुलाच्या बाबतीत साध्य झाल्यामुळे आत्मविश्वास आलेला मुलगा गुरुजींना म्हणतो
*"द्या हो गुरुजी पुस्तक,वाचून दाखवतो खडखडा"* .
 हा आत्मविश्वास मुलाच्या मनात निर्माण झालेला आहे आणि तो या '

 *प्रेरणा गीतातून*  गुरुजींना मुलगा सांगत आहे.

       ५) *प्रेरणा गीत*

*द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून*
*दाखवतो खडखडा*

कागद फाडून चेंडू केले,
वास,रंग,चव ओळखू आले
ध्वनी डबीतील चुकलो नाही
वर्णन, गप्पा, संवाद झाले
अशा 'गुरु'ची वाट झाडतो
हाती घेऊन फडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥१॥

पूर्वी वाचन चुकत होतो,
काना मात्रा हुकत होतो
गुरुजींच्याही 'शाब्बास'किला
नेहमी नेहमी मुकत होतो
कृती करुनी हुशार झालो
भरलाय ज्ञानाचा घडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥2॥

गप्पा,गोष्टी,गाणी,कोडी
साम्य-भेद चित्रांची गाडी
बसल्या बसल्या जोडू शकतो
समान अक्षरांची जोडी
'व' चे शब्द सांगू का मी?
लिहा फळ्यावर 'वडा'
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥३॥

'वाचन पाठ' मी वाचू शकतो
गाणी म्हणत नाचू शकतो
वाचन धेयापर्यंत आता,
न थांबता मी पोहचू शकतो
येऊ द्या साहेब,घेऊ द्या पुस्तक,
देऊ द्या कुठलाही धडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥४॥

🌹🖊🕉🇮🇳:
६)*शरीराची ओळख*

ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
मान वाकडी करा
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
मान वाकडी करा
गुडघ्यात वाका
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

*संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद*
🌹🖊🕉🇮🇳:

७) वाचनगीत

एकच ध्यास वाचन विकास
की शंभर टक्के आता वाचणार ।।

 कागद तूम्ही फाडा नि जिबल्याही खेळा
कोलांटी उठल्या नि टायरही खेळा
तूम्हा कूणी नाही रोखणार
की शंभर टक्के आता वाचणार।।


उशीरा सुचली पण बाई छान युक्ती
नेहमीसारखी अभ्यासाची नाही हो सक्ती
आता रोज आम्ही शाळेत येणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

घरी जे खेळ तेच शाळेतही
 आले
गुपचूप बसणारे मुलंही बोलके झाले
चित्रावरून गोष्ट सांगणार।।
की शंभर टक्के आता वाचणार

अंकांची गाडी नि शब्दांचा डोंगर
चित्रगप्पा ,नाटुकली मज्जा कित्ती येणार
त्यातुनच आता शिकणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

शाळा आणि घर आता सारखेच वाटे
बाई गुरुजींशी वाटे बदललेत नाते
आत्मविश्वास आता वाढणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

शाळा आता पुर्वीसारखी अजिबात नाही
माझ्यासाठी तिथे आता आहे खूप काही
प्रेम आणि माझा सन्मान ।।
की शंभर टक्के आता वाचणार

आजवर जे आमच्यासाठी होतं मोठं कोडं
वाचन विकास कार्यक्रम ने
सारं केलं  सोप्पं ।।
वाटे किती मानावे आभार।।
की शंभर टक्के आता वाचणार

एकच ध्यास वाचन विकास
की शंभर टक्के आता वाचणार.


कवयित्री-विद्या बनाफर /बैस
जि प शाळा शिवणी
अकोला,विदर्भ
🌹🖊🕉🇮🇳: *🌴

    ८)शब्द वाढविण्याचे गाणे🌴*

*🌴🌴एक होता डोंगर...🌴🌴*

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.....*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडंं...अंड्यात पिल्लू...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंड...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...दाणा झाला चूर्रर्र...चिमणी उडाली भूर्रर्र....हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला..........*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

🌹🖊🕉🇮🇳:

९)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर

औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
        गुरुजी छडी नका

शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी
आरसा त्याला उलटे करी
  गुरुजी छडी नका मारुजी...

🌹🖊🕉🇮🇳:

१०)*अंगनात माझ्या मोरियो आला..*

अंगनात माझ्या मोरियो आला-२
मोर म्हणून बोलावितो..2
मोरियो घुंगरू वजवितो...2
हातातले कंगन दे मला आई
कंगन म्हणून बोलावितो
मोरियो....।।1।।
नाकातली नथनी दे मला आई
नथनी म्हणून बोलावितो
मोरियो...।।2।।
पायातली पैंजन दे मला आई
पैंजन म्हणून बोलावितो
मोरियो...।।3।।
कानातली बुगड़ी दे मला आई
बुगड़ी म्हणून बोलावितो
मोरियो...।।4।।
मोरियो घुंगरू वजवितो.....


११)पोर तुनी शाळा मा*

पोर तुनी शाळा मा धाड़ रे दादा
पोर तुनी शाळा मा धाड़...2
भाषा विषय ना तास भी शे ना..2
क ख ग घ शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी....।।1।।
गणित विषय ना तास भी शे ना-२
एक दोन तीन चार शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी...।।2।
इंग्लिश विषय ना तास भी शे ना-
A B C D शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी...।।3।।
कला विषय ना तास भी शे ना-२
गाना नि गोष्टी शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी ...।।4।।


 १२)गंपुने केले साबनाचे फुगे*

गंपुने केले साबनाचे फुगे
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे
एक फुगा अहा एक फुगा -2
एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला
गंपुला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।1।।
एक फुगा आजीच्या हातावर बसला
गंपुला तो लाडुच वाटला
एक फुगा अहा एक फुगा  -।।2।।
एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंपुला तो मोतीच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।3।।
एक फुगा आईच्या गालावर बसला
गंपुला तो पापाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।4।।


[१३)गुरूजी छड़ी नका मारु*

गुरूजी छड़ी नका मारु जी नि   लगाते हातावारी-२
शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरूजी
गुरूजी छड़ी....।।1।।
आवंदाच ग वारिस बाई मी
सहाव गाठलं ग
शिकन्यासाठी पहिलं पाऊल
शाळेत मी टाकलं ग
येतंय रडू मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
गुरूजी छड़ी.....।।2।।
शब्द वाचता वाचता माझी
मान दुखू लागलीं ग
अंक लिहिता लिहिता माझी
बोटं दुखू लागलीं ग
उलटे अक्षर काढले जरी
अरसा त्याला सुलटे करी    गुरूजी छड़ी....।।3।।

🌹🖊🕉🇮🇳:

१४)*झिंगाट reading song*

उरात होतय धड़धड़
पाटी पुस्तक हातात आली
अंगात भरलय वारं
अन शाळेची घंटा झाली
आता अधीर झालोया
 मग तायार झालोया
पाटी दप्तर घेऊन तुमच्या
शाळेत आलोय
वाचतंय गूँगाट लिहितय झिंगाट
रंगात आलोया झालंय
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
संद्या शाळेला झालिय
माझ्या वाचनाची घाई
कधी येणार हो बाईं मला
आई चा अ आ ई
आता खेळुन आलोया
लई वाचून आलोया
ढिंगच्याक जोरात डिजिटल वर्गात
शिकायला आलोया झालं
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
बाई उताविळ झालो
चित्र पाहुन दंगलो
शब्द वाचून दंगलों
पट्टया वाचून हसलो
आता तयार झालोया
तुमच्या वर्गात आलोया
लई खेळून वाचून वर्गामध्ये
पहिला आलोया
संद्या पोरात म्या लई जोरात
रंगात आलोया झाल
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट

🌹🖊🕉🇮🇳:

*१५)शाळा मा चाल मना नातुबा*

शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
तू पाटी नि पुस्तक भर
धर दप्तर खांदावर
चाल शाळा ना रस्ता धर
तुनी शाळा शे रस्त्यावर ।।1।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
तू वाचन शिकी ले रं
थोडं लेखन शिकी ले रं
तू गणित शिकना जर
पुढे जाईन आपलं घर ।।2।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
थोड़ सोताना करता कर
थोड़ समाज ना करता कर
जो शिक्षण लेस खरं
त्यानं जीवन शे सुंदर ।।3।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
              *स्वयंरचित*
🌹🖊🕉🇮🇳:

१६)नको ताई रुसू, कोपर्‍यात बसू,
येउ दे ग गालात खुदकन हसू |

इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग,
देऊ काय तुला हवे ते ग माग,
नवरा हवा का लठ्ठ हवी सासू ?

बाहुलीच्या लग्‍नाचा खेळ गडे खेळू,
लग्‍नात बुंदीचे लाडू आता वळू,
नवीन कपड्यात छान छान दिसू |

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट,
केशरीभात केला आहे मोठा थाट,
ओठात आले बाई लडिवाळ हसू |

🌹🖊🕉🇮🇳:

१७)किलबिल किलबिल पक्षी बोलती,
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती |
पानोपानीं फुलें बहरती,
फूलपाखरें वर भिरभिरती |
स्वप्‍नीं आले काही,
एक मी गाव पाहिला बाई |

त्या गावाची गंमत न्यारी,
तिथे नांदती मुलेच सारी |
कुणी न मोठे, कुणी धाकटे,
कुणी न बसते तिथे एकटे |
सारे हसती, गाती नाचती,
कोणी रडके नाही |

नाही पुस्तक, नाही शाळा,
हवे तेवढे खुशाल खेळा |
उडो बागडो, पडो, धडपडो,
लागत कोणा नाही |

तिथल्या वेली गाणी गाती,
पर्‍या हासर्‍या येती जाती |
झाडांवरती चेंडु लटकती,
शेतांमधुनी बॅटी |
म्हणाल ते ते सारे होते,
उणे न कोठे काही
🌹🖊🕉:

१८)सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
🌹🖊🕉🇮🇳:

१९)रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु
आमच्यासंगे बोला आता ढिश्यू ढिश्यू ढिश्यू
हाहा..... ही ही....... हो हो

आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं तोंडाला सुटेल पाणी

आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला ?
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?

गाल गोबरे गोरे गोरे लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

बावन पत्ते बांधु वाडा शर्यत खेळू घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

चिमणी खाई मोती-दाणे गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?
🌹🖊🕉🇮🇳:

२०)चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?

निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी.

आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?

आता तरी परतुनी जाशील का?
दूध न्‌ शेवया खाशील का?

आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल.

असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला.

हाकेला 'ओ' माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
🌹🖊🕉🇮🇳:

२१) ल ल्ला लला ललला ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे ?  पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ?  मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्याइवल्या घरट्यात चिमणाचिमणी राहातात
चिमणा चिमणी अन्‌ भवती चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीनें घास द्यावा पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे हासते छ्प्पर भिंती दारे !
🌹🖊🕉🇮🇳:

२२)अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ.

थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार.

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम.

वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी.

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार.

डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव.
🌹🖊🕉🇮🇳:

२३)नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरलीं रे
पावसांत न्हाऊं काहीतरी गाऊं
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यांत नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझीमाझी जोडी जमली रे
आभाळांत छान छान सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
🌹🖊🕉🇮🇳:

२४)येरे येरे पावसा
तुला देतो पैसा.

पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा.

ये ग ये ग सरी
माझे मडके भरी.

सर आली धावून
मडके गेले वाहून.
🌹🖊🕉🇮🇳:

२५)ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा..
🌹🖊🕉🇮🇳:

२६)अ आ आई म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ थ थ थवा
बाळ जरि खट्याळ तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई.
🌹🖊🕉🇮🇳:

२७) गाडी आली गाडी आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंट वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाहि ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

🌹🖊🕉🇮🇳

२८)ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे.

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे.

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे.

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाट्टेल्‌ ते होऊ दे.
🌹🖊🕉🇮🇳:

२९)राजा राणीची नको काऊ माऊची नको
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ आता झाली माझी झोपेची

राम हसायचा कसा राम रडायचा कसा
आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा
समजूत कोणी घातली त्या वेड्याची ?

राम काळा का गोरा दिसत होता का बरा
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा
आवड होती का ग त्याला खेळाची ?

राम गेला का वनी त्याला धाडीला कुणी
भीती नाही त्याच्या कशी आली ग मनी
सोबत तिथे त्याला होती का कोणाची
🌹🖊🕉🇮🇳:

३०)छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
'मोर्‍या मूर्खा !' 'गोप्या गद्ध्या !' देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा पुसती गिरवा बघु नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌
🌹🖊🕉🇮🇳:

३१)गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍यागोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !

🌹🖊🕉🇮🇳:

३२) झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

🌹🖊🕉🇮🇳:

३३)असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार.

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
'हॅलो हॅलो !' करायला छोटासा फोन.

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल.

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो.

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला.

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

🌹🖊🕉🇮🇳:

३४)ससेभाऊ ससेभाऊ
चार उडया मारा पाहू
कश्या  कश्या कश्या?
अश्या अश्या अश्या

अहो  अहो हत्ती
डुलडुलता  किती

कसे कसे कसे?
असे असे असे!

अहो अहो गाढवदादा
जरा तुमचा सुर काढा
कसा कसा कसा
असा असा असा


होँ... हो... होँ

🌹🖊🕉🇮🇳:

३५)लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरविते
टूक टूक ही बघते

नकटे नाक उडविते
गुबरे गाल फुगविते
दात कधी घाशिना
अंग कधी धुविना

इवले घरकुल मांडते
मांडता मांडता सांडविते
पोळ्या केल्या करपून गेल्या
भात केला कच्चा झाला
वरण केल पात्तळ झाल
तूप सगळ सांडून गेल

केळ्याच शिकरण करायला गेली
पडली खुर्चीतच
आडाच पाणी काढायला गेली
धपकन पडली आत

🌹🖊🕉🇮🇳:

३६)फिरायला गेला बोकड
धावत आले माकड

दोघे गेले हॉटेलात
बसून खाला मटारभात

मालक म्हणतो द्या पैसे
दोघांनी मिळून दिले ठोसे

माकडाने मारली उडी
पटकन पळवली सुपारीची पुडी

दोघे गेले सुपारी खात
मालक बसला चोळत हात.

🌹🖊🕉🇮🇳:

३७)काव काव काव काव कावळा म्हणाला
सोनुच्या घरी आला
चिव चिव चिव चिव चिमणी म्हणाली
सोनुच्या घरी आली
भू भू भू भू कुत्रा म्हणाला
सोनुच्या घरी आला
म्याव म्याव म्याव म्याव मांजर म्हणाली
सोनुच्या घरी आली
मिठू मिठू मिठू मिठू पोपट म्हणाला
सोनुच्या घरी आला
कुहू कुहू कुहू कुहू कोकिला म्हणाली
सोनुच्या घरी आली
डराव डराव डराव डराव बेडूक म्हणाला
सोनुच्या घरी आला
कुँक्क कुँक्क कुँक्क कुँक्क बदक म्हणाले
सोनुच्या घरी आले


🌹🖊🕉🇮🇳:

३८)सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तर्‍हेतर्‍हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई, थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता पण रे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणूस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावुनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्‍नाला !
आवडती रे वडिल मला !

👉    📱📕✏📚
*सुंदरा या गीताचे बोलीभाषा
(पावरी) अनुवादंन*
●●●●●●●●●●●●●●●●●●●●

३९) बबली शाळा मा चाल तू ..!2!

तह पाटी आप ,तह पुस्तक आप
तह पेन आप ,तह वही आप...
तू शाळा मा काह नि आवतली...
बबली शाळा मा चाल तू....!!2!!

तह फरक आप ,तह डगल आप
तह दफतर आप,तह पैयहा आप
तू शाळा मा काह नि आवतली..
बबली शाळा मा चाल तू.....!!2!!

तह कुदरी आप ,तह बिस्कीट आप
तह सहलीक लिजाम, तह किल्ला देखाड
तू शाळा मा काह नि आवतली ...
बबली शाळा मा चाल तू..!!2!!

मास्तर मी शाळा मा आविही ...
मेहेक पाटी बी आप,मेहेक पुस्तक बी आप
मेहेक पेन बी आप,मेहेक पेन्सिल बी आप
मेहेक फरक बी आप, मेहेक डगल बी आप
मेहक दफतर बी आप,मेहेक पैसा बी आप
मेहक कुदरी बी आप, मेहक बिस्कीट बी आप
मास्तर मी शाळा मा आविही..!!2!!


🌹🖊🕉🇮🇳:
ही गाणी कालबाह्य होऊ नयेत म्हणून सागळ्यांसाठी उपलब्ध करूँ देण्याचा प्रयत्न केला.
🌹🖊🕉🇮🇳:

👆🏻🌹🖊संकलन-श्री.याॆगॆंद्रसिंह शिवाजी पाटील प्राथामिक उपशिक्षक
(M.A.B.ed..)
🕉🇮🇳: जि.प.शाळा,हिसपूर ता.शिंदखेडा जि.धुळे...

Monday, January 8, 2018

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-अठ्ठाविसावा*◀
       
       *iचा उच्चार इ*

👉 आजचे शब्द
1)piece     11)swift     21)bitter
2)pinch    12)swing   22)bridge
3)prick     13)thick      23)brinjal
4)radio     14)thief      24)chicken
5)sieve     15)thing    25)chilli
6)solid      16)think    26)diesel
7)spill       17)trick      27)dinner
8)stick      18)visit      28)display
9)still        19)which     29)divide
10)strip    20)wrist    30)finger



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *काही वेगळे उच्चार* ie-इ
dge- ज
e-अ
ay- ए

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  display या शब्दामध्ये di चा एक व splay चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
display मध्ये di चा डि व splay चा स्प्ले म्हणजे डिस्प्ले


👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये brinjal या शब्दात bri चा उच्चार ब्रि व nja चा उच्चार न्ज व l चा उच्चार ल म्हणजे ब्रिन्जल


   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. divide- डिव्हाइड
       
     

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

Tuesday, January 2, 2018

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-सत्ताविसावा*◀
       
       *iचा उच्चार इ*

👉 आजचे शब्द
1)will     11)skin      21)field
2)wind   12)snip    22)habit
3)wing   13)tilt      23)knit
4)wish    14)tint     24)litre
5)with     15)twin    25)brink
6)lisp     16)wink    26)click
7)mist    17)spill    27)cliff
8)rift       18)brick     28)crisp
9)sift      19)bring     29)flint
10)skid   20)chief    30)frill



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.


👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  bringया शब्दामध्ये bri चा एक व ng चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
bring मध्ये bri चा ब्रि व न्ग चा लो  म्हणजे ब्रिंग


👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये flint या शब्दात fli चा उच्चार फ्लि व nt चा उच्चार न्ट म्हणजे फ्लिन्ट


   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. twin  - ट्विन
       
     

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

Monday, January 1, 2018

🌷🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-सव्विसावा*◀
       
       *iचा उच्चार इ*

👉 आजचे शब्द
1)tin     11)wiz      21)hill
2)win    12)bill     22)into
3)zip     13)chin    23)kick
4)kin     14)clip     24)kill
5)kit      15)dish   25)lick
6)nil      16)fill      26)kilo
7)nip     17)film     27)king
8)sin    18)fish     28)kiss
9)vim   19)gift      29)lift
10)wig  20)give  30)list



👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.


👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  kilo या शब्दामध्ये  ki  चा एक व lo चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
kilo  मध्ये ki चा कि व lo चा लो  म्हणजे किलो


👉 *जोडाक्षरयुक्त शब्द*
यामध्ये lift या शब्दात li चा उच्चार लि व ft चा उच्चार फ्ट म्हणजे लिफ्ट


   

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा. list - लिस्ट
       
     

🖋🖋 *आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.


वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*