Monday, May 28, 2018

*प्रत्येक राज्याच्या नावामागे दडलीये एक कहाणी-*

*प्रत्येक राज्याच्या नावामागे दडलीये एक कहाणी-*

एखाद्या वस्तूचे किंवा ठिकाणाचे नाव विशिष्ट का असते यामागे काही ना काही लॉजिक असते. ते नाव ठेवण्यामागे काहीतरी कारण किंवा एखादी कथाही असते. एखादा प्रदेश, भाग हा विशिष्ट नावानेच का ओळखला जातो, त्यामागे काय कारण असते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आता आपल्या देशात असणाऱ्या अनेक राज्यांची नावे नेमकी कशी पडली असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला असेल तर त्याची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ही नावे अर्थपूर्ण असून प्रत्ये नावामागे काही ना काही अर्थ आहेच. पाहूयात राज्यांच्या नावाविषयीच्या रंजक गोष्टी…

१. मध्य प्रदेश : मध्यप्रदेश राज्य, ह्या राज्याच्या नावामागे अगदी सोपे लॉजिक आहे. हे क्षेत्र भारताच्या मध्यभागी आहे म्हणून ह्याला मध्यप्रदेश हे नाव देण्यात आले.

२. छत्तीसगड : छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेशातून विभक्त होऊन तयार झाले आहे. येथील ३६ ऐतिहासिक किल्ल्यांमुळे ह्या क्षेत्राला छत्तीसगड हे नाव पडले.

३. झारखंड : संस्कृत भाषेत ‘झार’ ह्याचा अर्थ ‘जंगल’ असा होतो तर ‘खंड’ म्हणजे जमीन. ह्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत म्हणून ह्या क्षेत्राला झारखंड असे नाव देण्यात आले.

४. उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या उत्तर भागात आहे, त्यामुळे ह्या क्षेत्राला उत्तरप्रदेश असे नाव देण्यात आले.

५. उत्तराखंड : २००० साली उत्तर प्रदेशातून विभक्त होऊन उत्तराखंड ह्या राज्याची निर्मिती करण्यात आली. उत्तराखंड ह्याचा अर्थ ‘उत्तरेकडील जमीन’ असा होतो.

६. गोवा : गोव्याचं नाव हे संस्कृत शब्द ‘गौ’ म्हणजेच गाय ह्यावरून पडले असल्याचे काही लोक मानतात. तर काही लोक असे मानतात की, हे नाव युरोपीय किंवा पोर्तुगाली भाषेतून आले आहे.

७. महाराष्ट्र : १ मे १९६० साली महाराष्ट्र ह्या राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र हे नाव दोन संस्कृत शब्दांची जोड आहे. ज्यात ‘महा’ म्हणजे महान म्हणजेच ‘महान राष्ट्र’.

८. कर्नाटक : कर्नाटक हा शब्द संस्कृत मधील ‘कारू’ आणि ‘नाद’ ह्या दोन शब्दांची जोड आहे. ज्याचा अर्थ ‘उन्नत भूमी’ असा आहे.

९. हिमाचल प्रदेश : संस्कृतमध्ये ‘हिम’ ह्या शब्दाचा अर्थ ‘बर्फ’ तर ‘अचल’ ह्या शब्दाचा अर्थ पर्वत असा होतो. ह्या दोन शब्दांना मिळून ‘हिमाचल’ हा शब्द बनला आहे.

१०. हरियाणा : ‘हरियाणा’ हा शब्द ‘हरि’ आणि ‘आना’ ह्या दोन शब्दांपासून बनला आहे. ह्यात ‘हरि’ म्हणजेच विष्णू भगवान आणि ‘आना’ म्हणजे ‘आगमन’. असं म्हणतात की महाभारता दरम्यान भगवान विष्णू येथे आले होते म्हणून ह्या क्षेत्राचं नाव हे हरियाणा असे पडले.

११. गुजरात : अठराव्या शतकात गुजरा यांनी याठिराणी राज्य केले होते, म्हणून याचे नाव गुजरात पडले.

१२. पंजाब : पंजाब ह्या शब्दाचा अर्थ ‘पाच नद्यांची जमीन’ असा होतो. हा शब्द इंडो-इरानी शब्द पुंज म्हणजेच ‘पाच’ आणि ‘आब’ म्हणजेच पाणी ह्यांच्या एकत्रीकरणातून बनला आहे.

१३. पश्चिम बंगाल : बंगाल हा शब्द संस्कृतमधील ‘वंगा’ ह्या शब्दापासून बनला आहे. ह्यालाच पुढे जाऊन फारसी भाषेत ‘बंगालह’ आणि हिंदीत ‘बंगाल’ तर बंगाली भाषेत ‘बांग्ला’ असे म्हटले जाऊ लागले.

१४. अरुणाचल प्रदेश : संस्कृतमध्ये ‘अरुणा’ म्हणजे ‘सकाळची किरणे’ आणि ‘अचल’ म्हणजे ‘पर्वत’ असा अर्थ आहे. ह्या दोघांन मिळूनच ‘अरुणाचल प्रदेश’च नाव पडलं आहे.

१५. मेघालय : संस्कृतमध्ये ‘मेघ’ म्हणजे ‘ढग’ आणि ‘आलय’ म्हणजे ‘आवास’, ह्या दोघांना मिळून ‘मेघालय’ असं नाव पडलं आहे.

१६. त्रिपुरा : एका कथेनुसार ह्या राज्याचे नाव येथील ‘त्रिपुर राजा’ ह्यांच्या नावावरून पडलं आहे. हे भारतातील तिसरं सर्वात छोटं राज्य आहे.

१७. आंध्र प्रदेश : संस्कृत भाषेत ‘आंध्र’ म्हणजे ‘दक्षिण’, ह्यामुळेच दक्षिणेकडे असणारा प्रदेश म्हणून या क्षेत्राचं नाव हे आंध्र प्रदेश असं पडलं.

*💥*वरीष्ठवेतनश्रेणी* व *निवडश्रेणी* *प्रशिक्षणाची* *लिंक* *भरण्यापूर्वी* *खालील* *माहिती* *वाचावी* 💥

*💥*वरीष्ठवेतनश्रेणी* व *निवडश्रेणी* *प्रशिक्षणाची* *लिंक* *भरण्यापूर्वी* *खालील* *माहिती* *वाचावी* 💥
अनेक शिक्षकांचे लिंक भरणे संदर्भात अडचणी ,समस्या निर्माण झाल्यात त्यांचे फोन आलेत म्हणून माहिती देत आहे. मला जी माहिती आहे ती सादर करीत आहे तरी आपण जाणकार व्यक्ती कडून माहिती घेऊ शकता.

*1* )प्राथमिक शिक्षक(वर्ग 1 ते 8)माध्यमिक शिक्षक(वर्ग 9 ते 10 ला अध्यपन करणारे)उच्च माध्यमिक शिक्षक(इयत्ता 11 व 12 ला अध्यपन करणारे,ज्यांचे प्रशिक्षण या वर्षी आहेत ते वगळून) ज्यांची सेवा एकाच वेतनश्रेणीत सलग 12 वर्षे व 24 वर्षे झाले आहेत ते या प्रशिक्षणास पात्र.
**2* )शिक्षणसेवक कालावधी हा वरीष्ठवेतन व निवडश्रेणीस ग्राह्य आहे .त्यामुळे हा कालावधी धरून 12 वर्षे व 24 वर्षे धारावीत.
*3* )विनाअनुदानित शाळेतील सेवा वरीष्ठवेतन व निवडश्रेणीस ग्राह्य आहे परंतु कायम विना अनुदानित शाळेतील सेवा ग्राह्य नाही.( *शासन* *निर्णय* *6* *मे* *2014* )
*4* ) प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षणाचे आयोजन विद्या प्राधिकरणा तर्फे राहणार आहे.उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण या वर्षी मंडळा तर्फे  येत आहे.
**5* ) ज्या प्राथमिक,माध्यमिक,उच्च  शिक्षकांचे वरीष्ठवेतन श्रेणी प्रशिक्षण झाले आहे त्यांनी पुन्हा वरीष्ठवेतन श्रेणी करीता लिंक भरू नये. परंतु ज्या प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरीष्ठवेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाले आणि सेवेची 24 वर्षे झाले व निवडश्रेणीची पात्रता पूर्ण केली असेल तर त्यांनी निवडश्रेणी करीता लिंक भरावी.
*6*)यावर्षी चालू शैक्षणिक सत्रात ज्या उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण नाही त्यांनी लिंक भरावी.
**7* )लिंक भरणे करीता Staff Id (शालार्थ ID सोडून)व संस्थेचा ID लागतो(आवश्यक असल्यास) तो सरल पोर्टल वरून घ्यावा. staff ID हा सरल पोर्टल मधील कर्मचारी यांची वैक्तिक माहिती open केली असता तिथे उपलब्ध आहे.
*8* )ज्या माध्यमिक शिक्षकांनी सत्र 2016-17 मध्ये म.रा. माध्य. उच्च माध्य शिक्षण मंडळाच्या लिंक वर माहिती भरली होती त्यांनी ही लिंक पुन्हा भरावी.
*10* )लिंक भरताना तालुकास्तरीय  राज्यस्तरीय प्रशिक्षण इतर केलेले असल्यास त्यांची माहिती भरावी.
**11* )प्रशिक्षणाची लिंक ही 31 मे 2018 ला रात्री 11.59 पर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे माहिती htpp://www.research.net/r/SYFF2M3 लवकर भरावी.
*12* )हमीपत्रावर ज्या शिक्षकांनी वरीष्ठवेतनश्रेणी किंवा निवडश्रेणी चा लाभ घेतला आहे परंतु प्रशिक्षण पुर्ण केले नाहीआणि त्यानंतर मुख्याध्याप पदी पदोन्नती झाली आहे अश्या मुख्याध्यापक यांनी ही लिंक भरावी.
*13) विद्या प्राधिकरण,पुणे तर्फे वरीष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी करीता उपलब्ध लिंक ही केवळ प्रशिक्षणासाठीच आहे.त्यामुळे *शासन* *निर्णय* *23* *ऑक्टोबर* *2017* *च्याअटी*  *शाळा* *सिद्धी* *मध्ये* *A* *ग्रेड* ( *प्राथमिक* *शाळा* ) *इयत्ता* *9वि10* *विचा* *निकाल* *80* %( *माध्यमिक* *शाळा* ) *ह्या* *प्रशिक्षण* *घेणे* *करीता* *लागू* **नाहीत**ह्या अटी वरीष्ठवेतन व  चे लाभ घेणे करीता लेखा परीक्षण करताना लागतात.(23 ऑक्टोबर 2017 नंतर जर पात्र असाल तर)
ह्या अटी रद्द करणे करिता सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे.

Friday, May 25, 2018

🏵 *30 मे ,पुण्यश्लोक 'अहिल्याबाई होळकर' यांची जयंती चे "सूत्रसंचालन"* 🎤

🏵 *30 मे ,पुण्यश्लोक 'अहिल्याबाई होळकर' यांची जयंती चे "सूत्रसंचालन"* 🎤

🥀|| सुस्वागतम् सुस्वागतम् सुस्वागतम् ||🥀

*मी ................* सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो.

मराठ्यांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे . *अहिल्याबाईंना " पुण्यश्लोक "असेही म्हणतात .* कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात हुशार असलेल्या अहिल्याबाई चे नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासात लिहिले गेले.

```"राज योगिनी सती```
```अहिल्या होळकरांची राणी.```
```अजुनी नर्मदा जळी,```
```लहराती तिच्या यशाची गाणी "```

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी अहिल्याबाई विषयी म्हटले आहे.

🎪 *स्थानापन्न करणे :-*

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरज असते ती जबाबदारी ची जाणीव असलेल्यांची, योग्य वाटचाल दाखवणाऱ्यांची व असे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे *श्री..............* हे व्यासपीठावर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो!

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
संपूर्ण सूत्रसंचालन वाचण्यासाठी खलील *"सूत्रसंचालन अँप"* डाऊनलोड करा !
https://play.google.com/store/apps/details?id=anchoring.andspeeches
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🤵 *कार्यक्रमाचे अध्यक्ष :-*

तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून *श्री............* हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

(प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्दरचनेत थोडाफार बदल करावा)

🌹 *स्वागत /पुष्पगुच्छ :-*

```मानामनाच्या गाभार्‍यात```

```मूर्ती आपली सजली```

```स्वागतास खास आपल्या```

```वाहते हि सुमनांजली...```

आजच्या कार्यक्रमाचे *अध्यक्ष श्री..........* यांचे स्वागत *श्री...........* हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे *प्रमुख पाहुणे *श्री...........* यांचे स्वागत *श्री...........* हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

👯‍♀  *स्वागत गीत (असल्यास) :*

```मंगलदिनी, मंगलसमयी```
```झाले आपले आगमन येथे ..```
```करितो स्वागत हर्षभराने```
```प्रेमे गाऊनी स्वागतगीत येथे.```

अतिथी देवो भवः म्हणून फक्त पुष्पगुच्छाच स्वागत पुरेसे ठरणार नसल्याने शब्द सुमनांनी स्वागत करणं क्रमप्राप्त ठरतं ,पण आज आपण स्वागत गीता ऐवजी अहिल्याबाईच स्तृती घेणार आहोत . तरी मी त्यासाठी *श्री...........* यांना आमंत्रित करतो .

*स्तृती गीत :*

धन्य धन्य अहिल्याबाई ।
गेली कीर्ती करुनिया,
भूमंडळाचे ठायी।।
महाराज अहिल्याबाई ,पुण्यप्राणी ।
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्न खाणी ।।
संसार चालली दीनदुबळ्यांची आई ।
जेविल्या सर्व,मगच आपण अन्न खाई ।।
बांधिले घाट- मठ- पार । कुठे वनात पाणी गार ।।

(हे गीत किंवा दुसरे पण घेऊ शकता.)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
संपूर्ण सूत्रसंचालन वाचण्यासाठी खलील *"सूत्रसंचालन अँप"* डाऊनलोड करा !
https://play.google.com/store/apps/details?id=anchoring.andspeeches
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💐 *व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख :-*

आज आपले भाग्य म्हणून आपल्याला  *श्री...........* हे पाहुणे म्हणून लाभले आहेत म्हणून ....व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी *श्री...........* यांना आमंत्रित करतो.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
संपूर्ण सूत्रसंचालन वाचण्यासाठी खलील *"सूत्रसंचालन अँप"* डाऊनलोड करा !
https://play.google.com/store/apps/details?id=anchoring.andspeeches
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🏷 *निर्मिती :*
© *श्री. आशिष देशपांडे सर*
📲 9021481795
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Thursday, May 24, 2018

वरिष्ठ व निवड श्रेणी लिंक वर माहिती भरताना आवश्यक माहिती सोबत असावी

वरिष्ठ व निवड श्रेणी लिंक वर माहिती भरताना आवश्यक माहिती सोबत असावी

*सर्व माहिती इंग्रजीत कॅपिटल लेटर मध्ये भरावी*

स्वतःचे नाव
जन्म दिनांक
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता
MSACIT आहे किंवा नाही(फक्त उच्च माध्यमिक साठी)
असल्यास उत्तीर्ण वर्ष (फक्त उच्च माध्य साठी)
मोबाईल क्रमांक
स्वतःचा इमेल
कार्यरत जिल्हा
शाळेचे नाव
शाळा यु डायस क्रमांक
सरल मधील कर्मचारी स्टाफ ID
शाळेचा इमेल
शाळेचा प्रकार
शाळा अनुदान प्रकार
शाळेचा पत्ता
शाळा माध्यम
शिकवीत असलेले वर्ग
अध्यापनाचे विषय
अध्यापन स्तर( 1ते 5, 6 ते 8,9 ते 10 याप्रमाणे)
व्यवस्थापन प्रकार( शासकीय, अनुदानित,अंशतः अनुदानित, विना अनुदानित याप्रमाणे)
संस्थेचे नाव( फक्त संस्थेतील शिक्षकांसाठी)
संस्था चे सरल ID ( संस्था रजि करतांना प्रत्येक संस्थेस सरल ID मिळाला आहे तो)
23 OCT 2017 पर्यंत पूर्ण केलेले प्रशिक्षण सविस्तर माहिती
राज्यस्तरीय
जिल्हास्तर
तालुकास्तर
सेवा नियुक्ती दिनांक
सेवा निवृत्ती दिनांक
एकूण अध्यापन अनुभव वर्षांमध्ये
वरिष्ठ वेतन श्रेणी साठी पदवी पूर्ण असणे आवश्यक (BA, BSC, BCOM)
निवड श्रेणी साठी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक( MA, MSC, MED, MPED किंवा समकक्ष)

सदर माहिती भरण्याची अंतिम दिनांक 31 मे 2018 रात्री 11.59 पर्यंत

माहिती भरण्याची लिंक

https://www.research.net/r/SYFF2M3

A B C