Wednesday, July 25, 2018

या 8 कारणांनी हॅंग आणि स्लो होतो फोन, काय आहे यावर उपाय?

🔰⚜💠Ⓜ🅰🅿💠⚜🔰

*या 8 कारणांनी हॅंग आणि स्लो होतो फोन, काय आहे यावर उपाय?*

   ⚜  *प्रदीप कुंभार* ⚜

*स्मार्टफोन जेव्हा जुना होतो तेव्हा फोन स्लो होणे किंवा हॅंग होणे अशा समस्या होतात. त्यामुळे काहींना फोन पुन्हा पुन्हा रिस्टार्ट करावा लागतो. ही समस्या केवळ जुन्याच फोनमध्ये होते असे नाहीतर काही नव्या फोनमध्येही होते. यांची वेगवेगळी कारणे असू शकतात. कधी कधी फोनमधील हार्डवेअर स्पेसिफिकेशन आणि सॉफ्टवेअरसोबत यूजर्सकडून केली जाणारी छेडखानीही याचं कारण असू शकते. चला जाणून घेऊया स्मार्टफोन हॅंग किंवा स्लो का होतात? काय आहेत त्यावरील उपाय?*

*1) रॅम कमी असणे :*

मार्केटमध्ये आता 8 जीबी रॅम असलेले फोनही उपलब्ध आहेत. रॅम जास्त जीबीची असल्याने मल्टीटास्किंग दरम्यानही फोन स्लो किंवा हॅंग होत नाही. फोन रिस्टार्ट करण्याचीही गरज पडत नाही. पण जेव्हा विषय 4 ते 5 वर्ष जुन्या स्मार्टफोनमधील 512 एमबी ते 1 जीबी रॅमचा येतो तेव्हा मेमरी कमी होऊ लागते. यातील मल्टीटास्किंगमुळे फोन स्लो आणि हॅंग होतो.

*काय करावे?*

ज्या फोनमध्ये रॅम कमी असते त्यात डेटा कमी असायला हवा. त्यासोबतच केवळ कामाचेच अॅप इन्स्टॉल करा. जास्त स्पेस घेणारे अॅप इन्स्टॉल करु नका.

*2) अॅप तसेच ओपन ठेवणे :*

ही चूक जवळपास सगळ्याच यूजर्सकडून केली जाते. जेव्हाही एखादं अॅप ओपन केलं जातं ते वापरल्यानंतर बंद करण्याऐवजी अनेकजण बॅक करतात. त्यांना वाटतं की अॅप बंद झालं. पण ते अॅप केवळ मिनिमाइज होऊन बॅकग्राऊंडमध्ये ओपन राहतं. त्यामुळेही फोन स्लो होतो.

*काय करावे?*

जेव्हाही एखाद्या अॅपचा तुम्ही वापर करता तेव्हा ते वापरल्यानंतर योग्यप्रकारे बंद करा. यासाठी एन्ड की वर टॅप करा. काही फोनमध्ये हे काम वेगळ्या की ने केले जाते.

*3) अॅप्लिकेशन अपडेट करणं:*

तुमच्या फोनची रॅम 521 एमबी किंवा 1 जीबी असेल आणि मेमरी 4 जीबी किंवा 8 जीबी असेल, तर फोनमधील इन्स्टॉल अॅप अपडेट करु नका. फोनची इंटरनल मेमरी ऑपरेटींग सिस्टम आणि अॅप्ससाठी वेगळी असते. म्हणजे यूजर्सना कधीही पूर्णपणे मिळत नाही. अशावेळी तुम्ही जेव्हाही अॅप अपडेट करता तेव्हा मेमरीची स्पेस आणखी खर्ची होते. त्याचप्रमाणे अॅप्स अपडेट झाल्याने जास्त रॅम कंज्यूम होते. त्यामुळे फोन स्लो होतो.

*काय करावे?*

फोनमध्ये केवळ तेच अॅप अपडेट करा जे तुमच्या कामाचे आहेत. ज्याचा तुम्ही रोज वापर करता. अॅप्सच्या ऑटो फीचर अपडेटला प्ले स्टोर सेटिंगमध्ये जाऊन ऑफ करा.

*4) कॅशे क्लिअर न करणे:*

कॅशे (CACHE) बाबत कदाचित अनेक यूजर्सना माहीत नसेल. जेव्हाही आपण अॅपचा वापर करतो तेव्हा त्या अॅपशी निगडीत टेम्पररी डेटा स्टोर होतो. यालाच कॅशे म्हटले जाते. यामुळे हा डेटा फोनची रॅम कंज्यूम करतो. तसेच मेमरीची स्पेसही घेतो. त्यामुळे हा कॅशे डेटा आठवड्यातून एकदा क्लिअर करायला हवा.

*काय करावे?*

फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अॅप्समध्ये जावे. कोणत्याही अॅपच्या आत गेल्यावर तुम्हाला क्लिअर कॅशे आणि क्लिअर डेटा असे दोन पर्याय दिसतात. त्यातील कॅशे क्लिअर करायला हवे.

*5) APK फाइल इन्स्टॉल करणे :*

अनेक असे अॅप्स असतात जे प्ले स्टोरवर उपलब्ध नसतात. असे अॅप्स थर्ड पार्टी किंवा APK फाइलच्या मदतीने फोनमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकतात. हे फारच धोकादायक असतं. यामुळे फोन स्लो आणि हॅंग होतो. सोबतच यामुळे डेटा लिक होण्याचीही शक्यता असते.

*काय करावे?*

कधीही थर्ड पार्टी अॅप्स इन्स्टॉल करु नका. केवळ तेच अॅप इन्स्टॉल करा जे गुगल प्ले स्टोरमध्ये उपलब्ध असतील. कधीही वाय-फाय किंवा ब्लूटूथच्या मदतीने अॅप्स फोनमध्ये इन्स्टॉल करु नका.

*6) अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅपचा वापर :*

काही यूजर्स असे मानतात की, फोनमध्ये अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅप इन्स्टॉल करुन फोनची स्पीड वाढवली जाते. पण असे काहीही नाहीये. अॅंटीव्हायरसमुळे फोनच्या सिक्युरिटीवर जास्त प्रभाव पडत नाही. दुसरीकडे या अॅपमुळे फोनच्या मेमरीची स्पेसही खर्ची होते.

*काय करावे?*

तुमच्या फोनमध्ये अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅप असतील तर नको  ते लगेच अनइन्स्टॉल करा.कारण काही क्लिनर मोबाईल मध्ये इनबिल्ट उपलब्ध असतात.

*7) मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर :*

फोनच्या इंटरनल मेमरीमध्ये स्पेस निर्माण करण्यासाठी काही यूजर्स मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर करतात. असे केल्याने इंटरनल मेमरीमध्ये तर स्पेस निर्माण होते, पण फोनची बूटिंग प्रोसेस वाढते. जेव्हा अॅप्सना मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर केले जाते तेव्हा ते अॅप्स ओपन केल्यावप फोन मेमरी कार्डला सर्च करतं. कारण हे मेमरीचं सेकंड प्लॅटफॉर्म असतं त्यामुळे फोन याला रिड करण्यात थोडा वेळ घेतो.

*काय करावे?*

मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर करु नये. त्याऐवजी फोनमधील व्हिडीओ, ऑडिओ किंवा इतक फाइल मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर कराव्यात.

*8) व्हॉट्सअॅप फाइल :*

तुमच्या व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडीओसोबतच GIF, PDF, कॉन्टॅक्ट, ऑडिओ या इतर फाइलही येतात. यूजर्स या फाइल पाहतात, ऐकतात पण डिलिट करत नाहीत. इतकेच नाहीतर या फाइल जितक्यांदा फॉरवर्ड केल्या जातात तितकी जास्त स्पेस खर्ची होते. म्हणजे फोनची मेमरी यामुळे दुप्पट भरली जाते.

*काय करावे?*

व्हॉट्सअॅपच्या मीडियामध्ये जाऊन त्या फाइल लगेच डिलिट करा. त्यासोबतच सेंड मीडियामध्ये जाऊन फाइल्स डिलिट करा.

🔰⚜💠Ⓜ🅰🅿💠⚜🔰

Tuesday, July 24, 2018

राष्ट्रगीताबद्दल माहिती

*राष्ट्रगीताबद्दल माहिती*

१. राष्ट्रगीत (National Anthem. : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले जन-गण-मन या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

२. २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

३. राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

४. काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

५. जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये भारत विधाता या शीर्षकाखाली तत्व बोधिनी पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

६. १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून Morning song of India या नावाने छापले गेले.

✏✏✏✏✏

७. राष्ट्रीय गीत (National Song . : बंकिमचंद्र चटर्जी यांचे वंदे मातरम हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

८. राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

९. १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

१०. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आनंदमठ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

🔮🔮🔮🔮

Monday, July 16, 2018

ज्ञान संस्कार पॅनल



         ज्ञान संस्कार पॅनल
संस्थापक :श्री.विजय चौधरी
                 9405444985
विचारमंथन ~1  ते 4
सूत्रसंचालन 5 ते 34
वाचन प्रेमी 35 ते 40
कादंबरी 41 ते 43
माझी शाळा माझे उपक्रम 44 ते 48
कलाकार महाराष्ट्र 49 ते 50
Pdf & Xl File 51 ते 53
पाककला 54 ते 56
बोधकथा 57 ते 58
शिष्यवृत्ती तयारी 59 ते 60
शैक्षणिक साहित्य 61 ते 66
शाळा सिध्दी 67 ते 68
संख्या ज्ञान 69 ते 71
परीक्षा पेपर 72 ते 73
फक्त शैक्षणिक व्हिडीओ  74 ते 75
बालोत्सव 76 ते 78
1 ली वर्गशिक्षक 79 ते 80
2 री वर्गशिक्षक 81 ते 82
3 री वर्गशिक्षक 83 ते 84
4 थी वर्गशिक्षक 85 ते 86
MPSC 87 ते 88
सरल मदत केंद्र महाराष्ट्र 89 ते 92
मराठी गाणी 93 ते 94
रांगोळी 95 ते 96
मूलभूत वाचन क्षमता विकास 97 ते 102
इंग्रजी वाचन ग्रुप 103 ते 106
बालगीत 107 ते 110
जय विज्ञान 111
मराठी ग्रुप 112
हिंदी ग्रुप 113
प्रगत तंत्रस्नेही शिक्षक 114
शैक्षणिक सहल 115
शैक्षणिक कविता 116
5 वी 117
प्राथमिक 118
माध्यमिक 119
मैत्री 120
आध्यात्मिक 121
Whatsapp 122
Math 123
शिक्षक मित्र 124 ते 125
हिंदी गाणी 126
Techno 127
प्रेमकथा 128
वाचणार रे वाचणार 129
जि प130
शिक्षक संघटना महाराष्ट्र 131
बदली प्रक्रिया update 132
गुरुकुल 133
Blogger teacher 134
मैत्री 135
शायरी 136
कविता 137
चारोळी 138
शाळा व शासन निर्णय 139
उखाणे 140
सावित्रीबाई 141
उपक्रम 142
Sdmis 143 ते 144
टी म वि 145
हास्य 146

Sunday, July 15, 2018

अप्रगत विद्यार्थी उपक्रम

अप्रगत विद्यार्थी उपक्रम

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम

मराठी

 १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे. २)शब्दभेंड्या खेळ घेणे
. ३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे. लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे. ३)समान अक्षर जोड्या लावणे.
 ४)शब्दांची आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
 ६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
 ७)बाराखडीवाचन करणे
. ८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे
. १०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
 ११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे
. १३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

गणित

 १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
 ३)अवयव मोजणे
 ४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
 ५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
 ६)आगगाडी तयार करणे
 ७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे
. ९)अंकाची गोष्ट सांगणे.
 १०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
 १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
१७)वस्तु निवडणे
१८)पाणी पाटी
 १९)अक्षर देवून शब्द तयार करणे
२०)चिठ्ठीतुन शब्द देवून पाच वाक्य सांगणे
 २१)शब्दकोडे सोडवणे
 २२)अक्षरगाडी उदा. कप ,पर ,रवा ,वात ई.
 २३)श्रुत लेखन सराव
२४) अंकाच्यागाड्या
 २५)सम ,विषम संख्याच्या गाड्या
२६)सुलभबालवाचन सराव
 २७)स्मरणावर आधारीत खेळ
 २८)दुकानातील ,घरातील बाजारातील ई. वस्तुंची यादी तयार करणे

Friday, July 6, 2018

dotted sheet


http://www.worksheetfun.com/2013/03/09/letters-numbers-shapes-tracing-worksheets/
 लिंक open करा याचे वर सर्व dotted sheet आहे ते आपण डाउनलोड pdf मध्ये करू शकतात.

Wednesday, July 4, 2018

Mdm

*MDM अँप चा OTP येत नसेल तर खालील बाबी तपासून घ्या सदर बाबी योग्य असतील तर OTP येईल*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*1) MDM पोर्टल BEO लॉगिन वर सदर मोबाईल क्रमांक नोंदवला आहे का ते चेक करा*

*2) MDM पोर्टल वर अँप सेटिंग मध्ये आपल्या मोबाईल नंबर समोरील Change Divice वर क्लिक करा*

*3) आपल्या मोबाईल मधील आताचा MDM अँप पहिल्यांदा catche व Data Clear करुन Uninstall करा*

*4 ) आता नव्याने*
https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk
*या लिंक वरून appअँप डाउनलोड करा*

*5) आपल्या मोबाईल मध्ये नेट कनेक्शन सुरू आहे का पहा*

*6) आता MDM अँप सुरू करून योग्य UDISE कोड व मोबाईल नंबर नोंदवा व आलेला OTP नोंदवून अँप सुरू करा*

*वरील प्रक्रिया केल्यास OTP येण्यास काहीही समस्या राहत नाही*

*प्रदिप पाटील*