Friday, September 21, 2018

💃🏾 *रंग नवरात्रीचे :- 2018* 💃🏾

💃🏾 *रंग नवरात्रीचे :- 2018* 💃🏾

*Day 1*
10th October, बुधवार
Royal Blue 🔵

*Day 2*
11th October, गुरुवार
Yellow 💛

*Day 3*
12th October, शुक्रवार
Green 💚

*Day 4*
13th October, शनिवार
Grey 🌚

*Day 5*
14th October, रविवार
Orange 🍊

*Day 6*
15th October, सोमवार
White 🏐

*Day 7*
16th October, मंगळवार
Red 🍓

*Day 8*
17th October, बुधवार
Sky Blue 🧢💧

*Day 9*
18th October, गुरुवार
Pink 🎈🍩

*I hope I am the first person to inform you...*

Monday, September 10, 2018

पायाभूत चाचणीचे गुण

STUDENT PORTAL UPDATE

सरल पोर्टलवर आजपासून पायाभूत चाचणीचे गुण भरण्यास सुरुवात झाली असून. 
1)   student database ही वेबसाइट ओपन करा
2) user name  टाका
3) password टाका
4) capcha टाका.  Enter करा.
5) आता एक windo open होईल ,
तेथुन आडवा पाचवा Excel ह्या Tab वर जा व तेथुन  Download Question Wise या Tab वर क्लिक करा .
6) आता एक फाईल  open होईल त्यात exam type - base line निवडा,
7) subject निवडा,
8) shorting मध्ये Gender किंवा  / Alphabetical घ्या.
9) Satnderd, Division निवडा.
10) Download file वर क्लिक करा. 
11)file Download मध्ये सेव होईल.
12) Download Folder मधुन
file open करा आलेल्या box ला  yes वर क्लिक करा.
13) आता समोर एक Excel file open झालेली दिसेल.
14) त्यात विद्यार्थ्यांचे गुण भरा .
15) file मध्ये कुठलाच बदल करू नका.
16) सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरल्यानंतर डाव्या कोपर्‍यातील Ms  बटनावर जा file save as  option वर माऊस न्या तेथे save as type csv coma delimeted  हा  option घ्या. File name साठी मूळ एक्सेल फ़ाइल चे जसे नाव होते ते कॉपी करुन तसेच इथे  आता आपली file upload  करण्यासाठी तयार आहे.
17 ) आता minimize desktop browser परत student database ओपन करा
18) तेथुन आडवा पाचवा Excel ह्या Tab वर जा व तेथुन  upload Question wise  या Tab वर क्लिक करा . तेथे select file browser वर क्लिक करा.
19) आता आपन मार्क भरलेली परंतु  csv झालेली file निवडा.  csv झालेली file ओळखण्यासाठी  त्या file मध्ये  small a  दिसेल. 
20 ) file select  केल्यानंतर  upload stap 1 वर क्लिक करा. Corser फिरु द्या
upload stap 2 व  upload stap 3 पुर्ण झाल्यानंतर Data Upload Successfully या बारवर click करा.
आता आपली file यशस्वीपणे Upload झाली.
विशेष म्हणजे हे सर्व काम त्या त्या वर्ग शिक्षकांनी करावयाचे असुन ते वेळेत पूर्ण करावे...

    प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

Friday, September 7, 2018

Online सर्व्हिस बुक भरणे

*Online सर्व्हिस बुक भरणेसाठी पूर्वतयारी म्हणून काही शिक्षक बंधूनी केलेल्या सुचनानेवरून खलील बाबी विस्तृत स्वरूपात पाठवत आहे*

```तरी आवश्यकता भासल्यास सदर सूचनांचा उपयोग करून दुसऱ्या टप्यातील सर्व्हिस बुक माहिती भरण्यासाठी दिलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरण्यासाठी करावा```

* *जेवढी माहिती आपल्याजवळ उपलब्ध आहे अथवा माहिती आहे तितकीच माहिती फॉर्म मध्ये भरावी, माहिती नसल्यास रकाना कोरा ठेवावा*

*१)प्रथम नियुक्ती आदेश प्रतीची छायांकित प्रत*
*२)नियुक्ती प्रकार कोणता त्याबाबतचे पत्र/प्रमाणपत्राची छायांकित प्रत*
*३)प्रथम नियुक्ती नंतर आतापर्यंत झालेल्या सर्व बदल्यांचे आदेश, पदोन्नती चे आदेशांची छायांकित प्रती.*
*४)इयत्ता १०वी आणि त्यापुढील आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक,व्यावसायिक अर्हता ची उत्तीर्णतेची प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती.*
*५)नोकरी लागल्यानंतर शैक्षणिक/व्यावसायिक अर्हता वाढविली असल्यास त्याबाबतचे परवानगी पत्र.*
*६)पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रशिक्षण झालेले असेल अशा सर्व प्रशिक्षणाचे आदेश,कार्यमुक्ती प्रमाणपत्र,प्रशस्तीपत्र यांच्या छायांकित प्रती.*
*७)वरिष्ठ वेतनश्रेणी ,निवडश्रेणी मंजुरीचे आदेश यांची छायांकित प्रत*
*८)विविध वेतनवाढी बाबतचे मंजुरीचे आदेशांची छायांकित प्रत*
*९)MSCIT उत्तीर्ण बाबत प्रमाणपत्राची छायांकित प्रत*
*१०)शालार्थचा ID*
*११) GPF नंब.*
*१२)Blood Group*
*१३)कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्ड ची छायांकित प्रत.*
*१४)कुटुंबातील सर्वांच्या जन्म तारीख.*
*१५)आपण ज्या प्रकारचे कर्ज काढले असेल(उदा.गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, GPF ऍडव्हान्स, Car Loan)त्या कर्जाचे अकाउंट नंबर, मंजुरी पत्र क्रमांक, मंजुरी दिनांक, मंजूर रक्कम, शेवटच्या हप्त्याचा दिनांक याबाबत सोबत माहिती आणावी.*
*१६)सेवापुस्तकात ज्यांना वारस(Nominee)लावले असेल त्यांचे बँकेतील बचत खाते क्रमांक, IFSC कोड, बँकेचे नाव, गाव याबाबत माहिती सोबत आणावी.*
*१७)आपणास जो पुरस्कार मिळाला असेल त्याचे प्रमाणपत्रची छायांकित प्रत,ते केव्हा आणि कशाबद्दल मिळाले याबाबत माहिती सोबत आणावी.*

*टीप-सर्व छायांकित प्रती scan करावयाच्या असल्याने चांगल्या दर्जाच्या ,स्पष्ट दिसतील अशाच द्याव्या .तसेच सर्व छायांकित प्रती self attested करूनच द्याव्यात.*

Thursday, September 6, 2018

💉🌡 *मिशन मिझल्स रुबेला*💊💉

💉🌡 *मिशन मिझल्स रुबेला*💊💉

💉  *गोवर व रुबेला ह्या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १००% लसिकरण दि.१४.११.२०१८ ते ३१.१२.२०१८ या कालावधीत प्रत्येक शाळेत करण्यात येणार आहे.ज्या प्रमाणे पोलीओ या रोगाचे उच्चाटन झाले आहे त्याच प्रमाणे लसिकरणाद्वारे गोवर व रुबेला या रोगाचे सुध्दा १००% उच्चाटन अभिप्रेत आहे.*

💉  *वयोगट ९ महिने ते १५ वर्षाची प्रत्येक मुला,मुलीं ह्या लसिकरणाच्या लाभार्थी आहेत.शालेय वयोगटातील ६५% विद्यार्थी या लसिकरणाचे लाभार्थी  असतील.*

💉  *यापुर्वी गोवर किंवा MMR ची लस दिली असेल तरीही या अभियाना अंतर्गत परत आपल्या मुला मुलींना हि लस देणे बंधनकारक आहे.लस उजव्या दंडाखाली ०.५ मि.ली. एवढ्या प्रमाणात MR 1,MR 2 ह्या दोन लसिचे लसिकरण झाल्यानंतर गोवर व रुबेला रोगाचा १००% नायनाट होणार आहे.*

💉  *या अभियानात शिक्षण विभागाला सहभागी करण्याचे प्रमुख कारण म्हणजे शालेय बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे.बालक निरोगी असेल तरच १००% शाळेत उपस्थित राहून शिक्षणामध्ये सुध्दा प्रगत असेल.*

💉 *गोवर व रुबेला साठी मुख्याध्यापकांनी फाॅर्म नं.७ F मध्ये शाळेची विद्यार्थी संख्याची माहिती भरुन दि.०३.०९.२०१८ पर्यंत माहिती आपल्या केंद्रप्रमुखांकडे देणे.प्रत्येक शाळेमध्ये एक Nodal Teacher यांची नियुक्ती मुअ यांनी करावयाची आहे. आपणास १००% उद्यिष्ट पुर्ती करावयाची असल्यामुळे जे विद्यार्थी आता शाळेतुन बाहेरगावी स्थलांतरीत झाले आहेत व ते ३१.१२.२०१८ पुर्वी शाळेत येणार नाहीत ते विद्यार्थी आपल्या शाळेतुन लसिकरणिसाठी लाभार्थी राहणार नाहीत.यांची सर्व मुअ,शिक्षकांनी नोंद घ्यावी.*

💉  *वर्ग शिक्षकांनी वर्गाची माहीती फाॅर्म नं.१ मध्ये भरणे आवश्यक आहे.पालक व शिक्षकांची सभा घेऊन पालकांना लसिकरणाचे महत्व समजावून देणे. यासाठी शाळेत आरोग्य विभागांच्या कर्मचारी यांना आमंत्रित करावे.वर्गातील विद्यार्थ्यांशी दोनदा संवाद साधणे.त्याची नोंद फाॅर्म नं.१ मध्ये संवाद १,संवाद २ म्हणुन करावी.विद्यार्थ्यांची या मोहिमे दरम्यान पेंटीग स्पर्धा शाळेतच घ्यावी. लसिकरणाबाबत मुलांच्या मनातील भिती घालविणे.पालकांकरीता आरोग्य विभागा कडुन देण्यात येणारे माहिती पत्रक मुलांमार्फत पोहच करणे.*

💉 *प्रत्यक्ष लसिकरणाच्या दिवशी शाळेत २ खोल्या तयार कराव्यात.१ टिम २०० विद्यार्थ्यांना दिवसात लसिकरण करु शकते.एका खोलीमध्ये एकच विद्यार्थी जाऊन लस घेईल.दुसर्‍या खोलीत LED,प्रोजेक्टर वर मुलांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम प्रदर्शित करावेत.दुसर्‍या खोलीत ३० मिनीट लस दिलेले मुल बसल्यानंतर त्या लस दिलेल्या मुलाला घरी जाऊ द्यावे.*

💉 *लसिकरण दिलेल्या मुलाची नोंद फाॅर्म नं.९ H मध्ये करावी.लसिकरणास गैरहजर मुलाची नोंद फाॅर्म नं.९ B मध्ये करण्यात यावी.*

*लसिकरण झालेल्या प्रत्येक मुलास एक आरोग्य विभागा मार्फत प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे.*

  *सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांना विनंती आहे की,हि गोवर रुबेला मोहिम आपणास १००% उद्यिष्ट पुर्ती करावयाची आहे.त्यादृष्टीने आपले व सर्व पर्यवेक्षणाय यंत्रणेच्या सहकार्याची आवश्यकता आहे.*👏👏👏