Tuesday, March 3, 2020

*आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..*

वाढदिवस म्हणजे काय असत
आपल्या आठवणींचा उजाळा असतो...
आपल्या माणसांनी दिलेल्या
शुभेच्छांच बळ असत...
    *मनुष्य जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे,तितकीच किंमत ही वेळेचीही आहे,असे मला वाटते.*
       *आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून मला  माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा दिल्या,*
*त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे..*
     *पुढील आयुष्यात आपल्यासोबत काम करणे व हेच नाते आणखी दृढ करून माझ्या 170 शैक्षणिक Whatsapp ग्रुप वर नियमितपणे daily updated माहिती माझे सहकारी व सह अडमीन मित्र यांच्या सहकार्याने देत रहाणे हाच संकल्प मी केलेला आहे.*🙏

           *विजय चौधरी भुसावळ*🏻☺

           *📖 ज्ञानसंस्कार पॅनल 📖*

          ━━═•●◆●★❁★●◆●•═━━

Monday, March 2, 2020

प्रिय मित्रांनो,
मनःपूर्वक शुभकामना!💐
उद्या पासून सुरु होणारी परीक्षा ही या पुढील आयुष्यात होणाऱ्या अनेक परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. बालवाडी पासून आत्तापर्यंत टप्प्या-टप्प्याने जे काही नवीन नवीन शिकत आला आहात त्याचीच ही एक परीक्षा...
आपल्याला जे जमतं अन् जे करायला आवडतं ते आपलं 'करीअर' असणार आहे हे (विशेषतः पालकांनी) इथे ध्यानात घ्यायला हवे म्हणजे बालकांच्या आणि पालकांच्या मनावर ताण येणार नाही. मुलांनी अनिच्छेने मिळविलेले यश हे पालकांसाठी 'इज्जत का सवाल' जर असेल तर ते मुल भावी आयुष्याचा निखळ आनंद कसा काय घेऊ शकेल?
तू वर्षभर जितकी मेहनत घेतली आहेस तितकेच गुण आम्हाला हवे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही कमी अधिक झालं तरी तू आम्हाला हवा/हवी आहेस असा भक्कम मानसिक आधार पालकांनी या बाळांना द्यायलाच हवा.
...फक्त हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अन् भविष्यात जन्मदिनांकेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्राची उपयोगिता आहे हे पालकांनी समजून घ्यायला हवे आणि मुलांना ही हे आजच पटवून द्यावे.
... मानवाचे मुल आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करुन प्रगतीकडे जाण्याचा उपजत गुण घेऊनच जन्माला आलेले असते फक्त "काळजी नको बेटा, मी आहे!" हा विश्वास देणे महत्त्वाचे. 😊
पुनःश्च एकदा शुभेच्छा!💐👍🏼

Sunday, March 1, 2020


*हाताने टाइप न करता आपण फ़क़त बोलायचे,sms आपोआप टाइप होणार*


1⃣ प्रथम play store वरुन Google indic keyboard हे app 21.24Mb चे मोबाइल मध्ये इनस्टॉल करावे। पहिलेच असेल तर app update करावे।

2⃣ त्यानंतर Enable in settings ➡ Google indic keyboard ➡ select input method ➡ English & indic languages अश्या रीतीने क्लिक करावे।

3⃣ त्यानंतर select input language  वर क्लिक करुन Active Input methods मधील English & indic languages व Hindi & Hinglish याची निवड करावी।

4⃣ आता आपण sms टाइप करण्यास सुरुवात केली तर इंग्रजी मध्ये 'Ram' टाइप केल्यास 'राम' असे टाइप होईल।

5⃣ पण त्याच keyboard वर प्रश्रचिन्ह ❓च्या चिन्हाच्या बाजूला माइकवर 🎤 क्लिक करावे। तेथे सेटिंगवर 🔆 क्लिक करावे। तेथे Languages  मराठी निवडावी। व save करावे।

6⃣ आता कीबोर्डवर प्रश्न चिन्हाच्या बाजुच्या माइकला क्लिक करावे। व आपण स्पष्ट बोलत राहवे। आपोआप टाइप होईल। आपण जी भाषा निवडेल त्या भाषेत। पण यावेळी मोबाइलला नेट सुरु असावे