Wednesday, December 21, 2016

💢💢💢💢💢💢💢💢💢💢                                                                                                                                                                                                                   *युट्युब ओपन केल्यानंतर आपोआप येणार Recommended अश्लील व हिंसक व्हिडीओनां प्रतिबंध करणे*

*प्रदिप पाटील SARAL online.com* 🅿🅱🅿
www.marathischooltondare.blogspot.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*मित्रहो*,


*आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात*

*पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो*

*या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे*

*आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील*

*१ ) संगणकावर setting करणे*

*सर्व प्रथम युट्युब ओपन करा*

*आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा*

*Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा*

*आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on  या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल*

*सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा*

*अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो*



*२ ) मोबाईल वर setting करणे*

*सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा*

*स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा*

*सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा*

*आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा*

*सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल*

*आता back या अशा प्रकारे मोबाईलवर  restricted mode ऑन झाला असेल*

*या settings करून आपण सुमारे 98% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त  वापरू शकतो*

                *धन्यवाद*

         ✍ *प्रदिप पाटील* ✍

              *पनवेल , रायगड*

    📱 *मोबाईल क्र.9222023947*



💢💢💢💢💢💢💢💢💢💢