Tuesday, October 31, 2017

*🙏25 निकष🙏*

*🙏25 निकष🙏*
➖➖➖➖➖➖➖➖

*1)निकष क्रमांक 01➖आपल्या शाळेत कोणत्याही वर्गातील मुले 100%पट व उपस्थिती टिकवने.*

*2)निकष क्रमांक 02➖शाळा बाह्य बालके ,प्रत्यक्ष प्रवेशित बालके.*

*3)निकष क्रमांक 03➖परिसर स्वच्छता*

*4)निकष क्रमांक 04➖रचनावादी साहित्य प्रत्येक विषयासाठी किमान दहाघटकांच्या अध्यापनासाठी साहित्य असल्यास ➖(20प्रकारचे शिक्षकांनी स्वयंनिर्मिती साहित्य असल्यास)*

*5)निकष क्रमांक 05➖कोणत्याही* *वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास किमान*पाच गणितीय संख्या अचूक* *लिहिता येणॆ*
*इयत्ता १ली,२री साठी एक व दोन* *अंकी संख्या अचूक लिहीता -वाचता येणॆ*
*इयत्ता ३री साठी तीन अंका पर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन*
*इयत्ता ४थी साठी पाच संख्या वाचन लेखन*
*इयत्ता ५तें ८साठी सात अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन लेखन करता येणॆ*

*6)निकष क्रमांक 06➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास किमान इयत्ता नुसार शैक्षणिक साहित्याचा वापर करून पाच बेरीजेची उदाहरणे सोडविता येणॆ*.

*7)निकष क्रमांक 07➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास किमान ईयत्तानुसार शैक्षणिक साहित्याचा वापर करून  पाच वजाबाकीची उदाहरणे सोडविता येणॆ.*

*8)निकष क्रमांक 08➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास किमान ईयत्तानुरुप शैक्षणिक साहित्याच्या सहाय्य्याने किमान एक गुणाकार अचूक करता येणॆ*.

*9)निकष क्रमांक 09➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने अचुक भागाकार करता येणॆ*

*10)निकष क्रमांक 10➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वजन ,मापे.आकारमान ,लांबी ,वेळ सांगता आली आणि त्यावर आधारित गणिताची शाब्दिक उदाहरणे सोडवता येणॆ*


*11)निकष क्रमांक 11➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकुल आशयातील पाच वाक्ये वाचन करता येणॆ.*

*12)निकष क्रमांक 12➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकूल आशयातील पाच वाक्ये श्रुतलेखन लिहिता येणॆ*.

*13)निकष क्रमांक 13➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास वर्गानुकूल आशयाच्या आकलनावर आधारित विचारलेल्या 5प्रश्नांची उत्तरे देता येणॆ*

*14)निकष क्रमांक 14➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरापासून तयार होत जाणारे आणखी एक एक असे पाठ्यपुस्तकाबाहेरिल पाच शब्द तयार करता येणॆ*

*15)निकष क्रमांक 15➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता वैयक्तिक साभिनयासह करता येणॆ*

*16)निकष क्रमांक 16➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास आशयाला अनुसरून चित्रवाचन करता येणॆ*

*17)निकष क्रमांक 17➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यस कोणतेही तीन शब्द देऊनत्यावर पाच वाक्ये तयार करता येणॆ*

*18)निकष क्रमांक 18➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावर बोलण्यात ,उत्तरे देण्यात ,प्रतिसाद आणि वर्तनात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो*

*19)निकष क्रमांक 19➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास कोणतेही तीन शब्द देऊन त्यावर गोष्ट तयार करता येणॆ*

*20)निकष क्रमांक 20➖कोणत्याही वर्गात कोणत्याही विध्यार्थ्यास नाटिका 3ते 5मिनीट सादर करता येणॆ*

*21)निकष क्रमांक 21➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही मुलास घड्याळातील काटे फिरवून अचूक वेळ दाखवता येणॆ.*

*22)निकष क्रमांक 22➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास कोणतेही 3शब्द देऊन त्यावर कविता तयार करता येणॆ*

*23)निकष क्रमांक 23➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास त्या वर्गातील आशयानुसार सामान्य ज्ञानावार आधारित इंग्रजीत विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे देता येणॆ.*

*24)निकष क्रमांक 24➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही वि ध्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणॆ.*

*25)निकष क्रमांक 25➖कोणत्याही वर्गातील कोणत्याही विध्यार्थ्यास उभे राहून वर्गानुकूल दिलेल्या विषयावर 4तें 5 वाक्यात विचार मांडता आले.*

➖➖➖➖➖➖➖➖सावंत सर  ➖➖9⃣4⃣0⃣4⃣3⃣6⃣9⃣2⃣3⃣6⃣

Monday, October 23, 2017

Age calculate

*तुमच्या जन्मा पासुन आज पर्यंत किती मिनिटे, दिवस, महिने, वर्ष झाले हे जाणुन घ्यायचे असेल तर बघा*

*👇🏻👇🏻👇🏻👇🏻*
https://www.mahanmk.com/age-calculator.html

आपली जन्मतारीख टाका 👆🏻

Tuesday, October 17, 2017

HAPPY DIWALI...!!!


पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!