सौ. वर्षा भोज पुणे~ कविता

[08/02, 8:46 PM] Varsha Bhoj: डोळे हे जुल्मी गडे

नजरेने बोलती
शब्द भावनांचे
प्रेमाचे हे स्वप्न पडे
हाय ,डोळे हे जुल्मी गडे ||धृ ||

नयनातुन तुझ्या
प्रितीचा सडा
अलगद अंगणी पडे
हाय ,डोळे हे जुल्मी गडे ||१||

नजरेचे इशारे
ह्रदयालाच कळाले
ह्रदयाची ह्रदयाशी गाठ पडे
हाय, डोळे हे जुल्मी गडे ||२||

सौंदर्याचे चित्र
डोळ्यांनेच रेखाटावे
नजरेची नजरेशी भेट घडे
हाय ,डोळे हे जुल्मी गडे ||३ ||

लोचनात साठवू दे
तुझी विरघळलेली मीठी
जग जिंकणारे ते प्रेम भाबडे
हाय ,डोळे हे जुल्मी गडे || ४ ||


सौ . वर्षा भोज
पुणे
८/१/१७
[08/02, 8:57 PM] Varsha Bhoj: बालसाहित्य

विषय - फुलपाखरू

 कवितेचे नाव - नाजूक ते फुलपाखरू

कुठून आणलेस सुंदर पंख
पंखावरील छान छान रंग ||

फुलांवर बसशी जाऊन अलगद
तुला पाहुन आवरेना हा मोद ||

वाटे मजला घेऊन कवेत तुला
मीही तुझ्यासवे भेटेन प्रत्येक फुला ||

पाहशीस मज करून बारीक डोळे
फुलांभोवती तु नेहमी आनंदाने खेळे||

नाजूक नि सुंदर त्या पंखांवरती
वेगवेगळी नक्षी कोण रे काढती ||

तुला धरण्या काही छोटे उगाच भांडती
काही तुझ्या इकडून तिकडे उडण्यास भाळती |

स्वछंद जगण्याची देतोस तु  शिकवण
मस्त नि मजेत घालवतोस तुझे छोटेसे जीवन ||

वाटे सर्वांना फुलपाखरासम असावे जीवन
स्वछंदी राहण्यासाठी मात्र स्वच्छ असावे मन ||

सौ . वर्षा भोज
पुणे
७/२/१७
[08/02, 8:57 PM] Varsha Bhoj: बालसाहित्य

पक्ष्यांची कहाणी

चिव चिव करते चिमणी
माणसा झाडाला घाल पाणी ||

काव काव करतो कावळा
माणसा आवळा देउन नको काढु कोहळा ||

थुई थुई नाचतो रानात मोर
माणसा माणसा नको करु शिरजोर ||

पोपट किती गोड बोलतो
मिरची खातो पण मिठू मिठू करतो ||

शांतीदूत म्हणुन ओळख कबूतराची
आठवण करुन देते चाचा नेहरूंची ||

उंच आकाशात भरारी घेते घार
तिची नजर पिल्लांवर फार ||

कोकीळ घेते अशी मंजुळ तान
विसरायला लावते भूक नि तहान ||

लहानग्यांना खुश करते गाणे बदकाचे
क्व्याक क्व्याक करुन लक्ष वेधते सर्वांचे ||

हंस पोहते सुंदर तळ्यात
रूप त्याचे साठवावे डोळ्यात ||

कितीतरी पक्ष्यांची आहे अशीच कहाणी
बाळा गाते तुझ्यासाठी पाखरांची गाणी ||


सौ . वर्षा भोज
पुणे
३१/१/१७
[08/02, 8:58 PM] Varsha Bhoj: प्रजासत्ताकदिन निमित्त

प्रिय भारत देशा

देश माझा प्रिय आहे मजला
नाव त्याचे भारत माहीत आहे जगाला ||

विश्वशांतीचा तेववून दीप जगा देतो संदेश
समतेचा बंधुतेचा देतो धडा माझा देश ||

लोकशाहीचा करतो नेहमीच स्वीकार
भारतीय संस्कृतीचा करतो प्रसार ||

स्वातंत्र्याचा आहे इतिहास माझ्या देशाला
करून क्रांती घालवले दीडशेच्या पारतंत्र्याला ||

राज्यघटनेचे महत्त्व सांगते आपले संविधान
राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब महान ||

उंच आकाश सांगे माझ्या तिरंग्याची गाथा
पवित्र या भारतभू च्या चरणी टेकवते माथा ||

सुजलाम् सुफलाम् आहेत इथल्या जमिनी
सांगतात बळीराजाच्या कष्टाची कहानी ||

सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत देशाच्या महिला
प्रत्येक क्षेत्रात  जगात नंबर येणार पहिला |

निरनिराळे सण विविध पोशाख नि संस्कृती
विविधतेतून एकता सांगते भारताची धरती ||

देशवासीय आम्ही नेउ भारताला सर्वोच्च स्थाना
करतो प्रतिज्ञा आज ६८ व्या प्रजासत्ताकदिना |

सौ . वर्षा भोज
पुणे
२६/१/१७
[08/02, 8:58 PM] Varsha Bhoj: कवितेचे नाव   : तुझी सोबत

आपण दोघे आहोत सोबती
जशी वाती साठी असते पणती ||

तु आणि मी एकच आवाज
जसा दागिन्यांचा असतो साज ||

तुझी माझी ओळख आता एकच
मी तुझ्या नि तु माझ्या नावातच ||

सोबतीने हाकू संसाराचा सोनेरी रथ
नाही थांबायचे आता परिश्रम करु अविरत ||

दोघे होऊन दोघांचे सोबती आयुष्याचे
स्वप्न पुर्ण करु आपल्या सुखी संसाराचे ||

सोबत मात्र आपली असेल अंतापर्यंत
नाही सोडायचा हात शेवटच्या श्वासापर्यंत ||

 सौ . वर्षा भोज
पुणे
१८/१/१७
[08/02, 8:59 PM] Varsha Bhoj: धरती का ख्वाब


धरती तेरे कितने है रंगरूप
कहि पे छाव कही पे धूप
कहि है पेडोंकी  हरियाली तो
कही बंजर जमीन की रुदाली ||

सभी जगह तु बराबर नही
कोइ भी तेरे साथ क्यु नही
कहा पे अमिरी तो कही पे गरिबी
पहला दुसरे से क्यु करे बराबरी ||

चांद को क्यु है हमेशा तेरा होना
इंसान भी तेरे लिये हो जाता बेगाना
इक बात तो है तुझमे तेरी चाहत मे
सच्चाई झुके है हर बार तेरी बंदगी मे ||

धरती तु तो नही सिखाती पक्षपात
फिर भी इंसान क्यु करे है रक्तपात
ए माता सिखा सबको इंसानियत
प्रेम करे प्रेम निभाये धरती के ये सपूत ||

अरे न कर तु लालसा धरती की
ये तो भूकी है इंसान तेरे अच्छाई की
तेरे प्यारसे तु सिंच इस धरती को
ओर बना आशिया धरती के ख्वाबोंका ||

सौ वर्षा भोज
पुणे
१६/१/१७
प्रेमात पडल्यावर


प्रेमात पडल्यावर
मन पाखरू होते
उंच आभाळात
मस्त विहरून येते ||

प्रेमात पडल्यावर
मन मोरपीस होते
अलगद गालावर
फिरुन येते ||

प्रेमात पडल्यावर
मन आसवे होती
डोळ्यांतुन कधीही
सहजच ओघळती ||

प्रेमात पडल्यावर
मन मोती होती
त्याच्या ह्रदयशिंपल्यात
अडकून पडती ||

प्रेमात पडल्यावर
मन स्वप्नवत होते
मिलनाच्या आशेने
लोचनात साठते ||

प्रेमात पडल्यावर
मन प्राजक्त होते
त्याच्या अंगणात
फुलसडा पाडते ||

प्रेमात पडल्यावर
मन माझे न राहते
माझ्यात राहून
त्याचेच भासते  ||

प्रेम ही हळवी भावना
सुखावते माझ्या मना
वाट पाहते तुझ्या मिलना
जन्म जन्मांतरी साठी भेटना  ||

सौ . वर्षा भोज
पुणे
१३/२/१७
जीवन विषयक  चारोळ्या

जीवन म्हणजे
जन्ममरणाचा फेरा
चांगल्या नि वाईट कर्माचा
असतो हिशेब सारा ||

जीवनातल्या सागरात
प्रेरणेचा शिंपला सापडतो
हळूच उघडून पाहिले की
प्रगतीचा मोती त्यात गवसतो ||

जीवनात येतात
कटू गोड प्रसंग
त्यासाठी हवे
सोनेरी मन नि पोलादी अंग ||

जीवन म्हणजे छापा नि काटा
छापा आला तरी आनंदाने जगायच
काटा आला तरी सुखाने रहायच
सर्वांना घेऊन मस्त जगायच ||

जीवन नौकेत
मन खूप हेलकावे खाते
कधी संसारात तरंगते
तर कधी त्यात बुडते ||

जीवनाचे गाणे
सुखदुःखाने गाजते
कधी भांड्यांच्या आवाजाने
तर कधी पैंजणाच्या छुमछुमीने वाजते ||

जीवन जगताना
कधी नकार देउ नका
जगण्याच्या प्रत्येक क्षणाला
होकार  देउन टाका  ||


सौ वर्षा भोज
पुणे
१६/२/१७

No comments: