लोकसंख्या शिक्षण

लोकसंख्या शिक्षणासाठी एक छोटा प्रयोग सर्व प्रथम नेटवरून कुटुंब नियोजनाचे महत्त्व व काही फोटोज काढून घ्या हाॅस्पीटलमधून सुद्धा मिळतील आजच्या महागाई मध्ये एक कर्ता व्यक्ती छोट्या कुटुंबाचे गरजा पुर्ण करू शकतो असे आनंदी कुटुंब हासरे खेळणारी मुले व मोठे कुटुंब दुःखी कुटुंब फाटलेले कपडे घातलेले कुटुबांतील लहान मुले कामे करताना असे.दोन.वेगवेगळे फोटो तयार करा हे दोन्ही चित्रे वेगवेगळ्या छत्री खाली ठेवा यापैकी दुखी कुटुंबासाठी फाटकी छत्री.निवडा छत्रीखाली दगड गोटे रेती वाळलेले गवत टाकून त्यावर दु:खी कुटुंबाचा फोटो ठेवा याउलट सुखी कुटूंबासाठी नवीन छत्री निवडा त्याखाली हिरवा लाकडी भुसा टाका छत्रीला फुगे लावा जेणेकरून सुखी व दु:खी कुटुंब याचा संबंध कुटुंबातील सदस्य संख्येवर.अवलबूंन आहे हे.लक्षात यायला पाहिजे एक ज्यामध्ये दोनच टमाटर जेमतेम बसायला पाहिजे असी काचेची बरणी निवडा परीक्षकासमोर तिसरे टमाटर त्यामध्ये टाकून झाकण लावण्याचा प्रयत्न करा टमाटर फुटेल यावरून परीक्षकाला कुटुंबातील सदस्य जास्त असेल तर काय परीणाम होतील हे समजावून सांगा काही स्लोगन.तयार करा छोटे कुटुंब सुखी कुटुंब हम दो हमारे दो इत्यादी सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 🎅🎅 लोकसंख्या शिक्षण भाग.                                                                                                                      .भाग 2 🎅🎅🍀 व्यसनमुक्ती🍀 साहित्य-- काचेचा मोठा शिशा (बंपर) गुटका पुडीचे नाव असलेले कागद इत्यादी🍀 कृती🌸 5×15 सेमी आकाराच्या थर्माकोलपासुन पायर्‍या टाचणीने जोडून पायर्‍या तयार करून घ्या या पायर्‍यांना नरकसिडी किवा मृत्यू मार्ग असे नाव द्या प्रत्येक पायरीवर वेगवेगळ्या गुटका कंपनीचे पाउच उदा. मानिकचंद सितार नजर तलब पानपराग रजनीगंधा तंबाखू पुडी + चुना डबी बिडीबंडल+माचीस सिगारेट पाकीट असे प्रत्येक पायरीवर एक एक ठेवा. वरच्या पायरीवर दारूची छोटी शिशी त्यामध्ये दारूच्या रंगाचे लालसर असे कलर वापरून द्रावण तयार करून ठेवा 🌸 सर्वात वरच्या पायरीवर एक अस्थिपंजर झालेला मनुष्य झोपेलेला असे एक जाड पांढरे पृष्ठावर रेखाटन करून त्याला बाहुल्या च्या आकारानुसार कापून ठेवून द्या 🌸 बाहुल्याशेजारी एक छोटी पाटी लावा व त्यावर स्केचपेनने लिहा 🌸 आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा🌸 जेणेकरून व्यसनाधीन झाले ला मनुष्य मृत्यू पर्यंत पोहोचतोच शेवट मृत्यूच आहे हा सीन तयार झाला पाहिजे 🍀 पायरी शेजारी एका मोठ्या दारूच्या शिश्यात (रंगीत द्रावण तयार करून भरून घ्या) एक कंपासपेटीतील छोटी स्केल अर्धी तोडून त्याला एका बाजूने पाढंरा रंग द्या व स्केलच्या दोन्ही बाजूने परमनंट मार्करने अस्थिपंजर व्यक्तीचे रेखाटन करून शिश्यामध्ये टाकून द्या जेणेकरून दारूच्या पुर्ण आहारी गेलेला मनुष्य दाखवायचा आहे व त्याला बेवडा असे नाव द्या 🌺 250 रू मध्ये प्लॅस्टिक हाडाचा सापडा.विकत मिळतो तसेच पेटलेली सिगारेट दिसते असे चाबीकिचन सुद्धा मिळते नाही मिळाले तर एक सिगारेट हाडाच्या सापळ्याच्या तोडांत ठेवून द्या व सापळा एका खुंटीला अडकवून द्या आता प्रतीकृती मध्ये जिवंतपणा आणण्यासाठी काही महत्वाची माहिती दारू तबांकू शरीरावर कसे परीणाम करतात मेंदुचा शरीरावरील ताबा सुटने कुटुंब उघड्यावर येणे आर्थिक परिस्थिती ढासळणे समाजाचा त्याव्यक्तीकडे व कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होणारे विविध आजार असी माहिती सचित्र बोलक्या पद्धतीने तयार करा तबांकू दुष्परिणामाचे चित्र हाॅस्पीटलमधून मिळवा 🍀 काही स्लोगन तयार करा दारू संसाराचा नाश करी इत्यादी आवाहन करा की आजपासून व्यसनापासून दुर रहा कल्पकतेने यामध्ये बरेच बदल करता येतील🌸🌸 सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती 🌺🌺 लोकसंख्या शिक्षण                                                                                                        भाग 3 🎡🎡🎡 🍀 स्त्रि भ्रुण हत्या🌺 कृती-- एक कलिंगड किवा टरबूज घ्या त्याला मधोमध उभा कापा आतील सर्व पाणी व बिया काढून टाका आता कलिंगड मध्ये खोलगट भाग तयार होईल या खोलगट भागात एक बटाटा घ्या त्याची साल सोलून घ्या या बटाट्याला दुसरा बटाटा घेवून त्याचे लहान लहान अविकसित हात पाय चेहरा तयार करून काडीने टोचून तयार करून घ्या हे तयार झालेले भ्रुण कलिंगड च्या खोलगट भागात ठेउन द्या (गर्भामध्ये असलेले भ्रुण असे वाटावयास हवे) 🍀 ह्या कलिंगडाला प्लॅस्टिक ची पन्नी कव्हर म्हणून लावा व त्यावर कात्री इंजेक्शन खाली सिरींज ठेवून द्या त्यासमोर 🍀 आई बाबा नका मारू मला मलाही जग पहायचे आहे🍀 असी पट्टी लिहून ठेउन द्या कर्तबगार स्त्रियांचे फोटो त्यांचे कार्य व पद याची माहिती चार्ट स्वरूपात तयार करा इंदिरा गांधी कल्पना चावला प्रतीभा ताई पाटील किरण बेदी इत्यादी आज स्त्रियां कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे समजावून सांगा मुलीचे झपाटय़ाने कमी होणारे प्रमाण पुढील भविष्यात कसे चितांजनक होइल हे उदाहरण देऊन समजावून सांगा 🌺🌺 मातीचे दोन स्त्री व तिन पुरूष बाहुले पाटावर खाली बसलेले रंगवून व नवरदेव नवरी असे सजवून घ्या दोन स्त्री बाहुले एकामागोमाग ठेवा व त्यांच्या समोर तिन पुरूष बाहुले एका लाइन म्ध्ये मागोमाग ठेवा मध्ये आतंरपाट किवा छोटे खेळण्यातले यज्ञ ठेवा शक्य झाल्यास भटजीसुद्धा ठेवा 🍀 समोर पाटी लावा की दोन नवरीसाठी दोन नवरदेव तिसर्‍या नवरदेवाला नवरी कोठून आणणार🌺 काही स्लोगन तयार करा 🌺मुलापेक्षा मुलगी बरी उजेड देते दोन्ही घरी🌺🍀 मुलगा वारस आहे तर मुलगी पारस🍀 फक्त मुलीसाठी असणारे शासणाचे योजनेचे फलक लावा व समजवून सांगा🙏🏻 सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

No comments: