[09/02, 6:30 PM] Vasudha: हसण्यातच तुझ्या
फसलो मी
तुझ्या गालावरच्या खळीत
रुतलो मी....
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: तुझं हसणं तुझं रुसणं
घेतलं मी हृदयात कोरून
जे पाहिलं कधी स्वप्नात मी
घेतलं सत्यात उतरवून...
@वसु...
[09/02, 6:30 PM] Vasudha: वेड तुझे मला
वेड पांघरून जाते
हृदयाच्या बासरीवर
तुझे नाव छेडून जाते...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: रात्रीच्या निःशब्द पणात
तुझ्या सोबत असावं
हृदयाचं बोलणं मग
ओठातून झरावं...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: ये वेड्या..
करतात का कुणी अस
मी नसेन तर रडायचं
तुझ्या आठवणींच्या जगात
आपण दोघेच असायच..
हो ना ???
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: कृष्ण सावळा तू
गोपिका संग गुंग असे
व्याकुळ राधा तुझ्या प्रेमाची
तू रासलीलेत दंग असे...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: रूप तुझे साजिरे
मज भुलविते असे
गर्द आठवणींच्या विळख्यात
तूच तू मज दिसे...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: फक्त तुझ्यासाठी...
मन सैरभैर तुझ्यासाठी
मन चंचल तुझ्यासाठी
ना ठाव मनी कशाचा
हृदय धडधडे तुझ्यासाठी...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: विश्वासाने हात माझा
दिला तुझ्या हातात
पण मला काय महित तूच करशील
या काळजावर आघात...
@वसु...
[09/02, 6:30 PM] Vasudha: परिस्थिती घेते परीक्षा
करुनी खूप सारे आघात
पण करता यायला हवं
त्यालाही दोन हात...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: विसरू कसे घाव
मनावर कोरलेले
उपकार तुझे ते
माझ्याकडे उरलेले
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: वादळात वाळलेली पाने
गळून जातात
तरीही झाडे का
त्यांच्यासाठी झुरतात....
@वसु.....
[09/02, 6:30 PM] Vasudha: माझ्या हृदयाला जखम देऊन प्रेमाने तुझ्या केला- डंख होता, घायाळ झाले मन तरीही कवितेला माझ्या- चांदण्यांचा पंख होता......
[09/02, 6:30 PM] Vasudha: आयुष्य आहे हे
पानावरल्या दवासारखं
थोपवल तरी
हातातून सुटलेल्या क्षणांसारखं....
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: तुझी आठवण
म्हणजे जीवन
तू नसणं
म्हणजे एकटेपण....
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: आठवणींची सर
मनाच्या क्षितिजावर आली
मग कळीला हि
फुलण्याची जाणीव झाली....
[09/02, 6:30 PM] Vasudha: मनाच्या धरतीवर
अलगद उतरलास
काळजाच्या वाळवंटावर
पावसागत बरसलास.....
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: आठवणींच्या तुझ्या मांडून
ठेवलाय पसारा
तुझ्यासोबत चे क्षणच
देताहेत जगण्याचा इशारा...
@वसु.....
[09/02, 6:30 PM] Vasudha: काटेच दिले तुझ्या
त्या गुलाबाने आज
मी समजला होता
आहे तो तुझ्या प्रेमाचा साज...
@वसु.....
[09/02, 6:30 PM] Vasudha: नकळत का मी
तुझ्यात गुंतले
तू गेला निघुनी
पण मी तुझ्यातच राहिले...
@वसु.....
[09/02, 6:30 PM] Vasudha: तुझं ते अडून पाहणं
पुस्तकाच्या मागून
मी पाहताच मग
पुस्तकात घ्यायची नजर लपून....
@वसु.....
[09/02, 6:30 PM] Vasudha: स्वप्न दाखवून तू नवी
हात सोडून निघून गेला..
कशी विसरू त्या क्षणांना
ज्यामुळे तू फक्त माझा झाला...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: जुळतात आपली मने म्हणून
हदय हि जुळले आपोआप
नियतीने मात्र दिला
असा दूर होण्याचा शाप...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: सांग ना,
विसरशील का तू
आपल्या गोड भेटीला..??
आठवेल ना तुला
मी तुझ्यासाठी गजरा माळलेला....??
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: रम्य अशा आठवणी देऊन
जातोय आज दूर दूर
तुझ्याच आठवणींचा आज
काळजात मांडलाय काहूर...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: आठवणीच्या कप्प्यात
आजवर ठेवलंय तुला
माझ्या हृदयातील तुझी जागा
नाही दिलं कधीच कोणाला...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: दूर दूर चालली
माझ्यापासून तुझी सावली
आठवण आपल्या क्षणांची
साथ देतील पावलोपावली...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: खिळली नजर तुझ्यावरी
नयनात नयन गुंतले
पाहतच राहिलो तुला
सौन्दर्य तुझे मज भाळले...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: मी न माझी राहिले
तुला एकवार भेटल्यावर
गुंतला जीव तुझ्यात
प्रेमात तुझ्या पडल्यावर
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: ए वेड्या
रुसतात का असं
छोट्या छोट्या गोष्टीवर
प्रेम करतो ना तू
तुझ्या या बाहुलीवर...
@वसु....
[09/02, 6:30 PM] Vasudha: हितगुज आजकाल माझी
होते त्या आरशाशी
स्वतःमध्येच पाहते त्याला
प्रेमात वेडी मी थोडीशी...
@वसु....
[8/12, 11:47 AM] Vasudha Naik: *श्रावण मास*
*आला श्रावण मनातला*
*श्रावणसरींचे स्वागत करूया*
*नटून थटून सजली धरती*
*आनंदानं सण साजरे करूया*
*मनातल्या या श्रावणात*
*मन भरारी घेतेय माहेराची*
*सणांची बरसात लुटायला*
*जीव होय कासावीस आईबाबांना भेटायला*
*आली नागपंचमी पंचमी*
*नागाचे पूजन करूया*
*ऊन ऊन मऊ पुरण पोळी*
*माऊलीच्याहातची खाऊया*
*छान छान नटून थटून*
*शोभतील अशी वस्त्रे घालूया*
*नागोबाला पूजायला*
*वारूळाला आपण जावूया*
*नागोबाआहे मित्र*
*शेतकर्याचाच चांगला*
*शंकराच्या गळ्यातील*
*ताईत आहे तो भोला*
*नागपंचमीला नागोबा*
*आणतो गारूडी माझ्या घरी*
*घरातील सर्वपूजन करतात*
*नागोबाचे आल्या दारी*
*वसुधा नाईक,पुणे*
[8/12, 11:47 AM] Vasudha Naik: *श्रावण महिना*
*आला श्रावण मनातला*
*श्रावणसरींचे स्वागत करूया*
*नटून थटून सजली धरती*
*आनंदानं सण साजरे करूया*
*मनातल्या या श्रावणात*
*मन भरारी घेतेय माहेराची*
*सणांची बरसात लुटायला*
*जीव होय कासावीस आईबाबांना भेटायला*
*आली पंचमी पंचमी*
*माऊलीच्या हातची*
*ऊन ऊन मऊ पुरण पोळी*
*वर धार साजूक तुपाची*
*नाव घेता ग बाबाचे*
*जीव कासावीस होतो*
*कडा होतात ग ओल्या*
*मनमोर माहेरी धावतो*
*वाट पाहते ग अंतरी*
*कधी बंधुराया येतो*
*माहेरी जाण्यासाठी*
*जीव आतूर ग होतो*
*श्रावणाधारा बरसती*
*माझ्या ग परसात*
*फुलांची होते अंगणात*
*बरसातच बरसात*
*वसुधा नाईक,पुणे*
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: सकाळ
उठा उठा मंडळी
सगळीकडे उजाडले
पक्षीही घरट्यातून
बाहेर चार्यासाठी पडले....
कळी उमलली,फूल गंधाळले
वासुदेवाने साद घातली
चराचरातील मानवाला
सकाळ होताच जाग आली...
रात्र झाली की दुुसऱ्या दिवशीच्या सकाळचे वेध लागतात. सकाळ होताच सर्व सृष्टी प्रकाशमान होते.सूर्य पूर्वेला उगवतो .सगळीकडे सोनेरी किरणे पसरतात .लहान मुलांची शाळेला जायची गडबड घरातील माता भगिनी यांची स्वयंपाकाची घाई. तसेच पुरुष मंडळींची कामाला जायची घाई.घरात आनंदाचे ,उत्साहाचे असे वातावरण असते गडबडीचे वातावरण असते. पक्ष्यांची किलबिल चालू झालेली असते. अंगणातल्या झाडावर पक्षी येऊन बसलेले झाडावरची फळांचा आस्वाद घेण्यात गुंग झालेले दिसतात. घरट्यांतून चिमण्या बाहेर पडलेल्या आहेत आणि मस्त चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. सगळीकडे सूर्याची लाली पसरलेली असते.
सकाळ झाली म्हणजे जीवनातील आणखी एक दिवस जगण्याची संधी मिळाली...असे मला वाटते.
प्रश्नावली....
अ)एका वाक्यात उत्तरे लिहा.
१)रात्र झाली की कशाचे वेध लागतात?
२)सुर्याची किरणे पडल्यामुळे पृथ्वी कशी होते?
३)सकाळची धावपळ कशी होते?
ब) रिकाम्या जागा भरा.
१)सगळीकडे ------- किरणे पसरतात.
२)पक्ष्यांची -------- चालू झालेली असते.
क)समान अर्थ लिहा.
१)पक्षी-
२)सूर्य-
३)झाड-
ड) विरूद्ध अर्थ लिहा.
१)सकाळx
२)प्रकाशx
इ)'वातावरण'
या शब्दापासून नवीन शब्द बनवा.
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: *शाळा*
शाळा हे संस्कांराचे पवित्र स्थान आहे.इथे मूल आईच्याहाताला धरून शाळेत येते आणि बाईंच्या हाताला धरून शालेय संस्कारात वाढते.शिस्तीत अध्यापन करते.
शाळेत येणार्या बालकाचे वय तीन वर्ष .याला काहिही समजत नसते.कुटुंबातून तो समाजात येतो. आत्तापर्यंत मुलाला घर आणि शेजारचे एवढेच माहित असतात. आता तो समाजात पाऊल ठेवतो शाळेच्या माध्यमातून.
या छोट्याशा गोळ्याला शिक्षक घडवण्याचे काम करतात. 'कुंभार जसा मातीच्या आकार देवून सुंदर मडके घडवतो.' तसे शिक्षक हे कार्य करतात.
'शिक्षक हा शाळारूपी बागेचा माळी आहे.'
या शाळारूपी बागेत आलेल्या प्रत्येक मुलाला संस्कार,शिस्त,उपक्रम,प्रकल्प ,क्रीडा इत्यादीचे खतपाणी घालून वाढवत असतो.एक दिवस तो शाळेतून भूर्रर उडून जातो.पण या शालेय शिक्षणामुळे तो एक नागरिक बनतो.पुढील शिक्षण घेवून डाॅक्टर ,इंजिनिअर ,आॅफीसर अशा अनेक पदव्या धारण करतो.पण शालेय वातावरणात वाढलेला हा विद्यार्थी येथील शिक्षक,शिस्त,अभ्यास व मुलांबरोबरचा खोडकरपणा कायम लक्षात ठेवतात.
************************* ¶प्रश्न¶
*************************
१)संस्कारांचे तीर्थस्थान कोणते?
२)शाळेत येणार्या मुलाचे वय लिहा.
*************************२)रिकाम्या जागा भरा.
१)मूल ---------हाताला धरून शाळेत येते.
२)शिक्षक हा शाळारूपी बागेचा --------- आहे.
************************
३)समान अर्थ लिहा.
१)बाग-
२)आई-
***********************
४)विरूद्ध अर्थ लिहा.
१)पवित्र-
२)संस्कार-
*************************
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: *सहल*
सहल म्हटलेकी मी प्रथम अप्रत्यक्षरित्या निसर्गात रमायला लागते.निसर्गाशी गप्पा मारायला लागते.
सहल शाळेची वेगळी.मुलांबरोबर शैक्षणिक रहल मजेची होते. मुलांचा आनंद पाहून आपल्यालाही आनंद होतो.शेती,पाणी ,विहिर ,धरण ,समुद्र ,निसर्ग ,ऐतिहासिक वास्तू अशा ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तर मुलांच्या स्मरणात कायम कोरल्या जातात.
आपल्या कुटुंबाबरोबर सहलीला गेल्यास कामाचायेणारा थकवा दूर होतो.रोजच्या व्यापातून जरा दूर राहतो.फ्रेश वातावरणात आपणही टवटवीत होतो.आणि सर्वजण त्या निमित्ताने एकत्र येतात.
विविध विषयावर गप्पा होतात.गाणी होतात.नृत्य होते.मजा मजा येते.
आपल्या मित्रांसमवेत होणारी सहल नवसंजीवनी देते.
आता हे गाणे गुणगुणावेसे वाटते...
सहलीला जाताना गंमत आली
गर पाहिले ,हिरवी झाडी पाहिली.....
लाल लाल दगड लाल लाल माती
डोंगरातून खळाखळा नदी वाहत होती
पिवळीकेशरी झेंडूची फुले पाहिली....
डोंगर पाहिले.....
पानशेतधरण आहे किती मोठ
पाण्याने ते भरलं होत काठोकाठ
पाण्यावरून चालणारी नाव पाहिली...
डोंगर पाहिले .........
झाडाखाली बसून जेवण आम्ही केले
टुणूक टुणूक उड्या मारत बेडूक तेथे आले
बिस्किट पुडा पेरूची फोड मिळाली....
डोंगर पाहिले....
पाच वाजतागाडी शाळेमधे आली
शाळेभोवती पालकांची गर्दी जमली
आई म्हणाली सहल तुझी कशी काय झाली?...
डोंगर पाहिले.....
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: *थोर मातृत्व*
अतिशय धामधुमीचे दिवस होते.शहाजींची पत्नी जिजाई ही गरोदर होती. शहाजींनी त्यांना शिवनेरीवर ठेवले. व स्वतः लढाईला गेले.
तो सोन्याचा दिवस उजाडला. जिजाईंना पूत्ररत्न झाले. गडावर शिवाई देवीचे मंदीर होते.त्यावरून पुत्राचे नाव शिवाजी ठेवले. शहाजींनी त्यांच्या देखरेखीसाठी उत्तम ,हुशार,शालीन माणसांची नेमणूक केली. आणि स्वतः जिजाई शिवरायांना उत्तम संस्कार देत होत्या.
आपला मुलगा शिवबा हा त्या वेळी गुलामगगिरीत असणार्या जनतेसाठी कसा लढा द्यायचा? आदिलशाही,निजामशाही यांच्याशी लढा देण्यासाठी काय करायचे? अशा प्रकारचे शिक्षण लहानपणापासुनच त्यांनी शिवबाला द्यायला सुरूवात केली.
दांडपट्टा फिरवणे,तलवार चालवणे ,यातही निष्णात केले.
त्याचबरोबर रामायण ,महाभारत यावरआधारीत कथा शिवबाला सांगत त्यामुळे शिवबाचे विचार श्रीकृष्ण ,प्रभूराम यांच्यासारखे होवून जनतेला न्याय मिळवूनच द्यायचा.गुलामगिरीतून सुटका करून 'स्वराज्य' स्थापन करायचे .हीच इच्छा ठेवून तसेच शिवबा वागले. मावळ्यांच्या संगतीने गड,किल्ले जिंकून आदिलशाही ,निजामशाही उध्वस्त केली. स्वराज्याची स्थापना केली.
हे सर्व करताना मातोश्री जिजाईयांचे मार्गदर्शन लाख मोलाचे होते.
शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर या माऊलीचा अंत झाला.
अशी ही माऊली...
शिवबाची बनली साऊली....
रणनीतीचे धडे शिकवून
स्वराज्य निर्मिती केली ......
प्रश्न....
१)स्वराज्य म्हणजे काय?
२)जिजाई कोणाची आई होती?
३)जिजाईने शिवबांना कोणात्या गोष्टीसांगितल्या?
४)शिवनेरीवर शहाजींनी जिजाईंना का ठेवले?
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: *ध्येय .....*
ध्येयाचा ध्यास लागला की कार्याची पूर्तता होते.असे नेहमी म्हटले जाते.
समजा माझ्यासमोर हे आहे की आज मला पहिला नंबर मिळून दाखवायचा आहे .तर मी सतत अभ्यास केला किंवा अभ्यासावर माझ्या मी लक्ष दिले तरच मी पहिल्या नंबरने पास होवू शकते .मला माझे ध्येय गाठायचे आहे एक नंबरचे .आणि मी तसा प्रयत्न केला तरच मला ते साध्य करून दाखवता येणार आहे .
ध्येयाचा ध्यास लागला तर आपण ते कार्य पूर्ण करून दाखवू शकतो त्यासाठी प्रयत्न अतिशय महत्त्वाचे आहेत ते केले तरच तुम्हाला निश्चित ध्येय गाठण्यासाठी मदत मिळते .
आणि ध्येयनिश्चित नसेल तर आपण ते पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करतो. जर आपल्याला माहितच नाही आपल्याला काय करायचेयतर ध्येय पूर्ती कठीण होते.ती पूर्ण होवे शकत नाही .कारण आपल्याला काय हवे आहे ते समजलेलेच नसते .माहीत नसते .
यासाठी प्रथम ध्येय निवडा नंतर त्यावर कृती करा तुम्हाला प्रयत्नांती परमेश्वर हा निश्चित भेटणार आहे .
*प्रश्नावली*
१)ध्येय म्हणजे नेमके काय ?
२)आपल्या कार्याची पूर्तता केव्हा होते ?
३)आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण काय करावे ?
४)प्रयत्नांती काय मिळते ?
५)ध्येयाची निवड प्रथम का करावी?
*************************
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: *फेर धरू पंचमीचा*
आला सण पंचमीचा
श्रावण महिना सणांचा
सण हिंदोळे घेण्याचा
पाळणा होतो आनंदाचा....
सगळ्या सख्या जमतात
वारूळाला जायला
दुध लाह्या पुजनाचे ताट
नागोबाला पूजायला....
झिम्मा फुगडी खेळती
अंगणी फेर धरती पंचमीचा
फुगड्याही खेळतात सख्या
सडा शिंपतात हर्षाचा.....
झोका झाडाला टांगतात
त्यासाठी रांगा लावतात
हिंदोळ्यावर सुखाने
झोके छान घेतात....
फेर धरूनी गोल फिरतात
टाळ्यांचा ठेका धरतात
विविधअलंकार,पोशाखाने
स्वतः उत्तम सजतात.....
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: स्वातंत्र्य
पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज स्वातंत्र्य हा विषय अतिशय छान दिला आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची पारतंत्र्यातून झालेली सुटका .
एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत स्वतंत्र झाला. त्यापूर्वी इंग्रजांचे राज्य भारतावर होते .लोकांचे खूप हाल होते. भारत स्वतंत्र करण्यासाठी अनेक नेत्यांनी यासाठी कष्ट केले. तुरुंगवास उपभोगलेला आहे. प्रसंगी स्वतःचे प्राण प्राणही अर्पण केलेले आहे .देशाच्या सेवेसाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, म.गांधी,पं. जवाहरलाल नेहरू या नेत्यांची नावे लगेच स्मरणात येतात.तसेच भगतसिंग ,राजगुरू यांची नावे चटकन समोर येतात.त्यांनी जे देशासाठी केले ते कधीही विसरण्यासारखेनाही त्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली व देश स्वतंत्र करून दिला.स्वतंत्र भारतापूर्वी ची ओळख या सर्वांमुळे आपल्याला देश स्वतंत्र करून मिळालेला आहे .
पंधरा आॅगस्ट,सव्वीस जानेवारी या दोन दिवशी आपण झेंडावंदन करून आपल्या स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवत असतो. गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला याचबरोबर आपल्या देशाच्या सीमेवरील जे सैनिक भारत स्वतंत्र होण्यासाठी लढत आहेत अजूनही लढत आहेत .
यांच्या स्मरणार्थ त्यांना गाण्यातून श्रद्धांजली अर्पण करतो.
असे हे स्वतंत्र कोणाला नको आहे.पण आजची नारी अजूनही स्वतंत्र आहे असे वाटत नाही.खेड्यापाड्यातून अजूनही स्त्रीला दुय्यमच स्थान दिले जाते.भारत स्वतंत्र झाला.पण विचार तसेच राहिले.असे मला वाटते.
प्रत्येक पशू,पक्षी,मानवाला स्वातंत्र्य हवे.पण स्वैराचार नको.
➖➖ ➖➖➖➖➖
प्रश्नावली.....
१)देश स्वतंत्र कधी झाला?
२)स्वातंत्र्य म्हणजे काय?
३)देशाचे रक्षण कोण करते?
४)लो.टिळकांविषयी थोडक्यात माहिती लिहा.
५)शाळेत होणार्या ध्वजारोहणाविषयी दहा ओळी लिहा.
६)ध्वजारोहणाचेचित्र काढा,
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: *नागपंचमी*
नागपंचमीला नागाचे अनन्यसाधारण महत्च आहे.
आपण घरात नागाच्या प्रतिमेची पूजा करतो.काही स्त्रिया वारूळाला पूजनासाठी जातात.
लाह्या दूध याचा नैवैद्य अर्पण करतात.
*नाग शेतकर्याचा मित्र आहे* आणि काही धार्मिक परंपरा आहेत.यातील हा एक दिवस नागांच्या पूजनेचा.
*सर्पयज्ञाच्या सांगतेचा दिवस* : या दिवशी आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून जनमेजय राजाने सर्पयज्ञ करणे थांबवले आणि आस्तिक ऋषींनी विश्वातील सर्व नागांना अभय दिले.
*नागाच्या पूजनाचे महत्त्व :* शिवाने जेव्हा हलाहल विषाचे प्राशन केले तेव्हा त्याला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले आणि त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत. त्यांच्या पूजनाने चैतन्यलहरींना धारण करणार्या समुहाचेच पूजन होते.
*पूजनाचा विधी*
या दिवशी गारुडी लोक नाग आणतात. त्याची पूजा करून त्याला दूध देतात. घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी वाहातात.
याच बरोबर स्त्रिया मुलीहातावर छान मेंदी काढतात. छान छान कपडे घालून अलंकार घालतात.फेर धरतात.फुगड्या घालतात.
शाळेत देखील हा उपक्रम साजरा करतात.
*चल ग सये वारूळाला*
*नागोबाला पूजायला*
*प्रश्नावली*
१)नागपंचमी सणाचे महत्व सांगा?
२)घरोघरी या सणाला नागाचे पूजन कसे करतात?
३)शेतकर्याचा मित्र कोणाला म्हणतात?
४)नागोबाचे पूजन कसे करतात?
५)सर्व नागांना अभय कोणी दिले? कसे?
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: आत्मविश्वास.......
आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरील विश्वास....
' आत्मविश्वास ही दैवी देणगी आहे.' असे डाॅ.आंबेडकरांचे वाक्य आज आठवले.
कोणतेही काम करताना ते विश्वासाने करावे.पण ते करताना जर आत्मविश्वास ढासळला तर कोणतेही काम नीट होत नाही .
विविध पुस्तकांचेवाचन,नेटवर्क माध्यमातून मिळालेली माहिती,गुरूजनांनी शिकवलेले इत्यादी मधूनआपला
आत्मविश्वास वाढतो.
स्टेजडेअरिंग वाढते.बोलण्याची योग्य कला आत्मसात होते.
माझ्या स्वतःत आत्मविश्वास कमी होता.पण हल्ली या चार पाच वर्षात तो वाढलाय.
याचे कारण नेटवर्क. व्हाॅटसॅच्या माध्यमातून खूप काही शिकले.आणि त्याचा वापर वर्ग अध्यापन,भाषण,संभाषण या साठी केला.
नकारात्मक भुमिका मनातून बाहेर पडली.
आज ठाम विचाराने वागू शकते.
यासाठीआपला संपर्क वाढवावा.विविध संभाषणात सहभागी व्हावे.
प्रश्न.......
१)आत्मविश्वास म्हणजे काय?
२) आत्मविश्वासाबद्दल डाॅ. आंबेडकर काय म्हणतात?
३)आत्मविश्वास कसा वाढतो?
४)आत्मविश्वास नसेल तर काय होते?
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: *श्रावण*
श्रावण म्हटले की
'श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे ......'
ही कविता आठवते.
श्रावण महिना म्हटला की हा जणू काही बायकांचा सण आहे असे जाणवते . श्रावणामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा ,पारशी नववर्ष दिन ,ईद , अशा अनेक सणांची रेलचेल याच महिन्यातील आहे नागपंचमीला मुली बायका हातावर मेंदी काढतात . नवीन बांगड्या भरतात .असेच रक्षाबंधनाला हे असते . म्हणून वाटते की हा सण बायकांचा आहे.श्रावण महिन्यात श्रावणसरी बरसतात. आणि सगळीकडे पृथ्वी हिरवेगार झालेली असते .जणूकाही वाटते या वसुंधरेने हिरवी शाल पांघरली आहे .
शेतकरी शेतात पेरणी करतात. भातशेतीची लगबग चालू असते.
नागपंचमीच्या आधी पूर्वी झाडाला झोके टांगून मुली ,बायका झोके घेत असत.रात्री सर्वांची जेवण झाली की खेडेगावात बायका,मुली एकत्र यायच्या.गाणी म्हणायच्या,फेर धरायच्या ,फुगड्या घालायच्या,पारंपारीक खेळ खेळायच्या....खूप मजा यायची .
आजकाल हे सर्व लोप पावत चालले आहे पण शाळातून आजही हे उपक्रम आम्ही घेतो.तेवढेच मुलांना सणांची ,खेळाची माहिती होते.
श्रावणात काही जण पूर्ण महिना व्रत करतात.सोमवारचे व्रत बरेच जण करतात.शुक्रवारी जीवतीपूजन करतात.
असा हा सणांचा महिना,व्रतांचा महिना मला फार आवडतो.
आला श्रावण श्रावण
बरसल्या श्रावणधारा
सुटला थंड वारा
येतो तनूस शहारा....
*प्रश्न.....,*
१)श्रावणातील सण लिहा.
२)पूर्वी सण कसे साजरा होत?
३)नागपंचमीची माहिती लिहा.
४)नारळी पौर्णिमेचेमहत्व सांगा
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 11:49 AM] Vasudha Naik: *लता मंगेशकर*
एक प्रसिद्ध गानसम्राज्ञी....
लता मंगेशकर अवघ्या पाच वर्षांच्या असल्यापासून गाणे म्हणायला लागल्या.दीनानाथ मंगेशकर यांची ही कन्या.घरातच गायक असल्याने फार लहानपणापासून त्यांनी तंबोरा हाती घेतला.बाबांच्या सानिध्यात गायनाचा रियाज चालू केेला.
त्या लहान असतानाच दीनानाथांना देवाज्ञा झाली.त्या घरातील मोठ्या म्हणून घराची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली.
" प्रभात" फिल्म इन्सिट्यूट मधे कामाला लागल्या.हळूहळू त्या मोठ्या गायक बनल्या.त्यांच्या मागे तीन भगिनी व एक भाऊ ,आई यांची जबाबदारी होती.वडिलांमागे त्यांनी घर छान सांभाळले.
जवळ जवळ चारशे चित्रपटात त्यांच्या आवाजातील गाणी आहेत.त्यांच्या आवाजअति सुंदर ,त्या मुळे त्यांना "गान कोकिळा' हा पुरस्कार दिला .आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' या सन्मानाने त्यांचा गौरव केला.
याची 'गिनीज वर्ल्ड बूक' मधे द झाली आहे.
आज लता मंगेशकर वयस्कर झालेल्या आहेत जवळ जवळ नव्वदीच्या घरात त्या आहेत.त्या मुळे त्या सहसा घराबाहैर पडत नाहीत. गाणे गात नाहीत.
यांना सर्वजण 'लतादीदी' या नावाने संबोधतात.
या गानसम्राज्ञीला माझा शतशः प्रणाम!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*प्रश्न*
१)लता मंगेशकरांना भारतातील कोणता सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला?
२)लता मंगेशकना लोक कोणत्या नावाने संबोधतात?
३)त्यांच्या भावंडाची नावे लिहा.
४)'गानसम्राज्ञी' हा किताब का दिला ?
५)लतादिदींच्या वडिलांचे नाव काय?
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:27 PM] Vasudha Naik: पावसाचे थैमान....
अरे अरे पावसा
थांब ना जरा
कामाचा माणूस
येवू दे घरा......
नदीच्या पाण्याला
पूर रे आला
मानवाला येण्याजाण्याचा
मार्ग बंद केला......
माणसांची घरे
पाण्यात गेली
पावसानं संपत्ती
वाहून नेली....
शेतकरी आता
खूप दुखावला
पावसावर आता
तो खूप रूसला....
पावसाने नुसता
हैदोस घातला
जनजीवनाला त्याने
विळखा घातला.....
श्रावण सरींनो
थांबा आता
सर्वांना किती
त्रास हो देता.....
जिकडेतिकडे
पाणीच पाणी
सावरायला आता
येतेय का कोणी?......
पूरग्रस्तांना आता
मदतीचा हात देवूया
माणूस म्हणून आपण
संकटसमयी कामी येवूया.....
वसुधा नाईक,पुणे....
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: *बालगीत*
*पाटी*
*प प पाटी*
*दे न मला आई*
*गिरवीन त्यावर*
*त त ताई......*
*पाटी आहे काळी*
*छोटी छोटी सान*
*आयत आहे ती*
*खूप खूप छान.....*
*शाळेला जाईन*
*मजेत पाटी मिरवीन*
*अ,आ इ,ई त्यावर*
*छान छान गिरवीन````*
*शाळा सुटेल जेव्हा*
*घरी आईबरोबर येईन*
*बाईंनी म्हटलेली गाणी*
*आजी,आजोबांना म्हणून दाखवीन....*
*_वसुधा नाईक,पुणे_*
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: बालकाव्य....
लंबी दाढीवाले बुवा
कैसे खीर पकायेगा
एसे खीर पकायेगा
बाट बाट के खायेगा.....
लंबी दाढीवाले बुवा
कैसे खीर पकायेगा
ऐसे खीर पकायेगा
डीश डीश मे खायेगा...,
लंबी दाढीवाले बुवा
कैसे खीर पकायेगा
ऐसे खीर पकायेगा
बकेट बकेट मे खायेगा.,.,,
वसुधा नाईच,पुणे
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: *नदीमाय*
उगम आहे तिचा
उंच डोंगरावर
उंचावरून येते ती
निळ्याशार पृथ्वीवर.....
नदीमाय आहे ती
माय समद्यांची
आख्ख्या जगाची
तहान भागवते पाण्याची....
आपल्या सोबत येईल ते
घेवून बरोबर जाते
नदीमाय कधीच
ना बोलते ना आनंदते...
कधी उद्रेक करते
कधी शांत वाहते
पाण्याचा झुळझुळ
आवाजकरत गाली हसते.....
ना दुर्गंधाची तक्रार
ना गढूळ पाण्याची भ्रांत
नदीमाय वाहते
संथ आणि शांत.....
सतत कामाचा ध्सास
तिच्याकडून शिकावा
वाट अडवून तिची
बंधारा पण बांधावा.......
देणे तिचा गुणधर्म
माहिती आहे जगाला
प्रेमाचा झरा तिचा
पाहून आनंद होतो मला.....
वसुधा नाईक,पुणे.
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: *बालगीत...,*
*मनीमाऊ*🐱
मनीमाऊ मनीमाऊ
काय करता?
डोळे मिटून छान
तुम्ही दूध पिता.....🐱
मनीमाऊ मनीमाऊ
काय करता?
घरात येवून
चिंटुशी छान खेळता....🐱
मनीमाऊ मनीमाऊ
काय करता?
गादीवर येवून
छान लोळता....,🐱
मनीमाऊ मनीमाऊ
काय करता?
चिखलाचे पाय
घरात का आणता?.....🐱
मनीमाऊ मनीमाऊ
काय करता?
म्याँव म्याँव करीत
घरभर हिंडता......🐱
वसुधा नाईक,पुणे
🐱🐱🐱🐱🐱🐱🐱🐱
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: *बालकाव्य*
*उंदीरमामा*
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
सोसायटीत तुम्ही येता
सर्वत्र धुमाकुळ घालता.....
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
घरात येवून तुम्ही बिळे करता
कपडे आमचे कुरतडून टाकता....
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
पार्कींगमधील गाडीचे काय करता?
गाडीची वायर कुरतडून का तोडता?....
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
कोट माझ्या बाबांचा फाडून टाकता
आवडीचे पुस्तक फाडून की हो टाकता.....
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
तुमच्यासाठी आता आणलाय पिंजरा
राहा आता जपून जरा,जपून जरा...
वसुधा नाईक,पुणे
(काल माझ्या सोसायटीत ठेवलेली फोर व्हिलरची वायर उंदरांनी कुरतडून खूप नुकसान केले.या वरून मला हे सुचले.)🙏🏻
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: आज मी एक विचार मांडणार आहे.सद्यस्थिती...
परवा माझ्या शाळेतील मुख्याध्यापकांनी मला वर्ग चालू असताना बोलावले. मला जावेच लागले.
जवळ जवळ अर्धातास आम्ही पहिलीच्या मुलांच्या अॅडमिशनविषयी आमची चर्चाचालू होती.पण वर्गाध्यापनाच्या वेळेत. माझाही जीव सततमुलांकडे लागला होता.एक तर ही लहान मुले त्यात वर्ग फूल भरलेला. मला मुलांची काळजी लागलेली होती कारण तीन,चार मुले फार अफाट आहेत.
मी नंतर वर्गावर आले तर मुले जरा गोंधळ करथच होती.पण मी दिलेला अभ्यास पूर्ण करून झाला होता. मग मी काय बोलणार?पण एक मुलगा 'साईराज' हापटकन मला बोलला.'बाई ,कुठे गेला होता आम्हांला सोडून.आम्ही अभ्यास कोणाला दाखवायचा?'
मला त्याचाराग नयेतात्याचे खूप कौतुक वाटले.त्याचा धाडसी स्वभाव आवडला.
आजची हीपिढीअशी Dearing बाजआहे.मला त्यांचे हे गुण खूप आवडतात.
पूर्वी जवळ जवळ सतरा वर्षापूर्वीचाअसाच एक अनुभव मला आला होता.तोपणशेअर करते.
इयत्ता चौथीला एक मुलगा माझ्या वर्गात नवीन आला.
मी शिकवत होते.तो अचानक बोलायला लागला तेही मोठ्याने...'बाई मला न मारावस वाटतय खूप'मी बोललेकाय? आणि कोणाला? का?
तो म्हणालाइथे कोणालाचनाही .पण मी जुन्या शाळेतहोतो त्या शाळेतील बाई तुमच्या सारखे शिकवत नव्हत्या. मला आज वाचतायेत नाही .तुम्ही शिकवायला लागल्यापासून मला थोड थोड जमायला लागलय.
त्या बाई नुसत्या शेजारच्या बाईंशीगप्पा मारायच्या. हेत्याचे ऐकूनमीच सुन्न झाले. काय बोलावे हेही सुचेना.
शेवटीमी त्याची समजूत काढली.बाईसर्वछानचशिकवतात.तू लक्षदिले नसेल.मी समजूत काढली .पण त्याला ते पटले नाही.
असे दोन वेगळे अनुभव आले.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: *बडबडगीत...*
*उपवास*
श्रावण महिना
आहे व्रतांचा
आईच्या माझ्या
आहे उपवासाचा.....
आईचा सोमवारी
असतो उपवास
उपवासाला आणते
ती रताळी खास....
रताळी किसते
त्याला वाफवते
त्यात गुळ घालून
गोडखीर बनवते.....
त्यावर साजूक तूप
पळीभर सोडते
मला खायला देते
मी पटकन संपवते....
रताळ आहे कंदमूळ
असे सांगते आई
रताळी खावून म्हणे
अंगी ताकद येई.....
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: *अष्टाक्षरी रचना....*
*फेर धरू पंचमीचा*
आला सण पंचमीचा
श्रावण मास सणांचा
सण हिंदोळे घेण्याचा
पाळणा होतो हर्षाचा.....
सर्व सख्या जमतात
वारूळाला हो जायला
दुध लाह्या नैवैद्याला
नागोबाला पूजायला....
झिम्मा फुगडी खेळती
फेर धरी पंचमीचा
फुगड्याही खेळतात
सडा शिंपी आनंदाचा.....
झोका झाडा टांगतात
रांगा पण लावतात
हिंदोळ्यावर सुखाने
झोकेही छान घेतात....
फेरात गोल फिरती
टाळ्यांचा ठेका धरती
अलंकार,पोशाखाने
सख्या छान सजतात.....
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: *मैत्री*
मैत्री
अल्लड अवखळ
पाण्यासारखी निर्मळ.....
मैत्री
सागरासारखी खोल
नाही त्याला मोल.....
मैत्री
मायेची हो बरसात
एकमेकांच्या अंतरात.....
मैत्री
जीवनाचे सुंदर पान
किती तरी छान.....
मैत्री
जसे पाव्यातील सूर
सर्वस्वी मधूर.....
मैत्री
सुवासिक फूल
नाही तिथे हूल......
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:29 PM] Vasudha Naik: सीता अन गीता....
शाळेला निघाली
सीता आणि गीता
दोघींची जमली
गट्टी हो आता....
दोघींनी धरले
एकमेकींच्या हाताला
तालात निघाल्या
मग शाळेला.....
शाळेत पोहोचल्या
वर्गात गेल्या
मित्रां समवेत
अभ्यासात रमल्या....
अभ्यास करून
दोघीही थकल्या
सर्वां बरोबर
खेळू लागल्या....
खेळ खेळून
खूप दमल्या
वर्गात येवून
निवांत बसल्या.....
बाईंनी मग
उपक्रम दिला
उपक्रमात मग
सहभाग घेतला.....
शाळा सुटली
घरी परतल्या
उत्साहाने सर्व
घरी सांगू लागल्या...
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:34 PM] Vasudha Naik: सुविचार....
🌷आपला वर्ग ,परिसर ,शाळा स्वच्छ ठेवा.
🌷पुस्तके आपली मित्र आहेत.
🌷देवापुढे सांज सकाळ ददिवा लावावा.
🌷रोज सकाळी व रात्री झोपताना दात स्वच्छ घासून धुवावेत.
🌷सुंदर अक्षर काढावे.
🌷प्राणीमात्रांवर दया करावी.
🌷 गूरूजनांचा आदर करावा.
🌷जेवताना हात स्वच्छ धुवून जेवावे.
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:34 PM] Vasudha Naik: *विषय - मी एक स्त्रीशक्ती....*
लवकर उठते
स्वयंपाक करते
घरचे आवरून
शाळेला जाते.....
परिपाठ घेते
मुलांना शिकवते
त्यांच्यावर उत्तम
संस्कार करते....
अभ्यास करतात
माझी मुले छान
उपक्रम करतात
असून जरी सान.....
अबला नव्हे सबला
मी आहे एक नारी
अध्ययन करते मी छान
ही चर्चा मुलांच्या घरी....
मी मुलांत रमते
छान आनंदी राहते
मग माझ्या मुलांना
मी खूपच आवडते.....
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:34 PM] Vasudha Naik: स्वप्नझेप.....
स्वप्नझेप माझी
अफाट उंच आहे
मुलांच्या साठी मी
अध्ययन करत राहे.....
स्वप्नझेप ही मला
जगावीशी वाटते
नयनात मी स्वप्न
मुलांच्या भरारीचे पाहते.....
भेटणार स्वप्नातला
विद्यार्थी हसरा
असेल तो लहान
अन लाजरा बुजरा.....
येणार्या या क्षणाला
सामोरी मी जाईन
स्वप्नझेपीची दुनिया
सत्यात मी जगेन....
छोटूच्या गोबर्या गाली
हसेल छान खळी
हौईल उत्तम नागरिक तो
स्वप्नजगात आभाळी....
वसुधा नाईक,पुणे
-------------------------------------------
[8/12, 12:34 PM] Vasudha Naik: *वृक्षारोपण*
झाडे लावूया
ती जगवूया
दाह ऊन्हाचा
कमी करूया.....
डोंगर माथी
झाडे लावली
फळे व फुले
त्यास फुलली....
त्या माळरानी
फुले फुलती
निसर्गाची ती
किमया होती.....
झाडे लावूनी
मिळे सावली
विसावा मग
घेते माऊली....
झाडांची फुले
हो सुगंधीत
मन अंतरी
होय गंधीत.....
वृक्ष महिमा
वर्णावा किती
वृक्षवल्ली ही
सांभाळी नाती.....
वसुधा नाईक,पुणे
[8/12, 12:34 PM] Vasudha Naik: १)शालेय परिपाठात
विद्यार्थी रमतात
उपक्रम प्रकल्पही
छान करतात....
२)आनंदी शिक्षणाची
घेवूया ज्योत हाती
ज्योतीने पेटवूया
साक्षरतेच्या पणती....

2 comments:
Nice vasu👌👌👌👌👌
मस्त वसुधा...����
Post a Comment