Tuesday, February 28, 2017

इकडे लक्ष दया
आता मुलांच्या परिक्षांचे  दिवस आहेत
1) पालकांनी घरात भांडू नये
2) एकाच वेळी भरपेट जेवण मुलांना खाऊ घेतल्यास आळस येईल (दुपारी झोपायची सवय लागेल)
3) थोड्या थोड्या अंतराने घरातील अन्न पदार्थ मुलांना द्यावेत
4) शक्य असल्यास रोज एक फळ खावे
5) हॉटेल किंवा बाहेरील खाणे टाळावे
6) रोज 10 सूर्यनमस्कार पालकांनी घालावेत सोबत मुलांनाही घ्यावे
7) मैदानी खेळ मुलांनी खेळू नयेत (शरीराला ईजा होऊ शकते)
8) हॉल तिकिट च्या Xerox काढून ठेवा( एक हरवल्यास कामी येईल)
9) कंपास मधील साहित्याचे 2 set तयार ठेवा. काही हरवल्यास अचानक पळापळ होणार नाही
10) बॉल पेन वापरणाऱ्या मुलांनी 4 पेन तयार ठेवा (शाई चे वापरणाऱ्या मुलांनी 2 पेन)
घरी बोलपेन चा सराव 20% शाई संपे पर्यन्त करा. मग दूसरे पेन घ्या (परीक्षेत नविन पेन नी लिहिल्यास वेग (speed) कमी होतो. त्या मुळे रुळलेले पेन तयार ठेवा)
11) आपले मन शांत असल्यास अभ्यास चांगला लक्षात रहातो या काळात कुणाशीही भांडू नका, वाद-विवाद टाळा
12) जेव्हा कंटाळा येईल (बोअर होईल), अभ्यास होणार नाही अशा वेळी
1,2,3,4,5,6,7,8,9.0 हे आंकड़े सुवाच्च अक्षरात लिहा (गणिताच्या पेपर मधे आंकड़े चांगले येतील),
आकृत्यां चा सराव करा
गणिता मधील formula लिहून काढ़ा
13) पालकांनी दुसऱ्या मुलांची तुलना आपल्या पाल्यासोबत करणे टाळावे.
14) स्वच्छ पांढरे ब्रांडेड खोड-रबर वापरावे
15) लीड पेन्सिल वापरा (लाकड़ी कव्हर असलेली पेन्सिल मुले ब्लेड ने खुर करतात) यात बोटाला जखम होऊ शकते व परिक्षेतील वेळ पेन्सिलला खुर करण्यात वाया जातो
16) सगळीच मुले डॉक्टर-इंजिनियर होत नसतात
इतरही खुप क्षेत्रात चांगली नौकरी आणि पैसे मिळू शकतात
17) कदाचित आपला मुलगा यशस्वी उद्योजक बनेल
18) ही परीक्षा आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही
19) अपयश आले तर स्वतः घाबरू नका आणि दुसऱ्याला घाबरवू नका
20) झालेल्या पेपर ची चर्चा करीत बसु नका
21) व्यवस्थित समास सोडा
22) सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा
23) सुबक आकृत्या काढ़ा, जिथे गरज असेल तिथे.
24) शेवटची 15 मिनिट पेपर तपासण्या साठी ठेवा.


RELAX व्हा
त्यांना प्रोत्साहन द्यावे
प्रयत्न करण्यास प्रवृत्त करावे

आपण यशस्वी होणारच
--------
       *~आपला हितचिंतक~*,
        *राहुल सुधाकर पाटील*

शालेय अभिलेख

 शालेय अभिलेख .
शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखेप्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे प्रमाणीत करावा.प्रमाणपत्रप्रमाणीत करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये क्रमांक १ ते ....... इतकीपृष्ठे आहेत.मुख्याध्यापकस्वाक्षरी व शिक्का
विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे
१ जनरल रजिस्टर
२. पालकांचे प्रतीन्या रजिस्टर
३. विद्यार्थी हजेरी
४. शाळा सोडल्याचे दाखले फाईल
५. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
६. सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदवही
७. विद्यार्थी प्रगतिपत्रक
८. संचयी नोंदपत्रक
९. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल
१०. आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती
११. अस्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१२. मोफत गणवेश / लेखन साहीत्य वाटप रजिस्टर
१३. पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर
१४. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर
१५. शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या
१६. विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका
१७. अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१८. विद्यार्थी उपस्थिती, दैनिक गोषवारा रजिस्टर
१९. अल्पसंख्याक विद्यार्थी पटसंख्या रजिस्टर
२०. शालेय मंत्रीमंडळ सभा नोंदवही
मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेख
१.शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी हजेरी
२.शैक्षणिक साहीत्य नोंद रजिस्टर
३.ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर
४.मुख्याध्यापक लोगबूक
५.सूचना वही
६.शैक्षणिक साहीत्य देवघेव रजिस्टर
७.शिक्षक वैयक्तिक माहिती फाईल
८.शिक्षक रजा फाईल ( नैमित्तिक व दिर्घ्र रजा)
९.शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर
१०.पटनोंदणी सर्वेक्षणरजिस्टर
११.पालक भेट रजिस्टर
१२.परिपाठ \ सहशालेय उपक्रम नोंदवही.
१३.आकाशवाणी \ दूरदर्शन \ आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर.
१४ .ग्रंथालय नोंदवही.
१५.उशिरा येणाऱ्या शिक्षक \ कर्मचाऱ्याकरिता नोंदरजिस्टर \ लेट मस्टर .
१६.सेवापुस्तिका .
१७.गोपनीय अहवाल.
१८. खेळाच्या साहित्याची नोंदवही.१९. माझी समृद्ध शाळा श्रेणी नोंद रजिस्टर.
२०. शाळेला मिळालेल्या परितोषिकाचे नोंद रजिस्टर.
२१. नियतकालिक वितरण पत्रकाची नोंदवही.
२२. नेमणूक, बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती ,रुजुअहवालनोंदवही.
२३. प्रकरनिका नोंदवही (विभागीय चौकशी ,लोक आयुक्त प्रकरण इ.)
२४. न्यायालीयन पत्रव्यवहार नोंदवही.
२५. भ.नि .नि. नोंद रजिस्टर (भविष्य निर्वाह निधी)
२६.आयकर विवरणपत्र / व्यवसायकर फाईल.
२७. बिंदुनामावली (रोस्टर )
२८. माहिती अधिकार बाबत फाईल.२९. आवक- जावक रजिस्टर
.३०. शालेयसमिती इतिवृत्त रजिस्टर (खा. व्यवस्थापनाचे शाळांकरिता)
३१. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर
३२. माता- पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३३. शिक्षक–पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३४. पदभार (चार्ज ) देवघेव रजिस्टर (चार्ज रजिस्टर)
३५. शाळा विकास आराखडा फाईल .
३६. जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (U-DISE) प्रपत्र.३७. शासकीय आदेश \ परिपत्रक फाईल .३८. अभिप्राय रजिस्टर ( अधिकारी ) (अ).३९. अभिप्राय रजिस्टर (पदाधिकारी) (ब )
४०. हालचाल रजिस्टर ( शिक्षक \ मुख्याध्यापक \ कर्मचारी)
४१. वार्षिक तपासणी \ शाळा तपासणी अहवाल फाईल .
४२. मासिक अहवाल फाईल .
४३. शिक्षक \ मुख्याध्यापक संचिका.
४४. शिक्षक सहविचार सभा
 रजिस्टर.
वित्तीय संदर्भातील अभिलेख.१1)जमाखर्च व पावती फाईल
अ)जमाखर्च नोंदवही.
ब) पावती फाईल.
क) दरपत्रके(कोटेशन) फाईल .
द) स्टोक बुक नं.३२.
इ) स्टोक बुक नं. ३३.ई) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.प) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर.फ) लेर (खतावणी)
४५. स्थावर मालमत्ता रजिस्टर (प्रोपटी फाईल )
४६. पगारपत्रकफाईल.
४७. वेतनेतर फाईल .
२) सर्व शिक्षा अभियान अनुदानअ) जमाखर्च नोंदवही.आ) लेजर रजिस्टर (खतावणी )इ) पावतीफाईलई) दरपत्रके (कोटेशन) फाईल.उ) स्टोक बुक नं.
३२.ऊ) स्टोक बुक नं .
३३ए) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.ऐ) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर
४८. दूरध्वनी, फक्श, संदेश , रजिस्टर .
४९. विधानसभा व विधान परिषद प्रश्ननोंद रजिस्टर.
५०. शालेय पोषण आहार वितरण
५१. शालेय पोषण आहार कामगारांचे हजेरी रजिस्टर

Sunday, February 26, 2017

https://youtu.be/VM0VkZHlxCs

एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी(NEFT,RTGS,Fund transfer) त्यासाठी नेट बँकिंगच्या सहाय्याने आपल्या खात्यात *बेनेफीसीअरी खाते कसे समाविष्ट करतात.*

Thursday, February 23, 2017

*शाळासिध्दी* मुख्याध्यापकांना विनंती आहे की, शाळा सिध्दी बाबत अडचणी, समस्या , शंका असल्यास प्राधान्यक्रमाने मदत घेऊन सोडवाव्यात....
१) शाळासिध्दी पुस्तिकेचा अभ्यास करावा,
२) ७जानेवारी २०१७ शासन निर्णयाचे वाचन करावे. ३)shaalasiddhi.nuepa.org पोर्टलची मदत घ्यावी,
४)सहकारी शिक्षकांचा सल्ला घ्यावा.
५)सारसार विचार करून वस्तूस्थितीनुसार निर्णय घ्यावा.
६) पोर्टलवर स्वयं मूल्यमापन केलेले रिर्पोट नमन्या दाखल पहावे. Report. Self evaluation report...
७)शेजारी शाळा / तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी.
८) शाळासिध्दी मार्गदर्शक/ केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा.
९)आपल्या कार्यक्षेत्रातील साधनव्यक्तीशी संपर्क साधावा.
१०) आपल्या तालुक्याच्या संपर्क अधिकारी (Nodal officer) /निर्धारक संपर्क साधावा.
११)मा. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
१२) जिल्हा संपर्क अधिकारी 9850448042/ मा.शिक्षणाधिकारी यांची मदत घ्यावी.
१३) जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था DIECPD
१४) राज्य संपर्क मा.अधिकारी असिफ शेख 9860388096 / मा. संचालक, विद्या प्राधिकरण, पुणे.
१५) nuepa नवी दिल्ली पोर्टलवरील नंबरवर फोन करावा.

Tuesday, February 21, 2017

*परिक्षा तोंडावर आली असताना पालकांनी काय करावं व काय करू नये याविषयी थोडंस....*

**काय करू नये....

1 - सकाळी उठल्या बरोबर "परिक्षा तोंडावर आली आहे आणि यांना झोपा सुचताहेत" असं म्हणू नये.
2 - चहा नाश्ता झाल्याबरोबर लगेच "चला आवरा आता, कालची रिव्हीजन करा" असं म्हणणं टाळावं.
3 - जेवताना अभ्यासाचा विषय टाळावा. शेजारचा मुलगा/मुलगी किती वाजता ऊठतो/ऊठते हे वारंवार सांगू नये.
4 - लावलेल्या ट्यूशन क्लासच्या फी चा आकडा, आई-वडीलांनी घेतलेले कष्ट हे दिवसभर ऊठता-बसता सांगू नये.
5 - मुलगा/ मुलगी टिव्ही समोर थोड्या वेळ बसल्यास त्यांच्यासमोर डोळे मोठे करून येरझाऱ्या घालू नयेत.
6 - मुलाला/मुलीला रात्री अभ्यास करताना झोप येत असल्यास "मी दहावीत/बारावीत असताना पहाटे तीन वाजेपर्यंत अभ्यास करत होतो" असं खोटं सांगू नये.
7 - थोडा वेळ मुलांनी मोबाईल हातात घेतला तर हिसकावून घेऊ नये.
8 - दिवसभर अभ्यासाचा जप टाळावा.

**काय करावे....

1- सर्वप्रथम शांत रहाण्याची प्रॅक्टीस करावी.
2 - मुलांच्या आवडीचा स्वैपाक करावा.
3 - मुलं अभ्यास करताना थोडं सोबत बसावं. (आपलं व्हाँटस्अँप बाजूला ठेवून)
4 - अधून मधून प्रेमाने "मला माहीत आहे, तू यशस्वी होणारच" किंवा "काळजी करू नकोस, मी तूझ्या सोबत आहे" असं म्हणावं.
5 - अभ्यासाच्या मध्ये गंमतीजंमती सांगून वातावरण हलकं-फुलकं ठेवावं.
6 - एखादा पेपर कठिण गेल्यास त्यावर चर्चा करत न बसता पुढच्या पेपरच्या तयारीला लागावं.
7 - परिक्षा संपल्यानंतर आपण कशी मज्जा करणार आहोत याची स्वप्न रंगवावीत.
8 - सरतेशेवटी "हर बच्चे की अलग रफ्तार होती है" हे लक्षात ठेवावं. दहावी/बारावी ची परिक्षा हा आयुष्याचा एक टप्पा आहे, आयुष्य नाही हे लक्षात ठेवावं...

|| शुभमस्तु ||

Friday, February 17, 2017

*स्टेट बँक ऑफ इंडिया चे सेव्हिंग खाते (A/c) आता घरबसल्या उघडा {ONLINE}*
💻    🏦   💳
✍🏻 शब्दांकन:
विक्रांत पाटील (गुंड)
मोबा. नं. 9028551115
👩🏻‍💻
एरव्ही बँकेत खाते उघडण्यासाठी आपल्याला बँकेच्या पायऱ्या चकरा माराव्या लागतात, फॉर्म भरावा लागतो, साक्षीदार आणि त्याच्या अकाउंट ची माहिती द्यावी लागते.. परिणामी आपली मोठी दमछाक होते.
😒  😓  😢  😥   😰
*पण आता काळजी करू नका, आता तुम्हीच तुमचे नवीन saving account ओपन करू शकता*
.
😀होय...!!
.
*तेही खालील पद्धतीने..*
👇🏻 👇🏻 👇🏻 👇🏻 👇🏻 👇🏻 👇🏻
1⃣ सर्वप्रथम https://oaa.onlinesbi.com या वेबसाइटवर जा
2⃣ वेबसाईट ओपन केल्यावर homepage वर Opening Saving Bank Account for Residential असे दिसेल. त्यासमोर *Apply now* असे दिसेल, त्याला क्लिक करा.
3⃣ नेक्स्ट पेज ओपन झाल्यावर customer information service च्या खाली असलेल्या *start new* वर क्लिक करा
4⃣ आता ओपन झालेला फॉर्ममधील सर्व सेक्शन पूर्णपणे आणि अचूक भरा.
या फॉर्म मध्ये ज्याच्या नावाने खाते काढायचे आहे त्याचे
📌 नाव,
📌 जन्मतारीख,
📌 पत्ता,
📌 मोबाईल नं,
📌 आधार नं,
📌 pan नं (असल्यास)
📌 वारसदाराची माहिती
👆👆👆अशा गोष्टी अचूक भरा.
.
आपल्याला या खात्यासोबत हव्या असलेल्या
📌 ATM,
📌 चेकबुक,
📌 इंटरनेट बँकिंग
अशा सुविधा हव्या असल्यास फॉर्ममध्ये सांगितलेल्या ठिकाणी tick mark ✔ करा..
.
📑 फॉर्म चा पहिला टप्पा पूर्ण झाला की नोंदविलेल्या मोबाईल नं वर एक *TCRN* कोड येईल.
📑 हा TCRN वापरून फॉर्म चा दुसरा टप्पा भरा. त्यानंतर मोबाईल वर *TARN* कोड येईल.
5⃣ फॉर्म चे सर्व टप्पे भरून भरून झाल्यावर पुन्हा https://oaa.onlinesbi.com/oao/onlineaccapp.htm# या लिंक ला क्लिक करून home page ओपन करा.
6⃣ होमपेज वर दिसणाऱ्या *Download completed application* वर क्लिक करा. आपल्याला आलेला TARN आणि जन्मतारीख (D.O.B.) वापरून आपण भरलेल्या फॉर्म ची pdf file डाउनलोड करावी व ती प्रिंट करा।
*{Form भरल्यानंतर त्याची pdf तयार होण्यासाठी काही कालावधी लागतो त्यामुळे ही प्रोसेस थोड्या वेळाने करावी.}*
7⃣ प्रिंट काढल्यानंतर फॉर्म वरची माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
8⃣ फॉर्म मध्ये सांगितलेल्या ठिकाणी आपला फोटो चिकटवावा व सह्या/ अंगठे करा.
9⃣ हा भरलेला फॉर्म आणि रहिवाशी व पत्ता पुराव्याची xerox प्रत घेऊन जवळच्या SBI शाखेत जमा करा.
*फॉर्म जमा केल्यावर लगेच आपल्याला आपला saving account नंबर आणि पासबुक मिळेल* त्यावर फोटो चिकटवून बँकेतून स्टॅम्प मारून घ्या..
💳   💳   💳   💳   💳   💳
आपले ATM आपण नोंदविल्या पत्त्यावर 15-20 दिवसात पाठविले जाईल..
🕺
*बघा..*
*जमतंय का..*
*खूप सोप्प आहे....*👍👍👍
🔸🔸
✍🏻 शब्दांकन:
विक्रांत पाटील (गुंड)
मोबा. नं. 9028551115

Tuesday, February 14, 2017

U tube channel usmanabad

https://m.youtube.com/#/channel/UC2CkWuLYnLiFetfBqoigkTA?_e_pi_=7%2CPAGE_ID10%2C7034547983
*5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा hall तिकीट*

Hall Ticket print कशी काढावी?
▶ सर्व प्रथम browser मध्ये http://www.puppss.in/Default.aspx  असा वेब अड्रेस टाकून  search करावे.
▶ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चा home page आलेली असेल.
▶ त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक लिहावा.
▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.
▶ आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला एक chek box आलेला आहे त्यात क्लिक करावे.
▶ लॉगिन करावे.
▶ आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर pup  व pss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करावे.
▶ आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.
▶ त्याची प्रिंट काढून घ्या.

Monday, February 13, 2017

_अप्रगत विद्यार्थी साठी उप क्रम_*⚜ ⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇

👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕
 ⚜ *_अप्रगत विद्यार्थी साठी उप  क्रम_*⚜
⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇
‼ *@kishorrupnarayan amt,*‼
❇❇❇❇⚜❇❇❇❇
 १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे. ३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे. लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे. ३)समान अक्षर जोड्या लावणे. ४)शब्दांची आगगाडी बनवणे. ५)पाहुणा अक्षर ओळखणे. ६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे. ७)बाराखडीवाचन करणे. ८)बाराखडीतक्तेवाचन करणे. ९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे. १०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे. ११)कथालेखन करणे. १२)कवितालेखन करणे. १३)चिठठीलेखन करणे. १४)संवादलेखन करणे. १५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे. गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे २)वर्गातील वस्तु मोजणे ३)अवयव मोजणे ४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे ५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे. ६)आगगाडी तयार करणे ७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे. ८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे. ९)अंकाची गोष्ट सांगणे. १०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे. ११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे. १३)बेरीजगाडी तयार करणे. १४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे १६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे. १७)वस्तु निवडणे १८)पाणी पाटी १९)अक्षर देवून शब्द तयार करणे २०)चिठ्ठीतुन शब्द देवून पाच वाक्य सांगणे २१)शब्दकोडे सोडवणे २२)अक्षरगाडी उदा. कप ,पर ,रवा ,वात ई. २३)श्रुत लेखन सराव २४) अंकाच्यागाड्या २५)सम ,विषम संख्याच्या गाड्या २६)सुलभबालवाचन सराव २७)स्मरणावर आधारीत खेळ २८)दुकानातील ,घरातील बाजारातील ई. वस्तुंची यादी तयार करणे

Sunday, February 12, 2017

शब्दतारका

📖 *_मराठी वाचन - लेखन सरावाकरिता अतिशय  उपयुक्त आणि आकर्षक..._* ✍🏻

📚 *शब्दतारका संच भाग 1 ते 10*
    ☄ _...मातृभाषा विकसनाची एक नवी पहाट_☄

               _"आता प्रत्येक शाळेतील मूल शिकेल..._
                         _आवडीने मराठी वाचायला ..._
                               _आनंदाने  मराठी लिहायला "_

🔴 *सर्व भाग Download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*👇🏽

http://desaisachin.blogspot.in/2017/01/pdf-project-converted-in-pdf-to-use-on.html

Saturday, February 11, 2017

🚩🚩 *श्री छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त चारोळ्या* 📝
             भाग- २

शिव छत्रपती राजे
जिजाऊ पोटी अवतरले ।
मावळ्यांसव शौर्य करुनी
स्वराज्याचे तोरण बांधले ।।

शिवनेरीवर बाळ जन्मले
कार्य केले रायगडी ।
भगवा झेंडा फडकला
उभारली स्वराज्याची गुढी ।।

मालुसर्याच्या पोराचे
लग्न लावले थाटाने ।
गड आला.पण.सिंह गेला
उद्गार काढले भरल्या कंठाने।

सुभेदाराच्या सूनेची
भरली ओटी भूपतीने
मातेची उपमा देऊनी
सन्मान केला छत्रपतीने ।।

अशीच आमुची आई असती
सुंदर रुपवती ।
आम्ही सुंदर झालो असतो
वदले छत्रपती  ।।

आग्र्याच्या नजरकैदेतून
पसार झाले पेटार्यातून ।
तुरी दिल्या बादशहाला
युक्तिने सुटले वेढ्यातून ।।

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    🔰 *शब्दांकन आणि संकलन* 🔰

       *श्री नागरगोजे माणिक सर*
      *जिपप्राशा सोनपेठ परभणी*
     
          🔵समुह प्रशासक🔴

 🚩 *महाराष्ट्र सूत्रसंचालक समूह*🚩
           *समूह क्रमांक 1ते 11*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Friday, February 10, 2017

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे - सर्दी, खोकला, ताप येत नाही.
२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.
३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.
४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.
५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे. मुलांना देणे.
६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.
7) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे - पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे - पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे - अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.
8) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे - हाडे मजबूत होतात.
9) ऐकू न येणे - चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेम्ब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे
१0) वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे - हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.
१1) जुलाबासाठी - चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.
१2) नाकाचे हाड वाढणे - ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे
13) मुळव्याधासाठी - अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ - ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.
14 ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.
15) लिंबू खेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुले आलेल्या डागावर 1 मिनिटं चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.
16) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते.
17) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. Make अप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.
१८) पोटाच्या आजारावर - वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उढल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.
१९) कानाच्या पडद्याला भोक - उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.
२०) हात पायाला घाम येणे - सुपारीचे एक खांड - सकाळी व संध्याकाळी खाणे - १५ दिवस खाणे.
२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर - अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे - त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.
२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा - असे वर्धातून ४ वेळा ) केली तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.
जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत

https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing

1. अफझलखानाचा वध
2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास
3. आज्ञापत्र
4. आसे होते मोगल
5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार
6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
7. औरंगजेबाचा इतिहास
8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र
9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास
10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८
11. घोरपडे घराण्याचा इतिहास
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. तंजावरचे मराठे राजे
14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१
15. तेरा पोवाडे
16. दंडनीती
17. दिन-विशेष
18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक
20. पवनाकाठचा धोंडी
21. पानिपतची बखर
22. पुणे अखबार भाग १
23. पुणे अखबार भाग 2
24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २
25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३
26. पेशवाईचा मध्यान्ह
27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा
28. पेशवाईचे दिव्य तेज
29. पेशवाईच्या सावलीत
30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय
31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय
32. पेश्वीतील दुर्जन
33. पेश्वीतील धर्म संग्राम
34. पोर्तुगीज मराठा संबंध
35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान
36. ब्राम्हण
37. भगवान बुद्ध पूर्वार्ध
38. भाऊसाहेबांची बखर
39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२
40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास
41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप
42. मराठांच्या राज्य कथा
43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा
44. मराठी बखर गद्य
45. मराठी रियासत मध्य विभाग ३
46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी
47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी
48. मराठे सरदार
49. मराठ्यांची बखर
50. मराठ्यांचे साम्राज्य
51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९
52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०
53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८
54. महाराणा प्रताप
55. महाराष्ट्र इतिहासमंजरी
56. महाराष्ट्र दर्शन
57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख
58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )
59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल
61. महाराष्ट्रातील पुरातत्व
62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे
63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे
64. माठगावचा शिलालेख
65. मुंबई इलाख्यातील जाती
66. मुंबईचा मित्र
67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १
68. मुलखावेगळा राजा
69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य
70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८
71. मुसलमानी रियासत
72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २
73. मोगल दरबारची बातमीपत्रे
74. म्हणे लढाई संपली !
75. राजपूत संस्कृती
76. राजा राममोहन राय
77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती
78. रायगडची जीवनकथा
79. वंश आणि वंशवाद
80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९
81. शककर्ता शालिवाहन
82. शिव - चरित्र – निबंधावली
83. शिवकाल १६३० ते १७०७
84. शिवकालीन महसुल व्यवस्था
85. शिवराजभूषणम
86. शिवाजीचारित्र
87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र
88. श्री भाऊंच्या वीरकथा
89. श्री शिवभारत
90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग
91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर
92. श्रीमछत्रपति शाहूमहाराज
93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे
94. सनपुरिचि बखर
95. समरांगण
96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले
97. स्थलनामकोश
98. हि रामाची आयोध्या
99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०
100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त
101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम

Thursday, February 9, 2017

श्री गजानन महाराज यांच्या विषयी माहिती

श्री गजानन महाराज यांच्या विषयी माहिती

जय गजानन

श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. परंतु गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,
"कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥"


जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, - "दंड गर्दन पिळदार। भव्य छाती दृष्टी स्थिर। भृकुटी ठायी झाली असे॥" जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या* अवस्थेत होते . (तुर्या* अवस्था : जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणगे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर। झाले असे पंढरपूर। लांबलांबूनीया दर्शनास येती। लोक ते पावती समाधान॥,"

बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात. शेगांवात राहून महाराजांनी अनेक लीला करून लोकांचे कल्याण केले व त्यांना भक्तीमार्गाला लावले.

सद्‌गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते. या संदर्भात असे सांगितले जाते की ज्या दिवशी तरूण वयातील गजानन महाराज श्री स्वामींना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते त्यादिवशी श्री स्वामी अतिशय आनंदात होते. तसेच दुरून गजानन महाराजांना (१७-१८ वर्षे वयाचे) येताना पाहून ते अतिशय आनंदाने उद्गारले, "गणपती आला रे!" त्यावर त्यांनी गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत केले. असे सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःजवळ ठेऊन घेतल्यानंतर श्री स्वामींनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले . त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले .

जेव्हा श्री गजानन महाराजांनी आपल्या अवतारसमाप्तीची वेळ ठरवली, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु श्री विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला
समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले,

"आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"

लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.

त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.

त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला,

"जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||,"

आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना

"अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!"

असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंका नाही.

त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.

०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.

देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, "मी गेलो ऐसे मानू नका। भक्तित अंतर करू नका। कदा मजलागी विसरु नका। मी आहे येथेच॥" "दु:ख न करावे यत्किंचित। आम्ही आहोत येथेच। तुम्हा सांभाळण्यापरी सत्य। तुमचा विसर पडणे नसे॥." त्यामुळेच जरी गजानन महाराजांनी समाधी घेतली तरी आजही त्यांच्या भक्तांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

श्री गजानन महाराज यांच्या विषयी काही विशेष

श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते (आहेत) आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच म्हणावे लागेल. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जातात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जातात, असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. सर्व भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करतात असा सर्व भक्तांचा अनुभव आहे. "गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वऱ्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, "मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||." ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.

शरीरयष्टी ::--

सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देह चर्या. लांब लांब पावले टाकीत सदान्‌कदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती, पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..

अन्नसेवन::--

महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती.

महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन - चार दिवस उपाशी राहावे . भक्तांकडून येणारेपंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही सेवन करावे. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.

मुळ्याच्या शेंगा , हिरव्या मिरच्या , पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात . महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत,



१. महाराजांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रक टिपू न शकणे

त्यांचे सत्यस्वरूप कोणताही छायाचित्रक (कॅमेरा) टिपू शकला नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रत्येक वेळी काढलेले त्यांचे छायाचित्र वेगळेच निघायचे; म्हणून महाराजांचे एकही छायाचित्र दुसर्‍या छायाचित्राशी जुळत नाही.



२. महाराजांचा द्रष्टेपणा !

प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला. त्यांच्या या शिकवणुकीची आवश्यकता आज भासतच आहे. संत किती द्रष्टे असतात ? याचीच ही प्रचीती आहे.

३. सर्व विषयांत पारंगत असणारे श्री गजानन महाराज !

महाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आदी भाषा अवगत होत्या, तसेच सर्व विषयांचे ज्ञानही होते. समोरच्या व्यक्तींची योग्यता ओळखून महाराज त्या व्यक्तीशी संभाषण करत असत. खरा जिज्ञासू समोर आल्यास त्याची जिज्ञासा त्यांच्याकडून शमवली जात असे. कला आणि संगीत यांचीही त्यांना आवड होती. ते विविध रागांत स्वतः भजने आणि पदे म्हणत असत. त्यांना गातांना पाहून खरा गायकही प्रभावित होत असे. त्यांचा वेद आणि ऋचा यांचाही दांडगा अभ्यास होता.

४. महाराजांच्या आवडत्या गोष्टी

भोलानाथ दिगंबर हे दुःख मेरा हरो रे । चंदन, चावल, बेलकी पातियां शिवजीके माथे धरो रे ॥ हे संत मीराबाईचे पद महाराजांना फारच आवडायचे. हेच पद ते सतत म्हणायचे.
महाराजांना लाकडी पलंगावर बसायला फार आवडत असे; म्हणून शेगावी त्यांचा हा पलंग संस्थानाकडून भक्तांच्या दर्शनार्थ ठेवला आहे. गण गण गणांत बोते असे ते सतत गुणगुणायचे; म्हणूनही लोक त्यांना गजानन महाराज असे म्हणतात.

५. भक्तांच्या उद्धारासाठी गावोगावी भ्रमंती करणे

भक्तांच्या उद्धारासाठी त्यांची गावोगावी सारखी भ्रमंती चालूच असायची. कुणीही त्यांना आपल्या घरी थांबवून ठेवू शकत नसे.

६. महाराजांनी केलेले विविध चमत्कार !

त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनात अनेक चमत्कारांचा अनुभव अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे. दुखण्यातून बरे करणे, कोरड्या विहिरीला पाणी आणणे, कावळ्यांना पुन्हा न येण्यास सांगणे, आगगाडी रोखून धरणे, भक्तांना नर्मदा नदीचे दर्शन घडवणे, महारोग्याचा रोग बरा करणे, द्वाड गाय आणि घोडा यांना शांत करणे, भक्तांना विठ्ठलाचे अन् रामदास स्वामींचे दर्शन घडवणे, पितांबर या शिष्याचा उद्धार करणे, वाळलेल्या आंब्याच्या झाडास हिरवी पाने आणणे, जळत्या पलंगावर बसणे, मधमाशांनी चावा घेऊनही अंग सुरक्षित असणे, ब्रह्मगिरीच्या गोसाव्याचे गर्वहरण करणे, ऊसाच्या काठीचा मार सहन करणे, पहिलवानाला पाय उचलू न देणे, चिलीमसमोर नुसती काडी धरताच चिलीम पेटणे, असे चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत.

७. देश-विदेशातील भक्तांना महाराजांच्या कृपाशीर्वादाची अनुभूती देणारी विदर्भाची पंढरी !
श्री गजानन महाराजांच्या संदर्भात लक्षावधी लोक प्रतिदिन अनुभूती घेत असल्यानेच त्यांच्या दर्शनार्थ शेगावात भक्तांची मुग्यांसारखी गर्दी होत आहे. विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विदेशातही महाराजांचे भक्त त्यांच्या कृपावर्षावाचा नित्य अनुभव घेत आहेत. हीच खरी लीला ! त्यामुळे आजही शेगावचे गजानन महाराज मंदिर हे विदर्भाची पंढरी म्हणून गणले जाते. शेगावी जाताच श्री महाराजांच्या चरणी मस्तक विनम्र होते. गजानन महाराज की जय असा जयघोष करून लोक स्वतःला धन्य समजतात.

॥ गण गण गणांत बोते ॥

॥ जय गजानन ॥

Tuesday, February 7, 2017

ब्लॉग बनवू चला

【🇬 🇺 🇷 🇺 🇲 🇦 🇺 🇱🇪 🇪】
    ™ *ब्लॉग बनवू चला - भाग पाचवा* ™
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
              https://goo.gl/wIyh1z
👉🏾 *विषय - ब्लॉग ची हेडर इमेज मोबाईलवर कशी तयार करायची व अॅड कशी करायची*
🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈🏳‍🌈
        *आता ब्लॉग बनवा मोबाईलवर*

            *सहज व सोप्या पद्धतीने*

     *आकर्षण इफेक्ट्ससह व्हिडिओ पहा*

         *ब्लॉग बनवा व रिप्लाय कळवा*
_अनेक गुरुमाऊलींकडे लॅपटॉप व कंप्युटर नाहीत. त्यांच्या शाळेतील उपक्रम इतरांना समजण्यासाठी ब्लॉग असणे आवश्यक आहे.याच उद्देशाने मोबाईलवर सहजरीत्या ब्लॉग कसा बनवायचा यासंदर्भात मी व्हिडिओ मालिका बनविली आहे.आपल्याला या व्हिडिओद्वारे ब्लॉग बनविणे सुलभ होईल._
*निर्मिती -* प्रविण डाकरे प्राथ.शिक्षक ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली
मुळ गाव - सिमालवाडी ता.भुदरगड जि.कोल्हापूर
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
खालील लिंक वर तुम्ही हा व्हिडिओ डाऊनलोड करून मोबाईलवर पाहू शकाल.. 👇🏻
🎴 *ब्लॉग बनवू चला -भाग पाचवा* 🎴

        https://goo.gl/wIyh1z

🎴 *ब्लॉग बनवू चला - भाग चौथा*🎴

        https://goo.gl/27ozaM

🎴 *ब्लॉग बनवू चला - भाग तिसरा*🎴
       
        https://goo.gl/sCKKAM

🎴 *ब्लॉग बनवू चला - भाग दुसरा*🎴

        https://goo.gl/fgBimv

🎴 *ब्लॉग बनवू चला - भाग पहिला*🎴

        https://goo.gl/kGPx4h

  📲   🇵 🇷 🇦 🇻 🇮 🇳   📲📲
  📲   🇩 🇦 🇰 🇦 🇷 🇪   📲📲
 9⃣4⃣ 2⃣3⃣3⃣0⃣ 9⃣2⃣1⃣4⃣
 ▶▶▶   *Share to all*   ▶▶▶

विचारमंथन

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
                   *विचारमंथन*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/43CeNnzWLXc2sDezNWxGSc
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/0JBwgNorYx3JZ5gfdMNCHy
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

Sunday, February 5, 2017

Wednesday, February 1, 2017

अभ्यास कसा करावा ?
🍁🍁🍁🍁
प्रस्तुत लेख "विद्यार्थ्यांसाठी मनाच्या एकाग्रतेचे रहस्य" या रामकृष्ण मठाने प्रसिध्द केलेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या पुस्तिकेवर आधारित आहे.
🍁🍁🍁🍁
कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.
मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करुन घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्यायदेखील नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करुन घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.

🍁🍁🍁🍁
स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते.
योगी जन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करुन घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करुन परमसत्याची प्राप्ती करुन घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे.
🍁🍁🍁🍁
१. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा, विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे.
🍁🍁🍁🍁
२. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे. सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे.

🍁🍁🍁🍁
३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंत:चक्षुंसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात, व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते.

🍁🍁🍁🍁
४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो तसेच हे आहे. वॉर्म अप व काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो.
🍁🍁🍁🍁
५. अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन "तासभर तरी मला बोलावू नका" असे सांगून ठेवावे. मोबाईलसारखे अडथळेही दूर ठेवावेत. कारण अशा अडथळ्यांमुळे मनाची एकाग्रता भंगते व ती पुन्हा प्राप्त करायला कष्ट पडतात. मनाची साधलेली प्रवाही अवस्था आपण गमावून बसतो. आणि पुढच्या वेळी ती अवस्था तेवढ्या प्रभावीपणे साधतही नाही.

🍁🍁🍁🍁
६. अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणे अतिशय गरजेचे आहे. मनाला विचलीत न करणारे संगीत एकाग्रता वाढायला मदत करते. अर्थात इच्छा तीव्र असेल तर गोंधळातदेखील एकाग्रता साधता येते. इंद्रियांवरचे असे नियंत्रण अभ्यासाने साधता येते. शक्यतो शांतता मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे अशांतता निर्माण होत असेल तर त्या अशांततेतही एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करीत रहावे. क्षुब्ध होउ नये किंवा निरर्थक वादविवादात वेळही घालवू नये.

🍁🍁🍁🍁
७. अभ्यास करताना अवधान राखणे खूप गरजेचे आहे. मन चंचल असते, उगीच कुठेतरी भटकत राहते किंवा दिवास्वप्नांमध्ये मग्न होते. त्याला आवर घालून पुन्हा अभ्यासाला लावणे म्हणजे अवधान राखणे.
मनाला जागे ठेवण्याचे काही उपाय खाली सांगीतले आहेत :
अ. अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अतिस्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येते.
आ. शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात. झोपायचा बिछाना व पांघरुण देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे, त्यामुळे झोप शांत मिळून मन प्रसन्न राहिल. इ. अभ्यासाची खोली, अभ्यासाची साधने (वह्या, पुस्तके, लेखनसाधने तसेच आपले हस्ताक्षरही) व्यवस्थित व नीटनेटकी असावीत. पुस्तके फाटली असल्यास ती व्यवस्थित शिवून घ्यावीत. पुस्तकांचा कप्पा, अभ्यासाचे टेबल व्यवस्थित आवरलेले असावे.
ई. घाणेरड्या व अश्‍लील विचारांना प्रयत्नाने मनाबाहेर करावे. मन गलीच्छ विषयांनी व्यापलेले असेल तर एकाग्रता कधीही साध्य होणार नाही. शुध्द, निष्पाप मनामध्येच एकाग्रतेची शक्ती सहज येते. म्हणून पापी व दुष्ट विचारांना दूर ठेवावे.
उ. लहान लहान ध्येये ठरवून ती साध्य करावीत. म्हणजे आत्मविश्वासात भर पडून एकाग्रता वाढत जाईल.

🍁🍁🍁🍁
८. चकाट्या पिटण्याची सवय पूर्णत: सोडावी. ज्या विषयाशी आपल्याला काहीही घेणेदेणे नाही, ज्या विषयाशी संबंधित कोणतीही कृती आपण करणार नाही त्या विषयाबद्दल बडबड करुन आपल्या तोंडाची वाफ दवडू नये. अशा निरर्थक बडबडीमुळे मनाची घडी व शिस्त बिघडते. मन दुबळे व गैरशिस्त हात जाते.

🍁🍁🍁🍁
९. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यावर डोके दुखत असेल तर तो शरीराचा दोष आहे हे ओळखून, योग्य व्यायाम, आहार व वैद्यकिय उपचार यांनी तो दूर करावा. च्यवनप्राश, ब्राह्मी सारखी औषधे, दूधासारखा पौष्टिक आहार यांचाही उपयोग होउ शकतो.
१०. मनाच्या एकाग्रतेसाठी सर्वोत्तम पुरक साधन म्हणजे श्रध्दा. श्रध्देच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते. श्रध्देच्या जोरावरच शिवरायांच्या मावळ्यांनी शून्यातून स्वराज्य उभारले. औरंगजेबाची अफाट सामर्थ्यशाली सेना युद्ध हारली ती देखील श्रध्देच्या अभावामुळेच. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञानसंपादनाची अफाट शक्ती सुप्तावस्थेत दडून असते. आपल्या अंतस्थ शक्तीबाबत आपण साशंक राहू नये. जीवनात अपयशी ठरणारी माणसे अपयशी ठरतात ती स्वत:ची शक्ती न ओळखल्यामुळे. "काळजीपूर्वक अभ्यास करुन मी माझ्या ज्ञानाचा विकास करुन घेईनच" अशा निर्धाराने अभ्यासाला लागलात तर अशक्य काहीच नाही.

🍁🍁🍁🍁
११. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपल्या आवडीच्या ठिकाणी वास करणे मनाला नेहमी आवडते. अर्थात तुम्ही जर तुमच्या अभ्यासविषयांवर प्रेम कराल तर एकाग्रतेने अभ्यास करणे तुम्हाला सहज जमेल. परिचय, सहवासानेच प्रेम वाढते. म्हणून अभ्यासाचे विषय तुम्हाला लगेच आवडू लागतील असे नव्हे. पण अभ्यासाचा विषय जसा कळू लागेल, आकलन वाढू लागेल तशी अभ्यासाची गोडी आपोआप वाढेल. श्रध्दा आणि प्रेम यांद्वारे साधली जाणारी मनाची एकाग्रता ताणर‍हित व संघर्षरहित असते.


- महाएज्युटेकनेट टीम

प्रस्तुत लेख "विद्यार्थ्यांसाठी मनाच्या एकाग्रतेचे रहस्य" या रामकृष्ण मठाने प्रसिध्द केलेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या पुस्तिकेवर आधारित आहे.

साभार🍁