चारोळी~सई

[09/02, 6:57 PM] Sayali Mam: पहाटेच्या शृंगाराला
लाजली ही रात होती
ओल्या दवातील प्रितीला
किरणांची मग आस होती
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: पाण्याला ही एकदा
लागली होती तहान
नाही मिळाले पाणी
अश्रु ठेवावे लागले गहांन
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: वाट तुझी पाहण्यात
सरल होत वय माझ
किती बुजवनार सख्या
तुझ्या आठवणींची ओझ
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: आठवण तुझी येते आणी
अश्रुंना वाव मिळतो
डोळ्यातील प्रत्येक थेंब
प्रतीक्षा ही तुझीच करतो
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: विसरायच ठऱवलय मी
तुझ्या आठवणीतल्या क्षणांना
तुझ्या सोबत घालवलेल्या
अप्रत्यक्ष भावणांना
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: वाटल होत कधी तरी
भावना तुला कळतील माझ्या
सार विश्व सोडुन मग
येउन बसाव पुड्यात तुझ्या
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: ओल्या सांज वेळी
रात काजव्यांची जत्रा
चकाकल हे आभाळ सार
तरी ही जिव होता माझा भित्रा
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: सरणालाही आता सवय
झाली जळण्याची
किती ही आकांत पहीला तरी
शांत पेटत राहण्याची
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: हृदयात एक कप्प्पा
माझा म्हणुन ठेवला होतास
झाले ग काळजाचे टुकड़े माझे
जेंव्हा जवळ तू त्याला केला होतास
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: हृदयात एक कप्प्पा
माझा म्हणुन ठेवला होतास
झाले रे काळजाचे टुकड़े माझे
जेंव्हा जवळ दुसरीला करत होतास
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: प्रेम केलय ज्याच्यावर
त्याला माझी किम्मत नाही
नात्यांची विन का सोपी असते
त्याला कस कळत नाही
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: नयन माझे करारी
आठवत होते तुला
तू नसताना सख्या
शोधत बसतात तुला
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: पारिजातकाला आज
आठवण तुझी आली होती
तू  सोबत नसताना त्यांने
ओंजळ माझी भरली होती
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: होता तुझा भाव रुसलेला
प्रीतीत माझ्या खोट नाही
कितीही दुरावले जीवन
पण तुला ह्यातून सुटका नाही

*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: एकांत हां असा
छळतो मलाच आहे
तुझ्या प्रितीचा अर्थ
सख्या कळतो मलाच आहे
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: मिटल्या होत्या पापण्या जरी
मन आजुन् झोपल नव्हतं
खोल उसळणार वादळ मनात
तर पापणी आड़ आसु होत
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: काजव्यांच्या प्रकाशाला
आज मन भूलल होत
काजळी माझ्या डोळ्यांना
 स्वप्न तुझ पड़ल होत
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: अबोल माझे प्रेम
कळेल का कुना
कविता माझी निशब्द
कोण गाईल का पुन्हा
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: गालावरील खळीला
तूफ़ान हसु आल होत
अरे हे हसु कसल तिने तर
दुःख तीच झाकल होत

*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: खुप माया होती तीची
तिच्या साठी जगला नाही
ब्रेकअप झाला म्हणुन
मरायला काही चुकला नाही
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: कस सांगु सख्या
दिवस फक्त उजाडला होता
डोळ्यातील पाण्याचा
धबधबा पुन्हा अटला होता
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: एकच सांगते मुलांनो
आई वर प्रेम करायला हव
नको तुमच्या नोटा तिला
थरथरत्या हातांना जवळ
तुम्ही करायला हव

*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: झाल जेल विसरून जाऊ
ऐकीने हातात हात घेऊ
नको आम्हाला कसले राजकारण
समानतेचा धड़ा घेऊ
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: नावात वेदना होती
तो चंद्र ही प्रेमात माझ्या
तरी ही विचारी मज
नावात काय तुझ्या  😬
*सई*
[09/02, 6:57 PM] Sayali Mam: नावासाठी वेचिले त्यांने
केले होते घामाचे मोती
पर नाव नाही मिळाले
राहिली ती रिकामी माती

*सई*

No comments: