काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार

[4/14, 5:16 PM] Chandan Sir: 🌹शिक्षण "हक्क" कायदा🌹


शिक्षणाचा खरा अर्थ
विद्यार्थ्यांना कळला पाहिजे
प्रत्येज वर्गाला किमान एक
शिक्षक तरी मिळाला पाहिजे.

शिकणारे गरजवंत, शिकवणारे
  मात्र वेठबिगार आहेत
विचारायचीच गरज नाही
त्यांचे किती पगार आहेत?

शिक्षक शिक्षकच असावा
तो 'सहाय्यक शिक्षक' नको
शिकवायला तरी वेळ द्या
टपालांची आवक-जावक नको.

लाट लाट लाटले तरी
शिक्षणाचा धंदा तोट्यात असतो
कुठे वर्ग उघड्यावर तर
कुठे गुरांच्या गोठ्यात असतो.

बांधकाम, जनगणना, निवडणूकीचे
शिक्षकास सक्तीचे आदेश आहेत
सरकारी शाळा बुडवणे हाच
सत्ताधाऱ्यांचा उद्देश आहे.

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर
दुसरेच पोसायला लागले
'आचाऱ्याची' नवी भूमिका
'गुरु' जी सोसायला लागले.

'एक ना धड भाराभार चिंध्या'
नको त्याचा ऊत आहे
'परीक्षा नको, नोंदी ठेवा'
हे नवीनच भूत आहे.

विद्यार्थी आधारकार्ड- बँकखाते
शाळासिद्धी बंधनकारक आहे
नवनवीन अशैक्षणिक कामे
शाळा गुणवत्तावाढीस मारक आहे.

ग्रामशिक्षण समितीला व्यवस्थापन
समितीचा चेक आहे
तरीही शालेय कामकाजात
राजकारणाचीच मेख आहे.

शिक्षण हक्क कायद्याचे
हेच शैक्षणिक फलित आहे
ज्यांना हवे होते त्यांना
आयतेच कोलीत आहे.

शिक्षणाच्या हक्काचे नाते
कर्तव्याशी जोडले पाहिजे
राजकारणाला शिक्षणाच्या
मुळापासून तोडले पाहिजे.


काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार (प्रा. शिक्षक) जि. प. उच्च प्राथ. शाळा वडगाव बु, ता. चोपडा, जि. जळगांव. मॊ. नं. 9421480232
[4/14, 5:16 PM] Chandan Sir: 🌹आज 'मराठी' राजभाषा दिवस. मराठी भाषेचे महत्व वर्णीणारी व मराठी भाषा टिकावी - जोपासावी म्हणून घातलेली आर्त साद या 👇 कवितेतून व्यक्त केलीय🙏🙏

🌹✍आपली "मायमराठी"✍🌹

'अमृताहूनी गोड व सरस'
अशी मायमराठीची महती
महाराष्ट्राची 'राज-ज्ञानभाषा'
म्हणून मराठीची ख्याती.

मायमराठीत हिंदी व इंग्रजी
शब्दांची झालीय 'मिक्सिंग'
मराठी भाषा बुडवण्याकरता
चाललीय सर्वत्र 'फिक्सिंग'.

आंतरराष्ट्रीय भाषा प्रभावामुळे
  इंग्रजी शाळांची पत आहे
'तळ्यात न मळ्यात' अशी
मराठी शाळांची गत आहे.

महाराष्ट्रात मराठी-अमराठी
 दररोज चिघळतोय वाद
'मला वाचवा' अशी आपणास
मायमराठी घालतेय साद.

आपल्याच घरात परके म्हणून
जगण्याची आपणावर येऊ नये वेळ
महाराष्ट्रात मराठी भाषिक व
परप्रांतीयांची होऊ नये भेळ.

मायमराठी संपलेली नाही अन
संपणारही नाही हा धरावा आग्रह
मराठी भाषा-मन-संस्कृती
चिरडण्याचा टाळावा दुराग्रह.

मराठी विकासाकरता असावेत
मराठी ग्रंथालये व विश्वकोश
मराठी व्याप्तीवर्धक बनवावे
अभ्यासक्रम व शब्दकोश .

 खाजगी-सरकारी कार्यालये,
बँकात असावे मराठीचे महत्व
चॅनेल्स, कालसेंटर्स, बिझनेसमध्ये
असावे मराठीचेच अस्तित्व.

मायमराठीने सातासमुद्र रोवलाय
आपल्या महाराष्ट्राचा 'झेंडा'
'मी मराठी' म्हणून मराठीत
बोलण्याचा असावा 'अजेंडा'.

काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार (प्रा. शिक्षक) जि. प.उच्च प्राथ. शाळा वडगाव बु, ता. चोपडा, जि. जळगाव.
मॊ. नं. 9421480232

🌹🌹सर्व मराठी बांधवांना मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा💐💐🙏🙏
[4/14, 5:16 PM] Chandan Sir: ✍ आज 8 मार्च जागतिक महिला दिवस, आदिशक्तीचे रूप असलेल्या सर्व महिलांचा गौरवदिन .महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करताहेत. जिद्दीने शिकून महिला कर्तबगार झाल्यात. राजकारण-समाजकारण-नोकरी-क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी महिला पार पाडत आहेत.नुकत्याच जिल्हा परिषद , पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीत महिला आरक्षणामुळे महिलांनी अभूतपूर्व यश संपादन केलंय. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांनी लोकप्रतिनिधी म्हणून पदे भूषवलीत, पण महिलांचे हे आरक्षण
पुरुषच उपभोगतात हे दर्शवणारी ही👇👇👇भाष्यकविता.....

✍🌹महिला आरक्षण🌹✍

महिलांच्या वाढीव आरक्षणाची
अखेर गुळणी फुटली आहे
सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या
आरक्षणाने 'पन्नाशी' गाठली आहे.

महिला सबलीकरनाचा गवगवा
जगजाहिरपणे करता येतो
महिला आरक्षणाच्या ढालीने
  नवीन तीर मारता येतो.

जे इतर निवडणुकात झाले
तसेच आताही झाले
बायकोच्या नावावर
नवरेच निवडून आले.

महिलांच्या आरक्षणाला
पुरुषांचा लळा आहे
बायकोच्या सत्काराला
नवऱ्याचा गळा आहे.

बायको नावालाच पदावर
कामकाज नवरा बघणार आहे
महिला आरक्षण शेवटी
पुरुषच मिरवणार आहे.

महिला आरक्षणाचे धोरण
पुरुषांच्या पथ्यावर पडले आहे
पडद्यामागचे राजकारण
त्यातूनच वाढले आहे.

देणाऱ्याने दिले तरी
घेणाऱ्यांची झोळी फाटकी नको.
'महिला सबलीकरण' कागदी
अन नाटकी नको.

महिलामुक्तीच्या धोरणांची
घराघरात भक्ती केली जाते
मुलींची गर्भहत्या करून
कायमची मुक्ती दिली जाते.

महिलामुक्ती आरक्षणाचा असा
हा फसवा पुरुषी नारा आहे
मुक्तात्मे म्हणत असतील इथे
जन्म न घेतलेलाच बरा आहे.


काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार (प्रा. शिक्षक) जि. प. उच्च प्राथ. शाळा वडगाव बु,  ता. चोपडा, जि. जळगाव. मो. न. 9421480232

🌷सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा🌷💐💐🌹🌹
[4/14, 5:16 PM] Chandan Sir: ✍😔शासनाच्या नोटबंदी निर्णयाचे समीक्षण करणारी ही भाष्यकविता😔✍ 👇👇

✍😔"कॅशलेस" इंडिया😔✍

नोटबंदीच्या हुकूमी निर्णयाची
सार्वत्रिक चर्चा सॉलिड आहे,
पूर्वतयारीविना घेतलेला 'कॅशलेस'
इंडियाचा निर्णय व्हॅलीड आहे.

नोटाबंदीमुळे गोरगरिबांच्या
तोंडाला फेस आलाय ,
रिकाम्या खिशांनी केलेला उधारीचा
व्यवहार 'कॅशलेस' झालाय.

पांढरा पळून पळून थकलाय
पण काळा मात्र जपून आहे,
पांढरा झाला बँकजमा
काळा अजून लपून आहे.

काळ्याला तारक असे शासनाचे
'अभय' योजना धोरण आहे,
काळ्याला वाचवताना पुन्हा
पांढऱ्याचेच मरण आहे.

नोटबंदीमुळे काळ्या-पांढऱ्याची
जुळलेली अतूट नाती आहेत,
कॅशलेसमुळे बँक अधिकारी व
कर्मचाऱ्यांच्या नोकरीची माती आहे.

कॅशलेसच्या मदतीकरता शासनाचे
नवीन "भीम" अँप आलेय,
आपलाच अंगठा पासवर्ड ठरवून
शासकीय भीमपराक्रमी मॅप झालेय.

रांगेत उभे राहून निशुल्क
बँकव्यवहार फक्त 'थ्री' आहेत,
सर्वसामान्यांना बँकेत जाणे-येणे
तेवढे आता 'फ्री' आहे.

आपल्याच पैशांकरता रांगा लावणे
ही नोटबंदीची कथा आहे,
लोकांनी लोकांसाठी निर्मिलेल्या
'कॅशलेस' लोकशाहीची ही गाथा आहे.


काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार (प्रा. शिक्षक) जि. प. उच्च प्राथ. शाळा वडगाव बु, ता. चोपडा, जि. जळगाव. मो. नं . 9421480232
[4/14, 5:16 PM] Chandan Sir: ✍आज 14 एप्रिल 2017 महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, बाबासाहेबांच्या कार्यकर्तुत्व विशद करणारी ही कविता ✍👇👇

✍🌹बाबासाहेब.....🌹✍

अस्पृश्य-मागासलेल्यांची
'भिमाई' होते बाबासाहेब,
झिडकारलेल्या- होरपळलेल्यांची
'रमाई' होते बाबासाहेब.

अलौकिक बुद्धिमत्तेचा
'स्पर्श' होते बाबासाहेब,
भारतातील पददलितांचे
'आदर्श' होते बाबासाहेब.

आत्मविश्वासाचे तेज लाभलेले
'विश्वरत्न' होते बाबासाहेब,
राष्ट्रहिताच्या दुरदर्शिय तळमळीचे
'प्रयत्न' होते बाबासाहेब.

दिर्घोदयोग-चिकाटी-मेहनतीचे
'वटवृक्ष' होते बाबासाहेब,
घटनात्मक प्रश्न सोडविणारे
'कल्पवृक्ष' होते बाबासाहेब.

अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारी
'दिशा' होते बाबासाहेब,
अन्यायाविरुद्ध संघर्षाची न्याय
'भाषा' होते बाबासाहेब .

मनुस्मृतीला दहन करणारी
'आग' होते बाबासाहेब,
सामाजिक विषमतेला विरोध करणारे
'वाघ' होते बाबासाहेब .

शिवाजी-फुले-शाहुविचारांचा
'जागर' होते बाबासाहेब ,
करुणा-शील-प्रज्ञा-कर्तृत्वाचा
'सागर' होते बाबासाहेब.

विदवत्तेच्या लेखणीची ऐतिहासिक
'धार' होते बाबासाहेब ,
भारतीय राज्यघटनेचे
'शिल्पकार' होते बाबासाहेब .

अजून किती सांगू
काय होते बाबासाहेब,
शब्दही अपूर्ण पडतील
इतकं महान होते बाबासाहेब.


काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार (प्रा. शिक्षक) जि. प. उच्च प्राथ. शाळा वडगाव बु, ता. चोपडा, जि. जळगांव. मो. नं. 9421480232

No comments: