इ.१ ली ते ८ वी साठी प्रकल्पनमस्कार मिञांनो,मी आपल्या ब्लाॅगवर इ.१ली ते ८ वीचे नमुनादाखल काही प्रकल्प टाकत आहे ज्याचा उपयोग निश्चितच आपणास होईल...पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादीइयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -भाषा -:* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.* बडबडगीते तोंडपाठ करणे.* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .* परिसरातील विविध स्थळांची माहिती .* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .* कथा व कवितांचा संग्रह करणे .* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका.* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.* विविध पत्राचे नमुने जमा करणे.* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.गणित -:* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.सामान्य विज्ञान -:* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.इतिहास व ना.शास्त्र -:* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .* संतांची चित्रे व माहिती .* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .* जहाजांची चित्रे जमवा.* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.भूगोल -:* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .* परिसर भेट - नदी ,कारखाना .* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .* विविध धान्यांचे नमुने जमवा.* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा
- Home
- सुविचार
- गणित
- डाउनलोड
- किल्ले
- उपक्रम
- खेळ
- सूत्र संचालन कसे करावे
- भाषा
- इंग्रजी
- गॅलरी
- वार्षिक नियोजन
- गणित विषयाचे लेख
- बाराखडी शब्द
- थोर व्यक्ती फोटो
- आपले सरकार
- ज्ञानरचनावाद फोटो
- कॉम्पुटर शिका
- मराठी rhymes
- सामान्य ज्ञान स्पर्धा
- शिक्षणाची वारी फोटो
- शिक्षक कला
- मराठमोळे संगणकीय स्वातंत्र
- डिजिटल स्कुल साहित्य
- पर्यावरण
- कागदकाम
- कार्यानुभव
- पेपर कटिंग आर्ट
- अक्षर
- फलकलेखन व रांगोळी
- शैक्षणिक चार्ट
- S2G सॉफ्टवेअर
- सुप्रसिद्ध गायकांची mp3 गीते
- चित्रकला
- स्कूल डिजिटल बॅनर
- चारोळी~आस
- चारोळी~सई
- चारोळी~वसू
- चारोळी~विशाल
- शायरी~राजे
- कविता~ शांतीसुत
- शायरी~sg
- काव्यरचना- श्री. चंदन व्ही. पवार
- प्रिय वर्ष च्या आठवणी
- School Digital Banner
- सौ. वर्षा भोज पुणे~ कविता
1 comment:
खूपच छान ...
Post a Comment