बालगीते

बालगीते

बडबड गीते


1) टेलिफोन

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग टेलिफोन
हॅलो मिस्टर बोलतय कोण
हा तर आमच्या बाबांचा फोन
बाबा, बाबा लवकर  या,
येताना मला खाऊ आणा
गोळया बिस्क्टि नको मला
पाटी पेन्सिल हवी मला
पाटी पेन्सिल घेईन
धडा पहिला गिरवीन
पहिला नंबर मिळवीन

2) सहा रस
आंबट तिखट,
खारट  तुरट,
गोड कडू खाऊ
रोज रसांचे जेवण
रोज रोज घेऊ,हे
नका आई मला
जेवतांना असं
  कधी,

म्हणायचं नाही.

3) चवळीचे गाणे
अटक मटक चवळी चटक
चवळी पाण्यात भिजली
बराच वेळ शिजवली
चवळी काही भिनेना
पाण्यात मळी शिजेना
चवळी होती कडक खुप
म्हणुन तिला दिले तुप
अटक मटक चवळी चटक
आता तरी भिजेल का
सांग मला शिजेल काय

4) गणितातले आकडे

गणितातले आकडे झाले एकदा वाकडे
एकाला फुटले डोके दोन म्हणाले ओके
तीनचा आकुट थाट चारच्या पोटात गाठ
पाचला एकच पाय सहाला उंचीचे नाय
सातची कुबडी पाठ नाकात आडवा आठ
नऊचा डोळा गोल दहाचा वेगळा तोल
प्रत्येकाची ऐट खुप वेगळे तरी एकच रंगरुप
5) अडगुल मडगुलं
अडगुल मडगुलं
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्हा बाळा
तीट टिळा
6) अग अग बकरे खरं खरं सांग
अग अग बकरे खरं खरं सांग
अंगावरची लोकर किती फुट लांब
दे ना मला थोडीशी लोकर
आईला सांगेन विणायला स्वेटर
7)
झोका घेऊ या
झोका घेऊ झोका घेऊ झोका घेऊ
उंच उंच आभाळाला हात लावू या
चमचम करत आहे चंद्रची राणी
नटापटा करायाची वेळ ही झाली
ठु मकत खेळायाला चांदणी आली
चंदा मामा माझ्यावर रुसलास का?
ढगमागे जाऊनिया लपलास का ?
झोका घेऊ झोका घेऊ झोका घेऊ
उंच उंच आभाळाला हात लावू या
8) दोन लहान उंदीरे

दोन लहान उंदीर विणायला बसले
तिकडून एका मांजराने डोकावले
तुम्ही काय करता रे उंदरानो
मुलांच्यासाठी कपडे विणतो
आम्ही यावे का मदत करायला
नको नको माऊताई डोके उडावया
रंगाचे गाणे

पांढरा शुभ्र रंग सागा कशाकशाचा
दही दूध ताक लोणी आणि साखरेचा

काळा कुटट रंग सागा कशाकशाचा
फळा पाटी केस कोळसा आणि कावळयाचा

 9)   रंगाचे गाणे
हिरवा रंग सागा कशाकशाचा
कैरी मिरची कोथिबीर आणि पोपटाचा
पिवळा धमक रंग सांगा कशाकशाचा
केळी पेरु लिंबू आंबा आणि हळदीचा
लालचुटुक रंग सांगा कशाकशाचा
जास्वंद गुलाब कुंकू आणि लाल तिखटाचा
निळा गडद रंग सांगा कशा कशाचा
डेक्क्नकीन शाई नीळ आणि मोराचा
जांभळा जांभळा रंग सांगा कशाकशाचा
जांभुळ गोकर्ण को-हांटी आणि क्रष्णकमळाचा ला

10) कोणास ठाऊक कसा
कोणास ठाऊक कसा? पण शाळेत गेला ससा
सशान म्हटले पाढे, गडगड वाचले धडे
गुरुजी म्हणाले शब्बास
ससा म्हाणाला करा पास

कोणास ठाऊक कसा? सर्कशीत गेला ससा
सशाने मारली ऊडी भरभर चढला शिडी
विदूषक म्हणाला,छान छान
ससा ॅहणला हवे पान


कोणास ठाऊक कसा? सिनेमात गेला ससा
सशाने केली फाईटिंग छानपैकी केली ॲक्टिंग
डायरेक्टर म्हणाला वाहवा
ससा म्हणाला चहा हवा

11)  वजन मापे
धान्य भाजी किलोभर
दूध तेल लिटरभर
कापड चोपड मीटरभर
केळी अंडी  डझनभर
रीम दस्ते कागद मोजले
घडयाळात मोजले बारा वाजले

फिरायला आम्ही गेलो होता तेव्हा

12) फिरायला आम्ही गेलो होतो तेव्हा
सांगू का भेटल कोण?
तेथे भेटले बेडूकराव सारखे करती डराव डराव
इकडून तिकडे गवतामधून जाती टुणटुण
एका पायावरती उभा जसा कोणी साधू बूवा
बगळे भाऊंनी धरले होते माशासाठी ध्यान
रंगीबेरंगी मासोळया इकडून तिकंडे सळसळ गेल्या
चणे फुटाणे पाहूनी आल्या खाऊन गेल्या धुम
तेथे भेटल्या कोकिळताई कुहूकहू कुहूकुहू गाणे गाई
कुहूकुहू कुहूकहू गाण्यामधुनी बालाविते छान

13)  वेडं कोकरु
वेडं कोकरु खूप थकलं
येतांना घरी वाट चुकलं
अंधार बघून भलतंच भ्यालं
दमून दमून झोपेला आलं
शेवटी एकदा घर दिसलं
वेडं कोकरू गोड हसंल
डोकं ठेवून गवताच्या उशीत
हळूच शिरलं आईच्या कुशीत
 14)   लाल पिवळी एसटी
लाल पिवळी एस उघडना दार
मला घे आत मग जाऊ जोरात
मुंबईच्या मांमानी बोलवलंय मला
घेऊन चल तिकडे खाऊ देऊ चला
मुंबईला जाऊन फुटबॉल पाहू
चौपाटीवर बसून भेळपूरी खाऊ
राणीच्या बागेत खेळ खेळू
एस टी गाडी थांबली शहाण्यासारखी वागली
बर ना  ग एस टी तुझ्याशी बटटी

  15)   परीचे गाणे
मी मी मी एकटीच परी नाचते
या या या गुलाबाच्या पाकळीत लपून बसते
पाहु नका कोणी मला लाज वाटते
मी मी मी एकटीच परी नाचते
या या या मोगऱ्याची वेणी बनविते
पाहू नका कोणी मला लाज वाटते
मी मी मी एकटीच परी नाचते
या या या जास्वंदीच्या फुलाचा हार बनविते

No comments: