Tuesday, February 28, 2017

इकडे लक्ष दया
आता मुलांच्या परिक्षांचे  दिवस आहेत
1) पालकांनी घरात भांडू नये
2) एकाच वेळी भरपेट जेवण मुलांना खाऊ घेतल्यास आळस येईल (दुपारी झोपायची सवय लागेल)
3) थोड्या थोड्या अंतराने घरातील अन्न पदार्थ मुलांना द्यावेत
4) शक्य असल्यास रोज एक फळ खावे
5) हॉटेल किंवा बाहेरील खाणे टाळावे
6) रोज 10 सूर्यनमस्कार पालकांनी घालावेत सोबत मुलांनाही घ्यावे
7) मैदानी खेळ मुलांनी खेळू नयेत (शरीराला ईजा होऊ शकते)
8) हॉल तिकिट च्या Xerox काढून ठेवा( एक हरवल्यास कामी येईल)
9) कंपास मधील साहित्याचे 2 set तयार ठेवा. काही हरवल्यास अचानक पळापळ होणार नाही
10) बॉल पेन वापरणाऱ्या मुलांनी 4 पेन तयार ठेवा (शाई चे वापरणाऱ्या मुलांनी 2 पेन)
घरी बोलपेन चा सराव 20% शाई संपे पर्यन्त करा. मग दूसरे पेन घ्या (परीक्षेत नविन पेन नी लिहिल्यास वेग (speed) कमी होतो. त्या मुळे रुळलेले पेन तयार ठेवा)
11) आपले मन शांत असल्यास अभ्यास चांगला लक्षात रहातो या काळात कुणाशीही भांडू नका, वाद-विवाद टाळा
12) जेव्हा कंटाळा येईल (बोअर होईल), अभ्यास होणार नाही अशा वेळी
1,2,3,4,5,6,7,8,9.0 हे आंकड़े सुवाच्च अक्षरात लिहा (गणिताच्या पेपर मधे आंकड़े चांगले येतील),
आकृत्यां चा सराव करा
गणिता मधील formula लिहून काढ़ा
13) पालकांनी दुसऱ्या मुलांची तुलना आपल्या पाल्यासोबत करणे टाळावे.
14) स्वच्छ पांढरे ब्रांडेड खोड-रबर वापरावे
15) लीड पेन्सिल वापरा (लाकड़ी कव्हर असलेली पेन्सिल मुले ब्लेड ने खुर करतात) यात बोटाला जखम होऊ शकते व परिक्षेतील वेळ पेन्सिलला खुर करण्यात वाया जातो
16) सगळीच मुले डॉक्टर-इंजिनियर होत नसतात
इतरही खुप क्षेत्रात चांगली नौकरी आणि पैसे मिळू शकतात
17) कदाचित आपला मुलगा यशस्वी उद्योजक बनेल
18) ही परीक्षा आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही
19) अपयश आले तर स्वतः घाबरू नका आणि दुसऱ्याला घाबरवू नका
20) झालेल्या पेपर ची चर्चा करीत बसु नका
21) व्यवस्थित समास सोडा
22) सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा
23) सुबक आकृत्या काढ़ा, जिथे गरज असेल तिथे.
24) शेवटची 15 मिनिट पेपर तपासण्या साठी ठेवा.


RELAX व्हा
त्यांना प्रोत्साहन द्यावे
प्रयत्न करण्यास प्रवृत्त करावे

आपण यशस्वी होणारच
--------
       *~आपला हितचिंतक~*,
        *राहुल सुधाकर पाटील*

No comments: