Thursday, November 30, 2017

🌹*🎤कार्यक्रमात टाळ्या मिळविण्यासाठी काही चारोळ्या/वाक्य---* 🌹

☄☄☄☄☄☄☄
*1)महको तो ऐसे की,सारा बाग खिल जाए...ताली बजावो तो ऐसे की सभी बच्चे खुश हो जाए..

*2) पाईनॕपलच्या रसाला ज्युस म्हणतात,जो टाळ्या वाजवीत नाही त्याला कंजुष म्हणतात...

3)कापसाच्या वातीशिवाय शोभा येत नाही समईच्या ज्योतीला
प्रेक्षकांच्या टाळयाशिवाय शोभा येत नाही कलाकारांच्या जातीला.
--------------------------------
सूर म्हणतात साथ द्या
दिवा म्हणतो वात द्या
आमच्या चिमुरड्याला
आपल्या टाळ्यांची साथ द्या

--------------------------------
 कला सादर केल्यानंतर प्रेक्षकांची दाद मिळावी म्हणून हे आपण बोलू शकतो

4) वो ससुराल ही क्या जहाँ साली न हों।
और वो प्रोग्राम ही क्या जहाँ ताली न हो

5)आवाज ऐसे दो सोये हुए को होश आ जाये।    
 ताली ऎसे बजाओ सामने वालेको जोश आ जाये।

6)पेड़ पौधों को शोभा आती है हरीभरी डालियोंसे।    प्रोग्राम को रौनक अति है जोशभरी तालियाओंसे।

7)नुसतच बरोबर चालल्याने ती सोबत होत नाही।
केवळ हाताला हात लागला म्हणून ती टाळी होत नाही।  
चला हवा येऊ दया।    
आणि   जोरदार टाळ्या होउन जाऊ दया

8)कार्यक्रमासाठी केला आहे सगळ्यांनी साज ,
आहे कुठे टाळ्यांचा आवाज.

9)🌹फूल आहे गुलाबाचे;
जरा सुगंध घेत चला,
कार्यक्रम आहे लहानग्यानचा जरा टाळ्या देत चला.....जोरदार टाळ्यांचा गजर👏👏👏👏👏👏

10)सजली आहे मैफिल ,चिमुकल्यांच्या कला अभिव्यक्ती साठी।
एकदा होउ द्या  टाळ्यांचा गजर या बालकलाकारांच्या स्वागतासाठी.

11)दिवा म्हणतो वात दे                       हात म्हणतो साथ दे                        आणि रसिक प्रेक्षका                      तू टाळ्यांची दाद दे👏👏👏

12)शेतकरी म्हणतो, ढग गडगडतो पण पाऊस का पडत नाही.
या सुंदर कलाविष्कारासाठी टाळ्या का होत नाही...

13)रंगतदार कार्यक्रमाला बहारदार संगीताची जोड
आम्हा कलाकारांना फक्त तुमच्या टाळ्यांची ओढ

14) ही आपलीच बालके आहेत याचा न पडावा विसर
टाळ्या तर मोफतच आहेत
त्यात नको काटकसर ...

15)कला आहे ,कलेची जाण   असणारा रसिक आहे,                                        
या कार्यक्रमाची दाद देण्यास
आपल्या  टाळ्यांचा आवाज आहे
☄☄☄☄☄

Saturday, November 25, 2017

*🙏संविधान कार्यशाळा, पुणे*
*या कार्यशाळेत तयार झालेल्या घोषणा -*

१. जब तक सूरज चाँद
     तब तक संविधान

२. विवेक पसरवू जनाजनात
     संविधान जागवू मनामनात

३. समता, बंधुता, लोकशाही
    संविधानाशिवाय पर्याय नाही

४. कर्तव्य, हक्कांचे भान
     मिळवून देते संविधान

५. संविधान एक परिभाषा है
     मानवता की आशा है

६. संविधानावर निष्ठा
     हीच व्यक्तीची प्रतिष्ठा

७. संविधानाची मोठी शक्ती
     देई आम्हा अभिव्यक्ती

८. मिळून सारे देऊ ग्वाही
     सक्षम बनवू लोकशाही

९. संविधानाची कास धरू
     विषमता नष्ट करू

१०. सर्वांचा निर्धार
       संविधानाचा स्वीकार

११. संधीची समानता
       संविधानाची महानता

१२. संविधानाने दिले काय?
      स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय

१३. संविधान आहे महान
       सर्वांना हक्क समान

१४. लोकशाही गणराज्य  घडवू
       संविधानाचे भान जागवू

१५. संविधानाचा सन्मान
       हाच आमचा अभिमान

१६. भारत माझी माऊली
       संविधान त्याची सावली

१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
       हाच संविधानाचा मूलमंत्र

१८. नको ताई घाबरू
       चल संविधान राबवू

१९. जर हवी असेल समता
       तर मनात जागवू बंधुता

२०. सबसे प्यारा
       संविधान हमारा

२१. अरे, डरने की क्या बात है?
       संविधान हमारे साथ है

२२. संविधानाची महानता
       विविधतेत एकता

२३. देशभरमे एकही नाम
       संविधान! संविधान!

२४. समानता कशाची?
       दर्जाची, संधीची

२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
      संविधान हमारा सबसे प्यारा

२६. लोकशाहीचा जागर
       संविधानाचा आदर

२७. तुमचा आमचा एकच विचार
       संविधानाचा करू प्रचार

२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
      ये देश चलता है संविधान से

Friday, November 24, 2017

🤹‍♀*◆उपक्रम*
*चढता क्रम अक्षराचा साज तयार करणे...*
     
🖊 *अ*  =अरे ,अय्या, अजब, अननस, अनवरत, अदलाबदल, अहमदनगर.अचकटविचकट


🖊 *आ* =आई, आकडा, आवडता, आरासपाणी, आकांडतांडव .

🖊 *इ* =इजा, इसम, इमारत, इज्जतदार ,इचलकरंजी

🖊 *ई*  = ईद, ईशान्य ,ईदगाह,ईमानदार ,

🖊 *उ* =उषा, उखळ, उमाकांत ,उसणवारी ,उचलबांगडी,उलथापालथ

🖊 *ऊ* =ऊस, ऊरुस,  ऊबदार ऊनपाऊस ऊधळमाधळ

🖊 *ए* =एक, एडका, एकदम, एकलकोंडा,एकदिवसीय

🖊 *ऐ* =ऐट ,ऐनक, ऐरावत,ऐतदेशीय,ऐश्वर्यसंपन्न

🖊 *ओ* =ओठ ,ओढणी, ओढाताण, ओंगाळवाणे, ओबडधोबड.

🖊 *औ* =औत ,औषध, औदुंबर, औरंगाबाद,  औषधोपचार .

🖊 *अं* =अंग ,अंगण, अंगरखा,  अंगणवाडी, अंगतपंगत ,अंगठेबहाद्दर ,अंथरूणपांघरुण

✏क =कप कमळ करवत काटकसर करारमदार
कळतनकळत करवीरनिवासिनी

✏ख = खण, खडक,  खडतर ,खळखळाट, खेळतखेळत ,खडकवासला.

✏ग= गज गवत गयावया गाणगापुर गरमागरम गजबजलेला

✏घ = घर घायाळ घरोघर घडणावळ

✏ च = चार चरखा चळवळ चयापचय चालताबोलता  चलनवलन

✏छ = छत्री छकुली छमछम छत्तिसगड

✏ज = जर जलद जळगाव जलतरण जमवाजमव

✏झ = झगा झबला झगमग झगमगाट

✏ट =टर टणक टरबुज टवाळखोर टंगळमंगळ

✏ठ=ठसा ठळक ठराविक ठणठणाट

✏ ड =डबा डफली डरपोक डळमळीत डुलत डुलत

✏ढ =ढग ढगाळ ढमढम ढाकरवाडी ढकलगाड़ी

✏ण = बाण रावण  दणकट सणसणित कणखरपणा

✏ त= तवा तलम तलवार तरतरीत  तड़कभड़क

✏थ = थवा थडगे थरकाप थयथयाट

✏ द = दात दाखल दरवाजा दरमजल

✏ ध = धन धनुष्य धावपळ धरपकड

✏ न = नळ नरम नवनाथ नयनरम्य  नवरानवरी

✏प = पण पतंग पसरट पाथरवट  पालापाचोळा
पकड़ापकड़ी

✏ फ =फडा फरक फारकत फापटपसारा

✏ब = बस बदक बरकत बायजाबाई  बदलाबदली

✏भ = भर भगर भावसार भाकडकथा

✏ म = मन मगर मसलत  मनमिळाऊ

✏य = यज्ञ यवन यादगार यथावकाश

✏ ल = लस लबाड लवकर लखलखाट लाचलुचपत

✏व = वड वजन वरचढ़ वरकरणी  वारसदार

✏श = शाळा शारदा शहामृग शयनगृह

✏ ष = मेष चषक षटकार  प्रतिकर्षण षोडशोपचार

✏ स = ससा समई सावधान सरबराई ससेहोलपट

✏ ह = हसा हळद हळुवार हातचलाखी  हसताहसता

✏ळ =कळ क�

Wednesday, November 22, 2017

आईची थोरवी

आईची थोरवी
                                                       प्रेमस्वरूप आई ; वात्सल्यसिंधू आई ,  
                                                   वसविन नित्य तुला ,मी माझ्या हृदयमंदिरी।।
                            आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचा देवी साक्षात्कार म्हणजे आई . आई हा किती गोड शब्द ! केवढे माधुर्य भरलेले आहे या शब्दात ! सारे जग या शब्दापुढे डुलत राहील एवढी जादू आहे या शब्दात आई हा शब्द उच्चारताच प्रेम,माया,ममता या देवता उभ्या राहतात.
                            पण काहींच्या नशिबात हे आईचं प्रेम,माया,ममता नसते. त्यांना पोरकेपणा भोगावा लागतो. खरचं ! त्या मुलांच्या पोरकेपणाची कथा खूप तीव्र असते. म्हणून म्हणावेसे वाटते ,
                                                      आईविना मूल म्हणजे
                                                      सुगंधविना फूल ,
                                                      वाऱ्याविना धूळ ,
                                                      विस्तावाविना चूल असते.
                             ज्या मुलांच्या डोक्यावरचा आईच्या मायेचा हात लवकर नाहीसा होतो, अशा मुलांना परिस्थितीच संकटास सामोरे जाणे शिकवते. आई ! प्रेमाचे माहेर , पावित्र्याचे मूर्तिमंत तेज जिच्या चेहऱ्यावर दिसते ती आई . अशा या आईची महती वर्णन करण्यास शब्दभांडारही अपुरे पडेल . मनात उठलेले वादळ आईच्या मांडीवर झोपले असतानाच शांत होते . संकटात असताना आईचा प्रेमळ हात डोक्यावरून फिरला कि , मनास अपूर्व शांतता प्राप्त होते .
                            आईला कधीच आपल्या लेकराबद्दल भेदभाव माहित नसतो . तिच्या प्रेमाला व्यवहाराची तुलना माहित नसते . तिला माहित असते ते फक्त खरंखुर प्रेम करणं . प्रत्येक आई आपल्या बाळाला जीवापेक्षा जास्त जपते . त्यांच्यावर सुसंस्कार करते . तिची फक्त आपल्या मुलांकडून एकच अपेक्षा असते ती म्हणजे , माझी मुले,मनाने , गुणाने, व पराक्रमाने मोठी व्हावीत व स्वतःचे तसेच आईवडिलांचे नाव कमवावे. जगातील सर्व पराक्रम आईच्या कुशीतच जन्म घेत असतात. मातृप्रेमाचे मंगल स्त्रोत म्हणजे ' श्यामची आई '.
श्यामच्या जीवनात त्याच्या आईने त्याच्या आयुष्याला कसे वळण देऊन त्याचे आयुष्य घडविले , याचे वर्णन साने गुरुजींनी त्यांच्या 'श्यामची आई' या पुस्तकात केले आहे . शिवरायांना घडवणारी जिजाबाई , कृष्णाला घडवणारी कौसल्या हे साक्ष देतात की, आईच्या मायेला अंत नाही. तिची माया चिरंतर , सागराप्रमाणे अथांग आहे . आईला कितीही अलंकारानी सुशोभित केले तरी अपुरेच ! आईकडे प्रेमाचा , मायेचा झरा असतो . तिला सतत आपल्या लेकराची काळजी वाटत असते . म्हणूनच म्हणावेसे वाटते ,
                                                   ' घार फिरते आकाशी
                                                    परि तिची नजर पिलापाशी '
                           मुलांसाठी ईश्वराचे रुप म्हणून देवाने आई दिलेली असते . विश्वाच्या कानाकोपऱ्यात लक्ष दयायला परमेश्वर देखील असमर्थ आहे . म्हणूनच त्याने ईश्वररुपी आईची मूर्ती तयार केली आहे. मुलेही जीवनात तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांना प्रेरणा देणारी आई त्यांच्या पाठीशी उभी असते.
                           आई ही आपल्या मुलांच्या बाबतीत जास्त भावनिक व हळवी असते . आपल्या मुलांच्या जीवनात कधीच कोणते दु:ख येऊ नये म्हणून ती नेहमी ईश्वराकडे प्रार्थना करते. ती सतत गुलाबाच्या फुलाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करते स्वतः काव्यात राहून दुसऱ्यांना सुगंध देते, आईच्या मनाचा थांगपत्ता आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही . कारण आपल्या मुलाने कितीही गुन्हे केले तरी ते ती नेहमीच माफ करत असते. "जगात असे एकच न्यायालय आहे तेथे सर्व गुन्हे माफ असतात ते म्हणजे आईचे
हृदय ." समाजासमोर आपल्या लेकराच्या चुका आपल्या पदराखाली लपवणारी व बाजूला येऊन त्याचा कान पिळून त्याला त्याच्या चुका समजावून सांगणारी ती आईच असते. हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवण्यासारखे दोनच शब्द आहेत. ते म्हणजे आई. आई ही एक अशी देवता आहे की ती आपल्या जवळून नाहीशी झाली तर पुन्हा कधीही मिळू शकणार नाही. पेशाने माणूस काहीही मिळवू शकतो पण एकच अमूल्य हिरा तो मिळवू शकत नाही तो म्हणजे आई ! म्हणून म्हणावेसे वाटते ,
                                     " विद्याधन सर्वकाही मिळे पण आई पुन्हा न मिळे "
                            आई हा शब्द कुणाला शिकवावा लागत नाही. तो आपोआपच तोंडातून बाहेर पडतो. मुलांना चालताना अचानक ठेच लागली की, त्यांच्या तोंडून 'आई 'हा शब्द बाहेर पडतो. इतके पावित्र्य या शब्दात सामावलेले आहे. म्हणूनच साने गुरुजींनी म्हटले आहे,