अत्यंत महत्त्वाची सूचना
इयत्ता १० वी व १२वी च्या परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष सुचना
सर्व पालकांना कळवण्यात येते की, या महिन्यात इ १०वी व १२ वी चे निकाल लागण्याची शक्यता आहे.कोविड19/ अर्थात कोरोना च्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास यापूर्वीच खुप उशीर झाला आहे. तसेच हे महामारीचे संकट अजूनही संपलेले नाही.
अशावेळी निकाल लागताच नवीन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल.अशा वेळी आपली योग्य ती सर्व कागदपत्रे तयार असणे फार महत्वाचे व योग्य ठरते.
नवीन प्रवेश घेतेवेळी लागनारी कागदपत्रे
१.शाळा सोडलेचा दाखला
२.मागील वर्षाचे गुणपत्रक
३.जातीचा दाखला आरक्षणाच्या लाभासाठी
४.जात पडताळणी आरक्षणाच्या लाभासाठी
५.नॉनक्रिमिलेअर फी माफीसाठी
६.डोमासाईल
महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षे रहिवासाचा पुरावा
७.डोंगरी दाखला
मेडिकल प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी
८.उत्पन दाखला फी माफीसाठी
९.शेतकरी दाखला B.Sc Agree प्रवेशाच्या आरक्षणाच्या लाभासाठी
१०.अल्पभूधारक शेतकरी दाखला होस्टेलच्या फी माफीसाठी
११.EWS प्रमाणपत्र आरक्षणाच्या लाभासाठी
जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचे नावे तलाठी जातीचा दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.अ) Maratha / OBC / SBC करिता १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा.
ब) VJNT करिता १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा.
क) SC करिता १९५० पुर्वीचा जातीचा पुरावा.
वडील/आजोबा/चुलते/आत्या अथवा वडीलांच्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही नातेवाईक यांचा शाळा सोडलेचा दाखला.
६.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही एक महसुली पुरावा.
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८.शिधापत्रिका
९.अर्जदार यांचा एक फोटो.
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदार यांचा जातीचा दाखला
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.वडीलांचा शाळा सोडलेचा दाखला.
५.खाते उतारा, ७/१२ अथवा कोणताही महसुली पुरावा.
६.अर्जदार यांचे आधारकार्ड
७.शिधापत्रिका
८.अर्जदार यांचा एक फोटो.
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.
उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.तलाठी उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.अर्जदार यांचा एक फोटो.
डोंगरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदार यांचे नावे तलाठी रहिवासी दाखला.
२.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
३.अर्जदार यांचे आधारकार्ड
४.शिधापत्रिका
५.कोरेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचा पुरावा
६.७/१२,खातेउतारा अथवा घराचा उतारा.
७.अर्जदार यांचा एक फोटो.
शेतकरी /अल्पभूधारक शेतकरी दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१.जमिनधाराचा तलाठी रहिवासी दाखला.
२.खाते उतारा
३.७/१२ उतारा (५ एकर च्या आत)
४.शिधापत्रिका
५.जमिनधारकाचे आधारकार्ड
६.जमिनधारकाचा एक फोटो.
EWS प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
१.अर्जदार यांचा तलाठी रहिवासी दाखला.
२.तहसीलदार यांचा ३ वर्षे उत्पन्न दाखला.
३.अर्जदार यांचा शाळा सोडलेचा दाखला.
४.जातीचा दाखला
५.खाते उतारा, ७/१२ (५ एकर च्या आत.)
६.घराचा ८अ उतारा (1000 स्के.फुट च्या आत.)
७.अर्जदार यांचे आधारकार्ड
८. शिधापत्रिका
९. अर्जदार यांचा एक फोटो.
योग्य वेळी तयारी केली तर भविष्यात होणारा आर्थिक व मानसिक त्रास तसेच आपल्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान वाचवू शकतो
तरी आपल्याला अधिक माहिती तहसीलदार कार्यालयात सेतू केंद्र किंवा जवळच्या इ सेवा केंद्रात मिळेल
कृपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पाठवा.
लाईक/शेर/व कमेन्ट जरूर करा🙏😷🙏😷🙏😷🙏