अॅप ओळख
या भागात काही खास अॅप्लिकेशन्स बद्दल माहिती दिली आहे जे एरवी आपल्याला ठाऊक नसतात मात्र यांची गरज कोणत्याही ठराविक वेळी नक्की पडू शकते. यातील काही Apps तर प्रत्येकाने नक्की वापरायलाच पाहिजेत. खालील सर्व अॅप्स मोफत असून यांना पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत.
www.gajananwaghmare.com
Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन
WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा
ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा
Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप
Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !
Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त
Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह
SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !
PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या
PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह
Prisma : फोटोला द्या खर्याखुर्या चित्रासारखा इफेक्ट
Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह ..
Camera 360 : कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस
Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप
Open Camera : साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन
SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार !
SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा
Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने
Parallel Space : एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर!
VLC : पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा
MXPlayer : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा
Saavn / Gaana / Hungama: गाणी ऐका मोफत ऑनलाइन
Hotstar / Voot / Sony LIV : लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!
trackID, Shazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप
FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये !
ShareIt, Xender : फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय !
Google Fit : दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक ठेवा
Go Launcher / Nova Launcher : तुमच्या फोनमधील मेन्यूला वॉलपेपर, अॅप्लिकेशनला नवा लुक देण्यासाठी वापरा हे लॉंचर्स, आवडीनुसार थीम,रंग,आयकॉन लावा! PrinterShare, PrintHand : यूएसबी OTG असलेल्या फोनला चक्क प्रिंटर जोडून प्रिंट काढा !
Android Device Manager : हरवेलला फोन शोधण्यासाठी गूगलचं अॅप
Softkey Enabler / Simple Control: काही कारणाने हार्डवेअर बटणे खराब झाली असतील तर हे अॅप वापरा. नक्की उपयोगी पडतील !
World of Goo : भन्नाट गेम नक्की खेळून पहा
Sprinkle Island : साधी सोपी गेम पण नक्कीच गंमतशीर
Smash Hit : येणारे अडथळे फोडत कमीतकमी वेळात पुढे जाण्याची गेम
mmVector : उत्तम गेम
Clash of Clans : ही प्रचंड यशस्वी ऑनलाइन गेम आहे, ऑनलाइन मित्रांची टिम बनवून दौर्य टिम(Clan)वर हल्ला करण्यासारख्या सोयी ह्यात आहेत!
ManuGanu : साधी सोपी गेम, सुंदर ग्राफिक्स सोबत
Flipkart, Snapdeal, Amazon, eBay , : ऑनलाइन शॉपिंग
Facebook Lite : कमी हार्डवेअर ताकदीच्या फोन्ससाठी फेसबुक अॅप
Hike Messenger : भारतीय मेसेजिंग अॅप (एयरटेल ग्रुप) व्हाट्सअॅपपेक्षा अधिक अनेक दर्जेदार सुविधा, खास भारतीयांसाठी स्टीकर्स !
Opera Max : इंटरनेट डाटा वाचवण्यासाठी ओपेराचं अॅप्लिकेशन
Google Indic Keyboard : भारतीय भाषांमध्ये टाइप / लिहिण्यासाठी गूगलचा कीबोर्ड
Unified Remote : तुमचा पीसी तुमच्या फोनने कंट्रोल करा !
Tablet Remote, RemoDroid : तुमचा अँड्रॉइड फोन दुसर्या अँड्रॉइड फोनवरून कंट्रोल करा !!
mmAZ Screen Recorder : फोनच्या स्क्रीनचा व्हिडिओ काढण्यासाठी अॅप
Automatic Call Recorder : फोन कॉल्स रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी फ्री अॅप्लिकेशन !
TeamViewer : तुमचा कम्प्युटर तुमच्या फोनमधून कंट्रोल करा !
AppLock : अॅप्लिकेशनला लॉक घालण्यासाठी सर्वोत्तम अॅप
Google Goggles : QR कोड स्कॅन करा, भाषांतर करा, पर्यटन स्थळे ओळखा
SkyMap / StarChart : ह्या अॅप्सच्या मदतीने घ्या अवकाशातील ग्रह तार्यांचा वेध !
ISS Detector : International Space Station ची सध्याची स्थिती पाहण्यासाठी अॅप
Paytm, FreeCharge, Mobikwik : फोन क्रमांक रीचार्ज करा, पैसे पाठवा/मिळवा, खरेदी करा.
*कलात्मक ऍप्स*
_तुमच्याकडे कलात्मकता आहे आणि तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल; तर ही काही अॅप्स तुम्हाला तुमची कलात्मकता वाढवण्यासाठी नक्की उपयोगी पडतील. काहीवेळा तितकीशी खास नसलेली काही अॅप्स जास्त रेटिंग घेऊन वर आलेली असतात अन् त्यामुळे काही भन्नाट अॅप्स मागे पडतात. त्यामुळे अशाच काही खास अॅप्सची माहिती..._
*_फोटोमॅथ:_*
इमेजेसमध्ये असलेली गणितं सोडवण्याचं काम सोपं करायचं असेल, तर फोटोमॅथ तुमच्यासाठी बरेच उपयुक्त आहे. इमेजच्या स्वरूपात असलेल्या गणिताला कॅमेऱ्याने टिपून, या अॅपच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतं. हे गणित कॅमेऱ्याने टिपले की, तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. या अॅपमध्ये कॅलक्यूलेटर देखील आहे.
*_डांगो:_*
तुम्ही ईमोजीचा भरपूर वापर करत असाल, तर हे अॅप तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कुठल्याही प्रकारचे मेसेजिंग अॅप चालू केल्यावर डांगो आपलं काम सुरू करतं. तुम्हाला येत असलेल्या मेसेजेसवर योग्यप्रकारे नजर ठेवून, त्या संभाषणासाठी महत्त्वाचे असलेले ईमोजी आणि जिफ्स वापरण्यासाठी तुम्हाला मदत करायचं काम या अॅपमुळे अत्यंत सोपं होतं.
*_इंकइट_*
अनेक कादंबऱ्यांचा संग्रह असलेलं अफलातून अॅप म्हणजे इंकइट! वेगवेगळ्या धाटणीतील या कादंबऱ्या वाचण्यासाठी विनामूल्य आहेत. इंटरनेट नसताना वाचण्यासाठी तुम्ही या कादंबऱ्या डाउनलोड करून ठेऊ शकता. ज्या शैलीतील वाचन तुम्ही नियमितपणे करता, त्या शैलीतील इतर पुस्तकांचे प्रस्ताव तुम्हाला सतत देणारे हे अॅप वाचनासाठी निश्चितच फायदेशीर आहे.
*_मूडकास्ट:_*
तुमच्या रोजच्या दिनक्रमावर लक्ष ठेवण्याचं काम हे अॅप करतं. नेहमीच्या सवयींवर लक्ष ठेऊन, नव्या चांगल्या सवयी लावण्यास हे अॅप मदत करतं. थोडक्यात तुम्ही या अॅपवर तुमची रोजची डायरी लिहू शकता. फेसबुकला जोडले जाऊन मूडकास्ट तुमच्या एफबी पोस्टनुसार तुमच्या मूडवर लक्ष ठेवण्यासही सक्षम आहे. याच्याच मदतीने तुमच्या सवयी बदलण्यास ते हातभार लावतं.
*_पॉडकास्ट गो:_*
अँड्रॉइड फोनसाठी सर्वोत्तम पॉडकास्ट प्लेअर असं या ऍपला म्हणता येईल. तीन लाखाहून अधिक पॉडकास्ट्स त्यांच्या विविध श्रेणींनुसार तुम्हाला इथे मिळतील. यात ट्रेंडिंग आणि प्रसिद्ध पॉडकास्ट्स शोधणंही फार सोपं आहे. तुम्ही अर्धवट सोडलेले शो किंवा नवे शो यांची वेगळी यादी तयार करायची सुद्धा सोय यात आहे.
www.gajananwaghmare.com
IRCTC : रेल्वेचं तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगसाठी अॅप
www.gajananwaghmare.com