Wednesday, July 25, 2018

या 8 कारणांनी हॅंग आणि स्लो होतो फोन, काय आहे यावर उपाय?

🔰⚜💠Ⓜ🅰🅿💠⚜🔰

*या 8 कारणांनी हॅंग आणि स्लो होतो फोन, काय आहे यावर उपाय?*

   ⚜  *प्रदीप कुंभार* ⚜

*स्मार्टफोन जेव्हा जुना होतो तेव्हा फोन स्लो होणे किंवा हॅंग होणे अशा समस्या होतात. त्यामुळे काहींना फोन पुन्हा पुन्हा रिस्टार्ट करावा लागतो. ही समस्या केवळ जुन्याच फोनमध्ये होते असे नाहीतर काही नव्या फोनमध्येही होते. यांची वेगवेगळी कारणे असू शकतात. कधी कधी फोनमधील हार्डवेअर स्पेसिफिकेशन आणि सॉफ्टवेअरसोबत यूजर्सकडून केली जाणारी छेडखानीही याचं कारण असू शकते. चला जाणून घेऊया स्मार्टफोन हॅंग किंवा स्लो का होतात? काय आहेत त्यावरील उपाय?*

*1) रॅम कमी असणे :*

मार्केटमध्ये आता 8 जीबी रॅम असलेले फोनही उपलब्ध आहेत. रॅम जास्त जीबीची असल्याने मल्टीटास्किंग दरम्यानही फोन स्लो किंवा हॅंग होत नाही. फोन रिस्टार्ट करण्याचीही गरज पडत नाही. पण जेव्हा विषय 4 ते 5 वर्ष जुन्या स्मार्टफोनमधील 512 एमबी ते 1 जीबी रॅमचा येतो तेव्हा मेमरी कमी होऊ लागते. यातील मल्टीटास्किंगमुळे फोन स्लो आणि हॅंग होतो.

*काय करावे?*

ज्या फोनमध्ये रॅम कमी असते त्यात डेटा कमी असायला हवा. त्यासोबतच केवळ कामाचेच अॅप इन्स्टॉल करा. जास्त स्पेस घेणारे अॅप इन्स्टॉल करु नका.

*2) अॅप तसेच ओपन ठेवणे :*

ही चूक जवळपास सगळ्याच यूजर्सकडून केली जाते. जेव्हाही एखादं अॅप ओपन केलं जातं ते वापरल्यानंतर बंद करण्याऐवजी अनेकजण बॅक करतात. त्यांना वाटतं की अॅप बंद झालं. पण ते अॅप केवळ मिनिमाइज होऊन बॅकग्राऊंडमध्ये ओपन राहतं. त्यामुळेही फोन स्लो होतो.

*काय करावे?*

जेव्हाही एखाद्या अॅपचा तुम्ही वापर करता तेव्हा ते वापरल्यानंतर योग्यप्रकारे बंद करा. यासाठी एन्ड की वर टॅप करा. काही फोनमध्ये हे काम वेगळ्या की ने केले जाते.

*3) अॅप्लिकेशन अपडेट करणं:*

तुमच्या फोनची रॅम 521 एमबी किंवा 1 जीबी असेल आणि मेमरी 4 जीबी किंवा 8 जीबी असेल, तर फोनमधील इन्स्टॉल अॅप अपडेट करु नका. फोनची इंटरनल मेमरी ऑपरेटींग सिस्टम आणि अॅप्ससाठी वेगळी असते. म्हणजे यूजर्सना कधीही पूर्णपणे मिळत नाही. अशावेळी तुम्ही जेव्हाही अॅप अपडेट करता तेव्हा मेमरीची स्पेस आणखी खर्ची होते. त्याचप्रमाणे अॅप्स अपडेट झाल्याने जास्त रॅम कंज्यूम होते. त्यामुळे फोन स्लो होतो.

*काय करावे?*

फोनमध्ये केवळ तेच अॅप अपडेट करा जे तुमच्या कामाचे आहेत. ज्याचा तुम्ही रोज वापर करता. अॅप्सच्या ऑटो फीचर अपडेटला प्ले स्टोर सेटिंगमध्ये जाऊन ऑफ करा.

*4) कॅशे क्लिअर न करणे:*

कॅशे (CACHE) बाबत कदाचित अनेक यूजर्सना माहीत नसेल. जेव्हाही आपण अॅपचा वापर करतो तेव्हा त्या अॅपशी निगडीत टेम्पररी डेटा स्टोर होतो. यालाच कॅशे म्हटले जाते. यामुळे हा डेटा फोनची रॅम कंज्यूम करतो. तसेच मेमरीची स्पेसही घेतो. त्यामुळे हा कॅशे डेटा आठवड्यातून एकदा क्लिअर करायला हवा.

*काय करावे?*

फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अॅप्समध्ये जावे. कोणत्याही अॅपच्या आत गेल्यावर तुम्हाला क्लिअर कॅशे आणि क्लिअर डेटा असे दोन पर्याय दिसतात. त्यातील कॅशे क्लिअर करायला हवे.

*5) APK फाइल इन्स्टॉल करणे :*

अनेक असे अॅप्स असतात जे प्ले स्टोरवर उपलब्ध नसतात. असे अॅप्स थर्ड पार्टी किंवा APK फाइलच्या मदतीने फोनमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकतात. हे फारच धोकादायक असतं. यामुळे फोन स्लो आणि हॅंग होतो. सोबतच यामुळे डेटा लिक होण्याचीही शक्यता असते.

*काय करावे?*

कधीही थर्ड पार्टी अॅप्स इन्स्टॉल करु नका. केवळ तेच अॅप इन्स्टॉल करा जे गुगल प्ले स्टोरमध्ये उपलब्ध असतील. कधीही वाय-फाय किंवा ब्लूटूथच्या मदतीने अॅप्स फोनमध्ये इन्स्टॉल करु नका.

*6) अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅपचा वापर :*

काही यूजर्स असे मानतात की, फोनमध्ये अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅप इन्स्टॉल करुन फोनची स्पीड वाढवली जाते. पण असे काहीही नाहीये. अॅंटीव्हायरसमुळे फोनच्या सिक्युरिटीवर जास्त प्रभाव पडत नाही. दुसरीकडे या अॅपमुळे फोनच्या मेमरीची स्पेसही खर्ची होते.

*काय करावे?*

तुमच्या फोनमध्ये अॅंटीव्हायरस किंवा क्लीनर अॅप असतील तर नको  ते लगेच अनइन्स्टॉल करा.कारण काही क्लिनर मोबाईल मध्ये इनबिल्ट उपलब्ध असतात.

*7) मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर :*

फोनच्या इंटरनल मेमरीमध्ये स्पेस निर्माण करण्यासाठी काही यूजर्स मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर करतात. असे केल्याने इंटरनल मेमरीमध्ये तर स्पेस निर्माण होते, पण फोनची बूटिंग प्रोसेस वाढते. जेव्हा अॅप्सना मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर केले जाते तेव्हा ते अॅप्स ओपन केल्यावप फोन मेमरी कार्डला सर्च करतं. कारण हे मेमरीचं सेकंड प्लॅटफॉर्म असतं त्यामुळे फोन याला रिड करण्यात थोडा वेळ घेतो.

*काय करावे?*

मेमरी कार्डमध्ये अॅप ट्रान्सफर करु नये. त्याऐवजी फोनमधील व्हिडीओ, ऑडिओ किंवा इतक फाइल मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर कराव्यात.

*8) व्हॉट्सअॅप फाइल :*

तुमच्या व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडीओसोबतच GIF, PDF, कॉन्टॅक्ट, ऑडिओ या इतर फाइलही येतात. यूजर्स या फाइल पाहतात, ऐकतात पण डिलिट करत नाहीत. इतकेच नाहीतर या फाइल जितक्यांदा फॉरवर्ड केल्या जातात तितकी जास्त स्पेस खर्ची होते. म्हणजे फोनची मेमरी यामुळे दुप्पट भरली जाते.

*काय करावे?*

व्हॉट्सअॅपच्या मीडियामध्ये जाऊन त्या फाइल लगेच डिलिट करा. त्यासोबतच सेंड मीडियामध्ये जाऊन फाइल्स डिलिट करा.

🔰⚜💠Ⓜ🅰🅿💠⚜🔰

No comments: