💉🌡 *मिशन मिझल्स रुबेला*💊💉
💉 *गोवर व रुबेला ह्या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १००% लसिकरण दि.१४.११.२०१८ ते ३१.१२.२०१८ या कालावधीत प्रत्येक शाळेत करण्यात येणार आहे.ज्या प्रमाणे पोलीओ या रोगाचे उच्चाटन झाले आहे त्याच प्रमाणे लसिकरणाद्वारे गोवर व रुबेला या रोगाचे सुध्दा १००% उच्चाटन अभिप्रेत आहे.*
💉 *वयोगट ९ महिने ते १५ वर्षाची प्रत्येक मुला,मुलीं ह्या लसिकरणाच्या लाभार्थी आहेत.शालेय वयोगटातील ६५% विद्यार्थी या लसिकरणाचे लाभार्थी असतील.*
💉 *यापुर्वी गोवर किंवा MMR ची लस दिली असेल तरीही या अभियाना अंतर्गत परत आपल्या मुला मुलींना हि लस देणे बंधनकारक आहे.लस उजव्या दंडाखाली ०.५ मि.ली. एवढ्या प्रमाणात MR 1,MR 2 ह्या दोन लसिचे लसिकरण झाल्यानंतर गोवर व रुबेला रोगाचा १००% नायनाट होणार आहे.*
💉 *या अभियानात शिक्षण विभागाला सहभागी करण्याचे प्रमुख कारण म्हणजे शालेय बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे.बालक निरोगी असेल तरच १००% शाळेत उपस्थित राहून शिक्षणामध्ये सुध्दा प्रगत असेल.*
💉 *गोवर व रुबेला साठी मुख्याध्यापकांनी फाॅर्म नं.७ F मध्ये शाळेची विद्यार्थी संख्याची माहिती भरुन दि.०३.०९.२०१८ पर्यंत माहिती आपल्या केंद्रप्रमुखांकडे देणे.प्रत्येक शाळेमध्ये एक Nodal Teacher यांची नियुक्ती मुअ यांनी करावयाची आहे. आपणास १००% उद्यिष्ट पुर्ती करावयाची असल्यामुळे जे विद्यार्थी आता शाळेतुन बाहेरगावी स्थलांतरीत झाले आहेत व ते ३१.१२.२०१८ पुर्वी शाळेत येणार नाहीत ते विद्यार्थी आपल्या शाळेतुन लसिकरणिसाठी लाभार्थी राहणार नाहीत.यांची सर्व मुअ,शिक्षकांनी नोंद घ्यावी.*
💉 *वर्ग शिक्षकांनी वर्गाची माहीती फाॅर्म नं.१ मध्ये भरणे आवश्यक आहे.पालक व शिक्षकांची सभा घेऊन पालकांना लसिकरणाचे महत्व समजावून देणे. यासाठी शाळेत आरोग्य विभागांच्या कर्मचारी यांना आमंत्रित करावे.वर्गातील विद्यार्थ्यांशी दोनदा संवाद साधणे.त्याची नोंद फाॅर्म नं.१ मध्ये संवाद १,संवाद २ म्हणुन करावी.विद्यार्थ्यांची या मोहिमे दरम्यान पेंटीग स्पर्धा शाळेतच घ्यावी. लसिकरणाबाबत मुलांच्या मनातील भिती घालविणे.पालकांकरीता आरोग्य विभागा कडुन देण्यात येणारे माहिती पत्रक मुलांमार्फत पोहच करणे.*
💉 *प्रत्यक्ष लसिकरणाच्या दिवशी शाळेत २ खोल्या तयार कराव्यात.१ टिम २०० विद्यार्थ्यांना दिवसात लसिकरण करु शकते.एका खोलीमध्ये एकच विद्यार्थी जाऊन लस घेईल.दुसर्या खोलीत LED,प्रोजेक्टर वर मुलांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम प्रदर्शित करावेत.दुसर्या खोलीत ३० मिनीट लस दिलेले मुल बसल्यानंतर त्या लस दिलेल्या मुलाला घरी जाऊ द्यावे.*
💉 *लसिकरण दिलेल्या मुलाची नोंद फाॅर्म नं.९ H मध्ये करावी.लसिकरणास गैरहजर मुलाची नोंद फाॅर्म नं.९ B मध्ये करण्यात यावी.*
*लसिकरण झालेल्या प्रत्येक मुलास एक आरोग्य विभागा मार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.*
*सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांना विनंती आहे की,हि गोवर रुबेला मोहिम आपणास १००% उद्यिष्ट पुर्ती करावयाची आहे.त्यादृष्टीने आपले व सर्व पर्यवेक्षणाय यंत्रणेच्या सहकार्याची आवश्यकता आहे.*👏👏👏
No comments:
Post a Comment