स्व.दादासाहेब रामदास गणपत झांबरे .शिक्षण महर्षी यांचे नाव भुसावळ हायस्कूल, भुसावळला देणाचा आजच्या सर्व साधारण सभेत एकमताने निर्णय होऊन मंजूर झाला.
दादासाहेब मूळचे बामणोद,त्यानी सुरुवातीला चार वर्षे कोल्हापूरच्या रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शाळेत काम केले.नंतर साळुंखे व पवार यांचे सोबत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथे निर्माण केली.जळगाव जिल्ह्यात 18 माध्यमिक शाळा काढल्यात.निंभोरा,खानापुर, हिंगोणा,किन्ही,विवरा,भुसावळ,धानोरा . .नंतर कोल्हापुर स्वामी विवेकानंद संस्थेतुन जळगाव जिल्हातील शाळा साठी वेगळी सातपुडा शिक्षण संस्था स्थापन केली येथील काही शाळा स्थानिक लोकांच्या ताब्यात दिल्या.त्याच्या दोन्ही संस्था स्थापन कार्यकाळात त्यानी एकुण 240 माध्यमिक शाळा काढल्या.सातपुडा शिक्षण संस्थेत त्यानी अनेक वर्ष सचिव पदाचे कामकाज केले.
No comments:
Post a Comment