Tuesday, April 13, 2021

Happy anniversary vijay sir

 सुखी संसाराची वर्षे...! 💐

 सोशल मिडीया मधून मला मिळालेल सुंदरस नातं म्हणजे ताई आणि भाऊजी च आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्या निमीत्ताने हा शब्द प्रंपच     

     संसारात सुखाचा शोध घ्यायचा असतो म्हणून "लग्न" संस्कारांचा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. लग्न हे विश्वासाचे प्रतिक आहे. मायेची गुंफण करून घट्ट करता येणार्‍या... रेशीमगाठी आहेत. माहेर-सासरची गाणी गात, सुखाला नकार आणि दुःखाला होकार देत संसार करणारे...अनेक सुखी जोडपी समाजात आहेत. अशीच एक आदर्श जोडी... अवघाची संसार सुखाचा करीन.. आनंदे भरीन तिन्ही लोके...तुकोबांनी सांगितलेला उपदेशाचा जागर करून सुखाने संसार करणारी. 

भुसावळ येथील चौधरी..... आदरणीय विजय भाऊजी व सौ. माधुरी चौधरी ताई यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. या दांपत्याच्या लग्नाला मंगळवार ता. 13 एप्रिल . रोजी 21 वर्षे झालीत. श्री.विजय व सौ.माधुरी चौधरी या आदर्श जोडीला मनापासून आभाळभर शुभेच्छा...खर म्हणजे, लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. लग्न झाल्यावर दोनाचे चार होतात. संसार गाडा सुरू होतो. यथावकाश संसारला फुल ही येतात. परंतू लग्न म्हणजे काय, संसार कसा असतो, याचे फारसे ज्ञान - समज आलेली नसते. घर व अवतीभवती असलेल्या अनुभवी आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रांच्या गोतावळ्यात या संसाराची माहिती मिळते, आणि सुरू होतो...एका जिवलग जोडीदाराच्या सहवासातला संसार..! बहिणाबाई च्या शब्दात... अरे संसार संसार....खोटा कधी म्हणू नई...राऊळाच्या कळसाला...लोटा कधी म्हणू नई..! 21 वर्षांपूर्वी 

चौधरी आणि भंगाळे कुटुंबातील दोन नात्यातील हे बंध जुळले आणि रेशीमगाठी बांधल्या गेल्या. खर म्हणजे, घर या नावाचे कार्यालय कोणत्याही साप्ताहिक सुट्टी शिवाय चालवण्याची जबाबदारी केवळ पत्नीच करू शकते. त्यात पतीचा सहभाग असेल तर चार चांद लागतात. असा समन्वय दोघांनीही ठेवलाय म्हणूनच संसाराचा रथ पुढे गेला आहे. ही खुप अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. लग्नानंतर पत्नी सासरी येते. तिला कोणाची ओळख नसते. असे असताना समरस होऊन, ती घराला घरपण आणते. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, राजे हो; तुमची सुखदुखे सारखीच असतात. झोपडीत आणि महालात अशा दोन्ही ठिकाणी जिंदगी कटतेच ना, आपण पहातो व मानतो तसे सुखे आणि दुखे दिसतात. संत तुकडोजी महाराजांच्या, या झोपडीत माझ्या...या कवितेत जगाचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे समाधानात सुख आहे. अशा सुखाच्या जगात चौधरी कुटुंब समाधानी आहे. 

शेवटी अस आहे की, एकमेकांच्या विश्वासाने आपण पुढे जातो. कधी ती पुढे तर कधी तो पुढे....एका अर्थाने आपण पायी चालत असताना कधी एक पाय पुढे असतो, एक मागे असतो. पण मागचा ही काही अंतराने पुढे येतो. अस पुढे मागे येताना कोणालाही "इगो" राहत नाही, असेच आपल्या संसारात आहे. महात्मा गांधी यांच्या पत्नीच निधन झाल्यावर, कस्तुरबा यांना शेवटच्या वेळी गांधीजी त्यांच्या देहा शेजारी उभे होते. कोणीतरी त्यांना म्हणाले की, बापूजी उन्हातून सावलीत चला...तेव्हा बापू म्हणाले, कोणत्या सावलीत उभे राहू... सावली संपली...! पत्नीबोध घडतो तेव्हा कुटुंबातील तिचे महत्त्व अधोरेखित होत जाते. या अर्थाने कुटुंबात दोघांची भूमिका महत्त्वाची असते. एकमेकाच्या विश्वासावर सुरू झालेल्या संसारात पती आणि पत्नी या दोन्ही चाकांची गरज असते. अठरा वर्षाच्या सुखाच्या संसारात, यापुढील काळातही 

तुम्हा दोघांचा प्रवास असाच हसत खेळत सुरू रहावा, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आपणास लग्न वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..! एका शायरच्या दोन ओळी... आपल्यासाठी...

ख्वाईश ए जिंदगी बस इतनी सी है...के साथ तुम्हारा हो, और जिंदगी कभी खत्म ना हो...!

वाढदिवसाच्या गजानन मय शुभेच्छा ताई व भाऊजी

*शुभेच्छुक गजानन चौकटे परिवार*

No comments: