Saturday, April 29, 2017

*असे का ?*

जो प्रामाणिकपणे काम करतो
त्यालाही नाव ठेवतातच
 त्याच्या उणिवा शोधून काढून
 त्याला दुखावत असतात
*असे का ?*

जो काहीच करत नाही
इकडचे तिकडचे करत
 असतो
तोंड चोपडेपणा करत
 बसतो
तो बरा म्हटला जातो
*असे का ?*

जो हजर नसतो
मात्र उपदेशाचे डोस
हजर वाल्यांना पाजले
 जातात
*असे का ?*

देणारे देत असतात
घेणारे घेत असतात
बोंबाबोंब दुसरेच
करणारे असतात
*असे का ?*

सर्वांना दिसते
सर्वांना समजते
समजून उमजून सुध्दा
गप्प सर्वजण बसतात
*असे का ?*

जबाबदारी स्विकारून
तळमळीने काम करून
कामात व्यस्त राहून
त्याच्याच मागे जास्त
ससेमिरा राहतो
*असे का ?*

जो करतो
तोच मरतो
त्यालाच संघर्षाला
सामोरे जावे लागते
*असे का ?*

तोंड दाबून बुक्क्याचा मार
बळी तो कान पिळी
नको कटकट म्हणून
गुपचूप जावून मिळी
*असे का ?*

कितीही कमवा
कितीही करा
तरी मेल्यावर
सोबत काहीही
नेत नाही
*असे का ?*
-------------------------------
*रचना* ✍🏻 *शांतीसुत*
         *पी .टी. पाटील.*
                   *जामनेर*
🙏🏻🙏🏻✍🏻💐💐✍🏻🙏🏻🙏🏻

No comments: