Sunday, May 7, 2017

अभंग

निष्फळची कर्म || समाजाचा धर्म ||
सेवा हेची मर्म ||  सत्संगाचा ||

नकोच आळस || भाकर कष्टाची ||
पुजा ही श्रमाची || अखंडित ||

तनूचा संयम || पाळावे नियम ||
साधेल मनाची || एकाग्रता ||

 सत्यची वदावे || असत्य सोडावे ||
सत्कर्माची कास || धरोनिया ||

 ऐकूनच  घ्यावे  || मधे बोलो नये ||
फुकाचा नसावा || अहंकार ||

हृदय तोडू नये  || प्रेमाने जिंकावे ||
हारून जिंकावे  || सकळांस ||

जीवनाचे सार ||  जपा माणूसकी ||
जगा माणूसकी || मानवा हो ||

सौ . वर्षा भोज
पुणे
७/५/१७

No comments: