श्री गजानन महाराज दर्शन व सात्वीक आहार :
कसे पोहचावे :-
जवळचे रेल्वे स्टेशन :- शेगाव (मध्य रेल्वे) व
जवळचे बस डेपो :- शेगाव बस डेपो .
रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा तळ आहे.
प्रति व्यक्ती साठी १० रुपये घेतात .
तसेच रिक्षा तळाजवळ उजव्या बाजूला १५ पावलावर संस्थेचे फ्री बस दर १५ ते ३० मिनिटांनी उपलब्ध देखील आहे .
“भक्त निवास” या संस्थेच्या ठिकाणी रिक्षाने /बसने पोहोचल्यावर प्रथम भक्त निवास क्रमांक ५ या ठिकाणी जावून प्रथम रूम बुक करून घ्यावे रूम अत्यन्त सुंदर, स्वच्छ, निटनेटक्या आहे.
रूम बाबत अधिक माहिती :- देवळा जवळ रूम भक्त निवास इमारत क्रमांक २, ३, ४ ,५ निवडावे व रूम प्रत्येकी(२४ तास) रुपये १५०, १७५ ,३०० ,४००, ६००,९०० आहे .
आनंद सागर नावाचे हे ठिकाण अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण आहे . आरामात फिरल्यास 5 ते ७ तास लागतात. या ठिकाणी ठराविक अंतरावर चहा नास्ता साठी कॅन्टीन (माफक दरात) ची सोय देखील आहे .
वरील ठिकाणी जाण्यासाठी संस्थेच्या फ्री बस ठराविक वेळे नुसार आहेत .
काही वेळा पत्रक :- संस्थेच्या ठिकाणी सर्व भक्त निवास येथे सकाळी ८ ते १० पर्यंतच चहा - नाष्टा मिळते.
कारण हे चहा - नाष्टा/जेवण अतिशय स्वस्त व टेस्टी क्वालिटी व बर्यापैकी दिलेले असते ( किमत रुपये ५ ते १६ व चहा रुपये ६/- ) व ११ ते २ तर काही ठिकाणी उशिरा पर्यंत जेवण मिळते रुपये . (४०/- अमर्यादित थाळी )
नास्ता : इडली - सांबर, वडा - सांबर, पोहे, उपमा, चहा, कॉफी इत्यादी.
जेवण : २ भाज्या, पोळी, भात, १ गोड पदार्थ, मठ्ठा, चटणी, ठेचा, पापड (गुरुवार असल्या प्रसादात पिठल व चतकोर भाकर)
टीप :- संस्थेच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जेवण महाग व कमी दर्जाचे व मोजकेच मिळेल .
नियम :- दोन व्यक्तींना संस्थेच्या रूम मिळत नाही अथवा देत नाहीत . पण देवळा जवळ भरपूर हॉटेल / गेस्ट हाउस इत्यादी रुपये १५० पासून २०००/- सोयी नुसार आहेत व रूम सहज मिळतात .
साधारण गर्दीची वेळ :- शनिवार - रविवार व बुधवार - गुरुवार .
संस्थेच्या पासून लांब असलेले संस्थेच्या र रूम २ ते ३ किमी .
१) आनंद विहार(२.५ किमी ) येथे रूम व आजूबाजूचे परिसर थ्रीस्तर हॉटेल सारखे अति सुंदर आहे रूम किमत रु. ६०० च्या पुढे .
२) आनंद सागर विसावा – (३ किमी ) रूम किमत रु. १५० ते २००/२५०/३००/५०० च्या आहेत .
वरील दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी संस्थेच्या फ्री बस ठराविक वेळे नुसार आहेत . अथवा रिक्षाने (४व्यक्ति) ४० ते ५० रुपये घेतात .
१) आनंद विहार, २) आनंद सागर विसावा हे दोन्ही जागा ५०० मीटरच्या अंतरावर आहेत . आनंद सागरअतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण येथून पुढे १ किमी आहे .
रेल्वे स्टेशन १ किमी
देऊळ - २ किमी
आनंद विहार - ५०० मीटर
आनंद सागर विसावा - १ किमी
आनंद सागर अतिशय सुंदर फिरण्याचे ठिकाण .
वरील सर्व ठिकाणी जाण्यासाठी/फिरण्यासाठी अपंगाना /वृद्ध-अशक्त लोकांना /लहान मुलांसाठी संस्थेच्या फ्री व्हील चेअर /बाबा गाडी (उत्तम टाईपचे) देखील उपलब्ध आहेत .यासाठी संस्थेच्या ऑफिसमध्ये संपर्क करावे .
संपर्क : विपुल निवास व्यवस्था उपलब्ध
1) श्री मंदिर परिसर संकुल - 07265-252699, 252018/9423840852
2) भक्त निवास संकुल - 9850850891/9422064318/9423144709
3) आनंद विहार संकुल - 07265-252019/9657449496
4) आनंद सागर विसावा संकुल - 07265-253018/9657449495
5) पर्यायी निवास व्यवस्था - 9763743734/9881055023 🙏🏼धन्यवाद 🙏🏼
No comments:
Post a Comment