Sunday, August 26, 2018

Student पोर्टल

*Student पोर्टल*
दि.24/08/2018
*(सदरच्या पोस्टमधील माहिती आपल्या तालुका /बीट/ केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांना देण्यात यावी. व त्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करावी.)*

सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या *Mahastudent* App ची लिंक खाली दिली आहे.

सदरचे App गूगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येते.

*App डाउनलोड झाल्यानंतर डाव्या कोपऱ्यात तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक केल्यावर Mahastudent App च्या वापराबाबतचे मैंन्यूअल सुद्धा वाचायला मिळेल.*

विद्यार्थ्यांचे गुण

➡ *Maha student App* वरून आणि

➡ *student पोर्टल मुख्याध्यापक लॉगिन*  वरूनसुद्धा भरता येतील.

हे App इन्स्टॉल केल्यानंतर

➡ शाळेचा UDISE नंबर टाकावा.

➡ सरल पोर्टलसाठी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकावा.

➡ नंतर पासवर्ड सेट करावा.नंतर हे app सुरू होईल.

जर वर्ग शिक्षक Assign केले नसतील तर App डाउनलोड करून सुद्धा App रजिस्टर करता येणार नाही.

*शिक्षक Assign कसे करावेत.*

त्यासाठी  student पोर्टल लॉगिन करा.

लॉगिन केल्यावर आडव्या बार मधील  *Master* टैब मधील
*Create Teacher User*
या सबटैबवर  क्लिक करा.

खालील चौकटीत शिक्षकांची नावे दिसतील  त्यामधील शेवटच्या रकान्यात *Update/ Delete* वर क्लिक करा.

त्या शिक्षकाचे नाव वरील चौकटीत आलेले दिसेल.

1) जर आपल्या शाळेतून शिक्षक बदलून गेले असल्यास *Delete* वर क्लिक करा

2) जर शिक्षक बदलून गेले नसल्यास विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा

*मोबाईल नंबर*  अचूक टाका कारण याच मोबाइल नंबरवर mahastudent App चा OTP येणार आहे.

सर्व माहिती भरल्यानंतर
*Update* वर क्लिक करा.

याप्रमाणे सर्व शिक्षक अपडेट करा.
***********************

आता Update केलेले शाळेतील शिक्षक
*वर्गशिक्षक* म्हणून नेमण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

➡ आडव्या बार मधील Maintenance टैबवर क्लिक करा.

➡ Assign Class Teacher. वर क्लिक करा

आपल्या शाळेतील शिक्षकांची नावे दिसतील जर वर्गनिहाय शिक्षक बदलायचे असतील तर

➡ पहिल्या चौकटीत दिसणाऱ्या शिक्षकांच्या नावासमोरील  वर्गावर (Standard) क्लिक करा.

➡ क्लिक केल्यावर वरील चौकटीत शिक्षकाचे नाव आलेले दिसेल

➡ नावाखाली *Remove*  आणि *Reset*

हे दोन ऑफ़शन दिसतील
त्यातील *Remove* या ऑफ़शन वर क्लिक करा.

वर्गशिक्षक Remove होतील.

*आता त्या वर्गासाठी नवीन वर्ग शिक्षक नेमण्यासाठी*

वरील चौकटीत

➡ standard  सिलेक्ट करा.

➡ Stream व  Division निवडा.

➡ वर्गासाठी शिक्षकाचे नाव निवडा.

➡ Assign वर क्लिक करा

खालील चौकटीत नवीन वर्ग शिक्षकांचे नाव Add झालेले दिसेल.

याप्रमाणे सर्व वर्गांना शिक्षक नेमावेत. त्यानंतरच संबंधित शिक्षकांना App डाउनलोड केल्यावर आपला वर्ग व वर्गातील मुलांची यादी आपल्या मोबाईलवर उपलब्ध होईल.

*App डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

https://play.google.com/store/apps/details?id=io.cordova.MahaStudent

No comments: