Sunday, December 9, 2018

मनोरंजन खेळ

[12/9, 3:32 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०२)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*ओंजळीने ग्लास भरणे*
मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लास भरावा लागेल.
या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 3:32 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०१)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
        *स्मरण खेळ*
विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात. उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतर त्या वस्तू कापडाने झाकून ठेवाव्यात. नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.
जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

[12/9, 3:03 PM] vgchaudhari76: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०३)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*खोक्यातील वस्तू ओळखणे*
एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 3:03 PM] vgchaudhari76: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०४)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
    *फुगे फोडणे*
लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 3:03 PM] vgchaudhari76: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०५)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*बॉल फेकून मारणे*
या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 3:03 PM] vgchaudhari76: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०६)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*नेमबाजी*
ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा.

*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*     .
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

[12/9, 4:01 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०७)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*आंधळी कोशिंबीर*
हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 4:08 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०८)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*विष-अमृत*
एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 4:26 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(०९)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*जलद चेंडू देणे*
दोन सारखे गट तयार करणे.दोन गटातील मुलांनी आपल्या पायाखालून वा डोक्यावरुन मागच्या मुलाला जलद चेंडू देणे.ज्या गटाचा चेंडू सर्वप्रथम पास होईल तो गट विजयी होईल .
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे*
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

[12/9, 7:27 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१०)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*सूरपारंब्या*
या खेळासाठी जरा मोठया झाडांची आवश्यकता आहे. कारण त्यावर चढून, उडया मारुन हा खेळ खेळायचा आहे. झाडाच्या फांद्या पक्क्या हव्यात. २/३ पासून कितीही मुले हा खेळ खेळू शकतात. अंगणात एक गोलाकार रेखून त्यामधे एक काडी/काठी ठेवायची. एकावर राज्य व इतरांपैकी एकाने पायाखालून वर्तुळातील काठी लांब फेकायची. राज्य असलेल्या मुलाने ती काठी आणून वर्तुळात ठेवायची. तेवढया वेळात इतर मुलांनी पटापट झाडावर चढून जायचे किंवा वडासारख्या झाडाच्या पारंब्याला लोंबकळून पाय जमिनीच्या वर घ्यायचे. कुणी खाली राहिल्यास त्याला राज्य घेतलेल्या मुलाने पकडायचे (आऊट करायचे), किंवा २ मुलानी   झाडावरुन उडी मारुन काठी पुन्हा पायखालुन फेकण्याचा प्रयत्न करायचा व राज्य असलेल्या मुलाने पटकन कुणाला तरी पकडायचे. जो आऊट होईल त्याच्यावर राज्य. पुन्हा सर्वांनी पळत जाऊन झाडावर चढायचे.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 7:36 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(११)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*सागरगोटे/गजगे*
(हा मुलींचा खेळ समजला जातो.)
दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. या साठी सागरगोटे लागतात. हे एका झाडाला येतात. सागरगोटयाच्या झाडाला काटे असतात. म्हणून तयार बाजारातून आणावे. (नसल्यास वाळूतील सारख्या आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोरा एवढे दगड ही चालतील) कमीत कमी ५ गोटे हवेत. दोन्ही जणी समोरासमोर बसून हा खेळ खेळायचा (अधिक मुली असल्यास गोलाकार बसावे) एका हाताने पाची सागर गोटे जमिनीवर हळूच पसरवून टाकायचे शक्यतो एकमेकाला चिकटू नयेत चिकटल्यास दुस-या मुली कडून मुंगीला वाट मागावी हळूच सरकवून अलग करावे. एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवरचा दुसरा एकच सागर गोटा उचलावा व उंच उडवलेला सागरगोटा झेलावा असे झेलत उचलत जावे. उचलतांना झेलतांना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला. नाहीतर पुन्हा खेळायचे पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई, तिस-याला तिरखई, चौखई असे. दुस-या वेळी एक सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे एकदम उचलायचे. तिरखईला ३ उचलायचे अशात-हेने पहिली फेरी संपते. दुस-या फेरीत 'उपली सुपली' करायची म्हणजे सर्व सागरगोटे दोन्ही हातांनी (ओंजळीने ) हळूच वर उडवायचे व सर्वच्या सर्व हाताची उपली ओंजळ करुन त्यात पकडायचे. यातही ३ प्रकार एकदा एकच हात उलटा करायचा उजवा डावा मग दोन्ही पाच खडे घेतले असल्यास प्रत्येकी पाच वेळा असे करायचे. तिस-या फेरीत 'चिमणी कोंबडयाची चोच' करायची म्हणजे दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुफुंन अडकवायची आणि फक्त दोन्ही हाताचे पहिले बोट सोडून त्या दोन बोटांनी खाली टाकलेले खडे एक एक करुन ओंजळीत टाकायचे. सर्व खडे टाकुन होईपर्यंत एकही गोटा खाली पडता कामा नये. चौथ्या फेरीत 'हंडी चढवायची’ म्हणजे पाच खंडयापैकी दोन दोन खडे जोडून जमिनीवर ठेवायचे व पाचवा खडा उंच फेकून, दोन खडयांची जोडी उचलायची व वरचा खडा झेलायचा नंतर परत एक खडा वर फेकून जमिनीवरची दुसरी जोडी उचलायची व पहिली जोडी जमिनीवर ठेवायची. असे लागोपाठ सतत ५० ते १०० वेळा (जेवढयाची हंडी ठरली असेल तेवढे) करायचे म्हणजे ती जिंकली. ऐरखई- दुरखई करतांना डाव गेला तर दुस-या भिडूला खेळू द्यायचे व पुन्हा आपला नंबर आला की पुढील डाव खेळायचा. सर्व फे-या जिच्या लवकर पु-या होतील ती जिंकली. एकदा सवय झाली की खडे ५-७-९ असे वाढवता ही येतात.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 7:42 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१२)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*पिदवणी/खुपसणी*
हा खेळ प्रामुख्याने पावसाळयात खेळला जातो. पाऊस पडत असला कि अंगणात इतर खेळ खेळता येत नाही तर पण थोडा पाऊस थांबला की हा खेळ खेळता येतो. जमीन ओलसरच असावी. यासाठी दोन किंवा कितीही मुले चालतात.
एक लोखंडाची छोटीशी ६ ते ९ इंच लांबीची काडी(कांब) घ्यायची. बारीक गजाचा तुकडा, किंवा मोडक्या छत्रीची लहानशी काडीही चालेल. पण कडक हवी.या काडीस जमिनीत खुपसण्यासाठी निमुळते टोक हवे. एकावर राज्य द्यायचे व इतरांनी ती काडी ओल्या जमिनीत/चिखलात रुतवायची. अशी फेकायची की जमिनीत खोचली गेली पाहिजे. पडली तर डाव गेला. अशी काडी रुतवत फेकत लांब जायचे डाव जाईपर्यंत सर्व भिडूंनी लांब लांब न्यायचे व नंतर राज्य असलेल्या मुलाने तेथपासून मूळ ठिकाणापर्यंत लंगडी घालत यायचे. जास्त मुले असली की खूप लांब दमछाक होते म्हणून याला पिदवणी म्हणायचे. कांब जमिनीत खुपसायची म्हणून या खेळास खुपसणी असेही म्हणतात.एखाद्या खेळात दमवणे याला 'पिदवणे ' असे म्हणत असत.

लेखन : माधुरी अंतरकर
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

[12/9, 8:12 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१३)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*शिवाजी म्हणतो..*
पळापळीचे, उडया मारण्याचे खेळ खेळून झाल्यावर खूप दमायला होतं. अशा वेळी जेव्हा पळापळीचे खेळ खेळायचा कंटाळा येतो, तेव्हा एखादा बैठा खेळ खेळावासा वाटतो. त्यातलाच एक मजेशीर खेळ म्हणजे ‘शिवाजी म्हणतो..’ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शिवाजी म्हणतो म्हणजे नक्की काय? आणि हा खेळ कसा काय होऊ शकतो? म्हणूनच आपण या जुन्या खेळाविषयी अधिक जाणून घेऊया..
कोणताही खेळ खेळायचा म्हणजे त्यामध्ये आधी सुटावं लागतं. जो शेवटी राहणार त्याच्यावर राज्य हा नियम सगळ्याच खेळाप्रमाणे या खेळातही लागू होतो, पण या खेळात आणि इतर खेळातला मुख्य फरक असा की, इतर खेळात राज्य येणा-या एकटया खेळाडूला इतर खेळाडूंना पकडावं, शोधावं लागतं. मात्र या खेळात जो खेळाडू शेवटचा सुटणार त्याच्यावर नियमाप्रमाणे राज्य येतं. तो ‘शिवाजी’ बनतो आणि इतरांना आज्ञा करतो. तो जे सांगणार ते इतर खेळाडूंना ऐकावं लागतं. मग तो, ‘शिवाजी म्हणतो, हसा’, डोक्याला हात लावा’, ‘हसता हसता मधेच थांबा’, ‘डोळे बंद करा’ अशी फर्मानं सोडतो आणि इतर खेळाडू ती ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात. जो खेळाडू त्याच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा चुकेल तो त्या खेळातून बाद होतो. या प्रकारे सगळे बाद होईपर्यंत हा खेळ सुरू राहतो. सगळे बाद झाल्यावर दुसरा कोणीतरी खेळाडू शिवाजी बनतो आणि हा खेळ चालू राहतो. बैठा आणि गमतीशीर असलेला हा खेळ खेळायला खूप मजा येते.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 8:15 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१४)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*विटी-दांडू*
विटी-दांडू या खेळात विटी आणि दांडू या दोन गोष्टी असतात. हा खेळ वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो. ओलीसुकी (टॉस) करून राज्य कुणावर ते ठरवलं जातं. एखाद्या चपटय़ा खापरीला एका बाजूला थुंकी लावून ओलीसुकी केली जाते. जो ओलीसुकी जिकंतो तो पहिल्यांदा विटी उडवतो. या खेळासाठी मैदानात एक गल म्हणजे थोडा लांब खड्डा तयार करायचा. या गलवर विटी आडवी ठेवायची. गलमध्ये ठेवलेली ही विटी दांडूच्या सहाय्याने उडवायची. ही विटी उडवताना समोर उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तिचा झेल पकडला तर तो खेळाडू बाद. विटीचा झेल घेता आला नाही, तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने विटीने गुण मिळवायचे.
यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर उडवायची. विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणं हे या खेळातलं सगळ्यात मोठं कसब असतं. त्याला आबकदुबक असे म्हणतात. त्यानंतर दांडूच्या सहाय्याने विटी बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे दूर भिरकवायची. ती जिथे पडेल तिथे जाऊन पुन्हा ती दूर भिरकवायची. हे करताना विटी जमिनीवर पडली की, खेळाडू बाद होतो. हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने केलेल्या आबक, दुबकच्या प्रमाणात अंक मोजले जातात. हे झाले संघाचे गुण. आबकप्रमाणेही गुण मोजले जातात. विटी एकदाच मारली, तर हे अंतर दांडूने मोजलं जातं. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली म्हणजे आबक केलं असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजलं जातं आणि जर दुबक केलं असेल तर विटीने मोजायचं. साहजिकच आबकदुबक करण्याचं कौशल्य जास्त असेल गुण जास्त होतात. विटी-दांडूचा हा खेळ भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, नेपाळ, कम्बोडिया, इटली या देशांमध्येही खेळला जातो.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 8:17 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१५)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*चोरचिठ्ठी*
उन्हाळा म्हटलं की, आपल्याला घरी बसून बैठे खेळ खेळणं जास्त सोयीचं वाटतं. कारण उन्हात धावपळीचे खेळ खेळून आपण थकून जातो. अशा वेळी चोरचिठ्ठी हा खेळ खेळायला छान आहे. या खेळाची आणखी एक गंमत म्हणजे या खेळात कोणताही खेळाडू बाद होत नाही. या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलिस असे पाच जण असतात आणि प्रत्येकाला गुण असतात. म्हणजे राजाला पन्नास, राणीला चाळीस, प्रधानाला तीस, पोलिसांना वीस आणि चोराला दहा गुण. या खेळाची सुरुवात करताना वहीचं एक कोरं पान घ्यायचं. त्या पानाच्या पाच चिठ्ठय़ा करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलिस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचं आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठय़ा एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठीत जे नाव असेल ते कोणालाही सांगायचं नाही. ज्या मुलाच्या हाती ‘पोलिस’ असं लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचं. नंतर पोलिस असलेल्या खेळाडूने ‘चोर’ कोण आहे हे ओळखायचं.
चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशारे न करता गुपचूप बसून राहायचं. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखलं, तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला तर तो हरला. तो जिंकला तर त्याला चोर आणि स्वत:चे मिळून तीस गुण मिळतील आणि हरला तर शून्य आणि ते तीस गुण चोराला जातील. या खेळाच्या अशा अनेक फे-या चालतात. पहिली फेरी संपली की, एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात. मग पुन्हा चिठ्ठय़ा उडवून खेळ सुरू करायचा. हा खेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही खेळू शकता. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात, ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील तो ‘चोरचिठ्ठी’ खेळाचा विजेता बनतो आणि या खेळात चिठ्ठय़ा एकदाच बनवायच्या आणि त्या जपून वापरायच्या. अशाने वह्यांची पानं खराब होत नाहीत.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 8:21 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१६)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*डब्बा ऐसपैस*
डब्बा ऐसपैस हा लपाछपीचाच खेळ असतो. मात्र या लपाछपीत डब्याचा आणि (डबा नसेल तर नारळाच्या करवंटीचा) वापर केला जातो. पाच-सहा किंवा त्याहून जास्त खेळाडू हा खेळ खेळू शकतात. या खेळात आधी राज्य कुणावर ते ठरवलं जातं. नंतर जमिनीवर एक गोलाकार रिंगण आखलं जातं. नंतर एक जण डबा किंवा करवंटी लांब फेकतो. राज्य असलेल्याला ती तिथून आणून रिंगणात ठेवावी लागते. तोपर्यंत सगळे खेळाडू लपतात.
राज्य असणा-याला त्यांना शोधावं लागतं. त्याला कुणी सापडलं तर ‘अमुक तमुक डब्बा ऐसपैस’ असं म्हणत डब्यावर काठी आपटून त्या खेळाडूला बाद करतो. या प्रकारे सगळे खेळाडू बाद होईपर्यंत खेळ चालू राहतो, पण एखादा त्याने डब्बा ऐसपैस करायच्या आधी डबा किंवा करवंटी पायाने रिंगणातून बाहेर फेकण्यात यशस्वी झाला तर त्याच खेळाडूवर पुन्हा राज्य येतं. त्याने आधी कितीही जणांना डबा ऐसपैस केलं असेल तरी त्याचा उपयोग नसतो. हा खेळ तसा साधा-सोपा असला तरी तो खेळायला अनेक गडी लागतात, तसंच जागाही मोठी लागते.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 8:24 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१७)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*कांदाफोडी*
कांदाफोडी हा एक गमतीदार खेळ आहे. या खेळीची गंमत म्हणजे हा खेळ तुम्ही कितीही जणांत खेळू शकता. या खेळात तुम्हाला शक्य तितक्या उंच उडय़ा मारायच्या असतात. ज्याच्यावर राज्य आहे तो खाली पाय पसरून बसतो आणि बाकीचे खेळाडू त्याचा पाय ओलांडून जात असतात. या खेळाच्या दुस-या फेरीत राज्य असलेला एकावर एक पाय ठेवून बसतो. एकावर एक ठेवलेल्या पायाला ओलांडणारा खेळाडू त्याच्या पायाने स्पर्श करतो, त्यालाच कांदाफोडी असं म्हणतात. या प्रकारे खेळ सुरू झाल्यावर राज्य असलेला आपल्या लांब केलेल्या पायांवर एका हाताची करंगळी धरतो आणि हात सरळ ठेवतो. उर्वरित खेळाडू ते ओलांडून जातात. मग बसलेला खेळाडू एक करंगळीवर दुसरी करंगळी ठेवतो, त्यानंतर पुन्हा सगळे खेळाडू त्याला ओलांडतात.
दुसरी आणि तिसरी फेरी कोणीही सहज ओलांडून जातो. पण जेव्हा राज्य असलेला हात-पाय एकावर एक धरून तो मनोरा उंचावतो, तेव्हा खरी मजा येते. प्रत्येक वेळी तो जे करेल, त्यावरून प्रत्येकाने उडी मारायची असते. उडी मारताना मारणारा पडला किंवा त्याच्या हात किंवा पायाचा स्पर्श झाला तर तो बाद होतो. हाता-पायाच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्यावर राज्य असलेला हाताने पायाचे अंगठे पकडून ओणवा उभा राहतो. फक्त या वेळीच खेळाडूंनी त्याला उडी मारताना हात लावला तर चालतो. सरतेशेवटी राज्य असलेला उभाच राहतो, त्या वेळी त्याला ओलांडून जाणं हे कोणालाच शक्य नसतं, त्यामुळे या खेळात एकापाठोपाठ एक सगळेच बाद होतात व खेळ नव्याने सुरू होतो..
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/9, 8:30 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१८)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*एका बोटीवर किती माणसं*
शिक्षक मुलांना वर्तुळाकार उभे करुन एका बोटीवर किती, किती माणसे असे म्हणायचे. शिक्षक ज्या दिशेने धावतात त्याच्या उलट मुलांनी धावायचे. एका बोटीवर चार - चार माणसे म्हटले की मुलांनी चार - चार जणांचे हात पकडून गट तयार करायचे. ज्यांचे चार पेक्षा कमी होतील ते बाहेर पडतात किंवा बाद होतात. असाच पुढे - पुढे अंक मोजून शेवटी एक गट शिल्लक राहिल.

लेखन:सौ.गीता कारेकर
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(१९)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*रस्सीखेच*

दोन प्रतिस्पर्धी संघ आपापली ताकद अजमावण्याच्या उद्देशाने एक जाड दोर परस्परविरुद्ध दिशांना खेचून धरीत प्रतिस्पर्ध्याला आपल्या हद्दीत ओढण्याचा प्रयत्न करतात. या स्पर्धेसाठी सु. १० ते १२ सेंमी. (४ ते ५ इंच) परिघ असलेला चांगला जाड, वाखाचा मऊ दोर वापरतात. त्याची लांबी ३२ मी. (३५ यार्ड) असते. या दोराच्या बरोबर मधोमध रंगीत फीत-बहुधा निळी बांधलेली असते. या रंगीत फितीच्या दोन्ही बाजूंना २ मी. (६ फुट, ६१/२ इंच) अंतरावर पांढऱ्या फिती बांधलेल्या असतात. त्या तिन्ही खुणांच्या खाली मैदानावर बरोबर त्याच ठिकाणी खुणा केलेल्या असतात.
स्पर्धा सुरू होताना दोराला असलेल्या फिती व जमिनीवरच्या खुणा एकमेकांसमोर (वरून पाहिले असता) आल्या पाहिजेत. प्रत्येक संघातील पहिल्या खेळाडूने आपली पकड त्याच्या बाजूकडील पांढऱ्या फितीपासून ३० सेंमी. (१२ इंच) अंतराच्या आतच केली पाहिजे. जो संघ प्रतिस्पर्ध्याची जवळची खूण आपल्या बाजूकडील जमिनीवरच्या खुणेच्या अलीकडील बाजूला खेचून आणील तो विजयी होतो. दोन्ही संघांतील नक्की विजयी संघ ठरविण्यासाठी तीन संधी दिल्या जातात.
खेळाडूंच्या दणकट मांड्या, दणकट दंड, दमदारपणा, झटकन होणारी प्रतिक्रिया आणि एकाग्रता, तसेच संघभावना या गुणांच्या जोरावर संघ जिंकू शकतो. उजव्या बाजूला दोर खेचून धरला असता डावा पाय पुढे असतो तोही ३५० च्या कोनात. एक विशिष्ट झटका देऊन एकदम सगळे वळतात व हातातील दोर खांद्यावर घेऊन तोंडे उलट दिशेला करून ओढण्यास सुरुवात करतात. खेचून घेताना प्रारंभी सर्वांच्या उजव्या बगलेखाली दोर असतो. जे डावा हात पकडीसाठी दोराखालून घेतात, ते आपल्या उजव्या बगलेखाली दोर ओढून ठेवतात. शेवटच्या खेळाडूवर बरीच भिस्त असते, तशीच ती पहिल्या खेळाडूवरही असते. शेवटच्या खेळाडूच्या एका खांद्याखालून व दुसऱ्या खांद्यावरून दोर जाऊनही जमिनीवर थोडा दोर लोळत राहिला पाहिजे.
हा शेवटचा गडी बहुधा सर्वांत वजनदार असतो, त्याला ‘अँकरमन’ म्हणतात. (अँकर म्हणजे बोटीचा नांगर, तो जमिनीत रुतविला की बोट हालू शकत नाही. ह्यावरून ही संज्ञा आली आहे). ह्या शेवटच्या किंवा मधील खेळाडूने हेतूपूर्वक बैठक मारून बसणे नियमाच्या विरुद्ध आहे. हा खेळ मैदानाप्रमाणेच आंतरगृहातही (इनडोअर हॉलमध्ये) खेळला जातो. त्यासाठी दणकट गाद्याही वापरल्या जातात. ह्या खेळाचा उगम प्राचीन असावा. चीनमध्ये सुगीच्या दिवसांत मोठमोठे स्फिंक्ससारखे दगड ओढण्याचे काम  गुलामांकडून करवून घेतले जाई, तसेच कधी कधी खलाशांना शिडे चढविण्यासाठी दोर खेचावे लागत. भारतामध्येही भारी अवजड तोफा दोरखंडाने ओढण्याचे काम फार पूर्वी चालत असे. यांसारख्या कृतींमध्ये ह्या खेळाचा उगम शोधता येईल

लेखक: प. म. आलेगावकर
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

[12/10, 8:41 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(२०)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*भोवरा*
मुलांचा एक आवडता खेळ. साधारणपणे संक्रांतीनंतर भोवरे खेळावयाचा मोसम सुरू होतो  व होळीपर्यंत चालतो. या खेळाला लहान पण मोकळी व सपाट जागा पुरते.
प्राचीन ग्रीक-रोमन काळातही भोवऱ्याचा उल्लेख सापडतो. यूरोपात चौदाव्या शतकानंतर भोवऱ्याचा वापर आढळतो. जीन व जपानमध्ये भोवरा फार पुरातन काळापासून लोकप्रिय आहे. भोवरे हे साग, शिसवी किंवा आंबा या प्रकारच्या लाकडांचे, तसेच पत्र्याचे किंवा प्लॅस्टिकचे करतात. भोवरा एका टोकाला गोलसर जाड आणि दुसऱ्या टोकाला निमुळता असतो. निमुळत्या टोकात लोखंडाची तार बसवितात. तिला ‘आर’ आणि डोक्यावरील बोंडाला ‘मोगरी’ म्हणतात. निमुळत्या भागावरून गुंडाळलेली दोरी घसरू नये म्हणून त्यावर काप किंवा खाचा असतात. मोगरीपासून कापापर्यंत भोवरे रंगवून आकर्षक करतात. निमुळत्या बाजूकडून दोरी गुंडाळल्यानंतर दोरीचे एक टोक हातात पक्के धरून झटका देऊन तो आरेवर पडेल अशा रीतीने दोरीला ओढ देत फेकला, म्हणजे भोवरा फिरू लागतो. या दोरील ‘जाळी’ आणि भोवऱ्याच्या फिरण्याला ‘नाद’ असे म्हणतात.
दोन्ही बाजूंनी निमुळत्या आणि टोकांना आर असलेल्या भोवऱ्याला ‘दुआरी भोवरा’ म्हणतात. एकेक जिल्ही आणि दोन-दोन जिल्ही असे खेळांचे दोन प्रकार आहेत. ‘जिल्ही’ म्हणजे सु. २ ते २ १/२ फूट (सु. ०.६० ते ०.७५ मी.) व्यासाच्या वर्तुळाने व्यापलेली जागा होय. एक किंवा दोन वर्तुळांत भोवरा कोचून जिल्हीतील भोवऱ्याला टोले मारून, किंवा जाळीने झेलून हे खेळ खेळतात. भोवरा टोल्यांमुळे दुसऱ्या जिल्हीत जाईल त्याला इतर खोळाडू ‘आरे’ ने ठरलेले धाव घालतात, त्याला ‘गुब्बा’ असे म्हणतात. ‘नाद जाय लूट जाय’ या खेळात दोन मुलांनी एकाच वेळी भोवरे फिरवून ज्याच्या भोवऱ्याचा नाद प्रथम जाईल, त्याने हरल्याबद्दल आपला भोवरा दुसऱ्या खेळाडूला द्यावयाचा असतो.
आर, भोवऱ्याचा निमुळता भाग आणि डोके यांचा समतोल साधला, तरच भोवरा संथपणे आणि जास्त वेळ फिरू शकतो. फिरवताना जमिनीवर पडू न देताच उसळी देऊन भोवरा स्वतःच्या हातावर घेणे किंवा जमिनीवर फिरत असलेला भोवरा मधल्या आणि अंगठ्याजवळच्या बोटांच्या मधून झटक्याने हातावर घेणे इ. भोवरा फिरविण्याचे कौशल्याचे अनेक प्रकार आहेत. सर्कशीतही कुशल भोवरे फिरविणारे आपले कौशल्य मोठे भोवरे फिरवून दाखवितात.
भोवरा आरेवर न फिरता आडवा होऊन निमुळत्या भागावरूनच फिरत गेला तर त्याला ‘कत्तर खाणे’ आणि तो उलटा मोगरीवर फिरू लागला तर त्याला ‘ढफणा’ असे म्हणतात.भोवरा खेळ वेगवेगळ्या प्रकारे ही खेळले जातात.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
[12/10, 9:02 PM] Kolhe Sir: 🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺
     
         *🎯मनोरंजक खेळ🎯*
                    *(२१)*
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*
*लगोऱ्या*

७ वा ११ खेळाडूंचे असे दोन संघ असतात.

या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. पूर्वी ही लगोरी फरशीच्या वा विटांच्या तुकड्याची असे. प्रत्येक संघातील एक एक खेळाडू लगोरी फोडण्यासाठी येतो. त्यास नेमक्षेत्रातून म्हणजेच क्रीडांगणाच्या मध्यरेषेपासून ४.५७ मीटर(१५ फूट) ते ९.१४ मीटर(३० फूट) अंतरावर १.८२ मीटर(६ फूट) लांबीची समांतर नेमरेषा आखतात. या रेषेभोवतीचा काटकोन चौकोन म्हणजे नेमक्षेत्र होय. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडण्यासाठी फेकलेला चेंडू अडविण्यासाठी वा झेलण्यासाठी रचलेल्या लगोरीच्या मागे विरुद्ध संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक व इतर दहा क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणाऱ्या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात. लगोरी फोडणारा लगोरी फोडतानाही बाद हाऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरीमागील किंवा शेजारील क्षेत्ररक्षकाने वरचेवर झेलला तर तो बाद होतो. लगोरी फोडणाराने लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणाऱ्या खेळाडूंपैकी एकानेच एकदाच पायाने  लाथाडायला परवानगी असते. ज्यांनी लगोरी फोडली आहे त्याच संघातील खेळाडूंनी लगोऱ्या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकांचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणारांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला तरी सर्व संघ बाद होतो. मात्र क्षेत्ररक्षकांकडून चेंडू न लागता जर लगोरी रचली तर त्या संघास एक गुण मिळतो. एखाद्या खेळाडूस चेंडू लागून तो संघ जर बाद झाला तर दुसरा संघ खेळण्यास येतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगोऱ्या होतात म्हणजेच अधिक गुण होतात तो संघ विजयी होतो.

लगोर्‍याच्या सामन्यात प्रत्येक डावास ८ मिनिटे वेळ असतो. प्रत्येक बाजूचे दोन डाव खेळवले जातात. खेळणार्‍या पक्षास लगोरी पाडण्याबद्दल प्रत्येक वेळी २५ गुण मिळतात. लगोरी रचण्याबद्दल प्रत्येक लगोरीस ५ गुण असतात. मारणार्‍या पक्षास गडी मारण्याबद्दल प्रत्येक गडयास ५ गुण मिळतात. ८ मिनिटांच्या आंत विरूद्ध बाजूचे सर्व गडी मारून डाव पुरा केल्यास राहिलेल्या प्रत्येक मिनिटास ५ गुण मिळतात. नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक नियमोल्लंघनाबद्दल ५ गुण कमी करतात. सामान्यासाठी एक पंच व एक हिशेबनीस असतो. पंच डाव चालू असताना गडी मेल्याबद्दल किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दलचा व इतर तक्रारींचा निकाल देतात.
*••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*    
                *🔹संकलन🔹*                                                                                        
               *श्री.संतोष कोल्हे* 
🌺🍂🌺🍂🌺🍂🌺🍂🌺

No comments: