Saturday, December 31, 2016

🌹🌹🌹 HAPPY NEW YEAR *2017*
 *आज माझ्या ब्लॉगला 1 वर्ष पूर्ण झाले*
  *आपण माझ्या ब्लॉगला भेट दिली*
*त्याबद्दल आभार*
*आज रोजी 24135भेटी* *नवीन वर्ष आनंदी जावो* खूप खूप शुभेच्छा!!!!!*    
 कसे बघता बघता ,वर्ष सरायला आले
येती नाचतच दारी ,नव्या वर्षाची पाऊले

थांबतो न कुणासाठी  ,अशी 'काळाची '   महती
पळ, घटका, दिन ,रात ,सदा पुढेच पळती

थोडी सुख दुःखाची शिदोरी ,आहे माझिया पदरी
पुढे खुणावते आहे ,रम्य स्वप्नांची नगरी

झाल्या काही चुका माझ्या , असतील दुखावली मने
तर माफ करा तुम्ही , नाही दुसरे मागणे

जीवनाचे झाले पहा ,आणखी एक वर्ष कमी
सोडू राग व्देष सारे ,  उद्याची न येथे हमी

येऊ घातले आहे रे , दिन निखळ हर्षाचे
चला मिळून स्वागत ,करू नविन वर्षाचे
शुभेच्छुक :- *विजय चौधरी , भुसावळ*
vgchaudhari.blogspot.com
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌹🌹







Wednesday, December 28, 2016

🏡  *जि.प.शाळा*  🏡                                   कळत नाई भाऊ मला
      कसं सांगू तुम्हांला  |
कमी का लेखता तुम्ही
      जिल्हा परिषद शाळेला ||
पोषण आहार, पुस्तकं
       कपडे इथं भेटतात |
गरिबाचे पोरं सारे
         याच शाळेत शिकतात ||
बंद झाली पाटी आता
        कमी झाला फळा |
जिकडं तिकडं झाल्या आता
         डिजीटल शाळा ||
ज्ञानरचना वादानं त
          कहरचं  केला  |
क-२ वाला पोरगा एकदम
          अ-२ वरचं नेला  ||
स्कॉलरशिप,नवोदयची
          स्पर्धा इथं घेतात |
 विज्ञान प्रदर्शना मध्ये
          मेडल घेऊन येतात ||
नाई इथं फी कोणती
        नाई इथं डोनेशन |
वर्गामधे  शिकवल्यावर
        हवी कशाला ट्यूशन ||
जिकडे तिकडे कॉन्वेंटचा
        होत आहे प्रचार  |
कोण म्हणतय  भाऊ इथं
         पोरं नाहीत हुशार  ||
एक वेळ जि.प. शाळेत
          येऊन  तर बघा  |
उत्तर  दयायला  प्रश्नांचे
         वर्ग  दिसेल उभा.......
             सारा वर्ग दिसेल उभा ||
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Monday, December 26, 2016

💢💢💢💢💢💢💢💢💢



 *विद्यार्थी दैनंदिन हजेरी भरण्यासाठी Daily attendance app डाउनलोड करण्यासाठी स्टूडेंट पोर्टल वर या आठवड्यात सोय उपलब्ध होणार आहे*                                                                                                                                                                                                                    

*student पोर्टल विषयी*

*उपस्थिती app बाबत*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
www.marathischooltondare.blogspot.in
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 📱    *येत्या 2 जानेवारी पासून  महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी दररोज online भरायची आहे*

*या साठी शासनाने एक app तयार केले आहे ज्याचे नाव आहे *Daily Attendance* ( *दैनिक हजेरी* )

*या app मध्ये प्रत्येक तुकडी व इयत्ता नुसार विद्यार्थी उपस्थिती भरायची आह*े

*या साठी आता पूर्व तयारी असायला हवी*

*ती म्हणजे आता प्रत्येक वर्ग शिक्षकांकडे एक android स्मार्ट📱 फोन पाहिजे*

( *प्रत्येक शिक्षका कडे स्मार्ट फोन ची गरज नाही असे मला वाटते कारण एका कडे जरी स्मार्ट फोन असला तर जो app आपण डाऊनलोड करणार आहोत त्याद्वारे प्रत्येकाचा मोबईल क्रमांक टाकून फक्त otp टाकून लॉगीन करू शकतो . पण पोषण आहार च्या app सारखी गत व्हायला नको* )

💻    *हा app आपल्या मोबईल मध्ये डाऊनलोड करण्या पूर्वी आपल्याला student पोर्टल वर सर्व प्रथम दोन कामे करावी लागतील*
*१) बदली करून गेलेले शिक्षक delete करणे व नवीन शिक्षक create करणे. हे काम आपल्याला *maintainance* *या tab मध्ये करावे लागेल ज्याच्यात *create teacher* *या मेनूत  प्रत्येक शिक्षकाचा mobile क्रमांक add करून एक id नंबर तयार होईल*
२) *Master या tab assign class teacher यात प्रत्येक शिक्षकाला वर्ग किंवा तुकडीचा वर्ग शिक्षक नेमावा लागेल*

*या नंतर आपल्याला student पोर्टल वरून Attendance app वरून एक apk डाऊनलोड करून आपल्या android मोबईल मध्ये इंस्टाल करावा लागेल*

*शाळेचा udise क्रमांक टाकून आपल्या रजिस्टर mobile ने लॉगीन करावे लागेल*

*हा जो रजिस्टर mobile नंबर आहे जो student पोर्टल वर create class  teacherहा tab आहे त्याच्यात असणार आहे तो आपल्याला बदलता सुद्धा येणार आहे*

*आपण कोणता रजिस्टर मोबईल नंबर वापरणार आहोत हे पाहण्यासाठी Reports – HM level -  teacher masterया मध्ये पाहावा*

*आपण जेव्हा udise क्रमांक व mobile क्रमांक टाकून register या बटनावर click करू तेव्हा आपल्या mobile वर एक one time password (OTP) येईल तो टाकून confirm otp वर click करायचे आहे*

*त्या नंतर आपल्या समोर स्क्रीन वर दोन ऑप्शन येतील*
*१) VIEW ATTENDANCE REPORT*
२) *SUBMIT ATTENDANCE REPORT*


*आपण SUBMIT ATTENDANCE REPORT वर click करू तेव्हा आपल्या समोर एक स्क्रीन येईल त्याच्यातील इयत्ता , तुकडी व दिनांक निवडावी. एक सूचना येईल Mark absent student त्या वेळी ok या बटनावर click करायचे आहे*

*या नंतर आपल्या समोर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी येईल आपण फक्त जे गैरहजर आहेत त्याच्या पुढे चौकोनात  click करायचे आहे. तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या पुढे एक चेक मार्क येईल*


*सर्वात खाली एक submit attedance हे नारंगी रंगात बटन आहे त्याच्यावर click करायचे आहे*


*आपल्या समोर त्या दिवशी किती विद्यार्थी हजर व किती गैरहजर आहेत तसेच त्या दिवसाची तारीख येईल आपण नंतर ok बटनावर click करायचे आहे*


*attendance submit successfully. do you want continue असा मेसेज येईल आपण yes किंवा नो करा*


*view attendance report वर click केल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्धी हजेरी दिनांक नुसार पाहता येणार आहे*
🎯 MPSC विभाग 🎯*
_*त्यात*_
*🌍स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf मध्ये*
http://www.kundanmalake.in/p/download-download-download-english.html

*🌍लोकराज्य मासिके pdf मध्ये*
http://www.kundanmalake.in/p/blog-page_831.html

*🌍 MPSC नोट्स pdf मध्ये*
http://www.kundanmalake.in/p/mpsc.html

*🌍 योजना मासिके pdf मध्ये*
http://www.kundanmalake.in/p/blog-page_970.html

*🌍 MPSC ऑडियो नोट्स* (mp3)
http://www.kundanmalake.in/p/blog-page_265.html

*🌍 चालु घडामोडी मासिके pdf मध्ये*
http://www.kundanmalake.in/p/blog-page_641.html

*🌍 MPSC अभ्यासक्रम pdf मध्ये*
http://www.kundanmalake.in/p/mpsc_10.html

*🌍 YCMOU नाशिक ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये*
http://www.kundanmalake.in/p/ycmou-pdf.html

*सर्व काही एकाच ठिकाणी. . . . .*

```SHARE TO ALL UR GROUPS```

Sunday, December 25, 2016

Software

📊  *शिक्षकांसाठी काही एक्सल(Excel) सॉफ्टवेअर !* 📊

📈 ```Excel tip & Tricks``` 📉

*(सर्व फाईल्स IMP आहेत कधीना कधी शिक्षकांना उपयोगी येतील त्यामुळे आपल्या PC मध्ये डाउनलोड करून ठेवावे हि विनंती)*

💎  *काही महत्वाचे सॉफ्टवेअर* 💎

📥 *रिझल्ट बनवा आपोआप* ,फक्त नावं व गुण भरा बाकी सर्व एक्सल सॉफ्टवेर करेल!

📥 *पायाभूत/संकलन चाचणी* ची टोटल,श्रेणी, तसेच पूर्ण शाळेचा निकाल एका क्लिक मध्ये तयार करा!

📥 *शालेय पोषण आहार (MDM)* सर्व आकडेवारी , रिपोर्ट काढा आपोआप.

📥 *बोनफाईड ,TC , निर्गम तयार करा एका क्लिक मध्ये*एक्सल  सॉफ्टवेअर .

📥 *Income tax काढण्याचे सॉफ्टवेअर.*

📥 *शालेय हजेरी चे सरासरी काढण्याचे सॉफ्टवेअर.*

📥 *शालेय वेळापत्रक बनवा एका क्लिक मध्ये*

📥 *पगार स्लिप, DA काढण्याचे,AGE काढण्याचे, सॉफ्टवेअर*

📥 *विद्यार्थी ओळखपत्र तयार करण्याचे सॉफ्टवेअर.*

 *आणि बरेच एक्सल सॉफ्टवेअर .....*

👇🏼 *वरील सर्व फाईल डाउनलोड करण्यासाठी भेट द्या* 👇🏼

*https://bmcschools.blogspot.in/2016/12/imp.html?m=1*

📌★📌★📌★📌★📌★📌

*सर्व शिक्षकांपर्यंत पोहचवा*

Saturday, December 24, 2016

*नमस्कार* 🙏
✨ *शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया* ✨

🔵 इंटरनेट सुरु करा.
🔵 Google Chrome ओपन करा.
🔵 Address बार मध्ये *"14.139.60.151/sse/login.php"* टाईप करुन Enter  दाबा.
🔵 NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये *"Create New Account"* या पर्यायावर क्लिक करा.
🔵 Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये *"User Name / UDISE"* च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.
🔵 त्याखाली असलेल्या *"Password"* च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. *लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.*
🔵 त्याखाली *"E-mail"* च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
🔵 त्याखाली *"Role Type"* या पर्यायासमोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔵 वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.

✨ *आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.* ✨

🔷 आता आपल्या शाळेचा *"DASHBOARD"* बघूया.
🔹डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या *"LOGIN"* या पर्यायावर क्लिक करा.
🔹LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये *"USER TYPE"* च्या समोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔹त्याखाली आपल्या शाळेचा *"UDISE Code"* टाईप करा.
🔹पासवर्ड टाकून *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.
*आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.*

✨ *शाळेची Basic Information भरणे.* ✨

🔵 आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला *"Basic information"* दिसते. त्यामध्ये *Learner's* या पर्यायाखाली :
1) Demographic Profile
2) Attendance Rate
3) Performance in key subjects
4) Learning Outcomes
*Teachers* या पर्यायाखाली
1) Numbers of Teachers
2) Teacher's Attendance

*वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.*

✨ *7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे.* ✨
 बंधू भगिनींनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला *"7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL* च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.
*शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.*
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.

*बंधू भगिनींनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.* सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा! 🙏💐

: *अतिशय महत्त्वाचे : Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.*

Wednesday, December 21, 2016

💠💠💠Ⓜ💲🅿💠💠💠
🛏🛏 *नितीन बा.समुद्रे* 🛏🛏
http://ni3samudre.blogspot.in/p/whatsup.html
                💻 *सर्च इंजिन* 💻
 *वेब आणि इंटरनेटवरुन हवी ती माहिती शोधण्यासाठी आपण सर्च इंजिन चा वापर करत असतो. माझ्या काही मिञाना याविषयी माहिती नव्हती म्हणून आज विविध सर्च इंजिन विषयी पोस्ट टाकत आहे.*
                आपणास फक्त google.com या विषयी जास्त माहिती असते. कारण ते अतिशय लोकप्रिय सर्च इंजिन आहे.या व्यतिरिक्त आणखी बरीच सर्च इंजिन आहेत ज्याच्या मदतीने आपण आपणास हवी असलेली माहिती इटरनेटवर शोधू शकतो.
       *मी काही सर्च इंजिन माहिती देत आहे त्याचा आपणास माहिती शोधताना नक्की उपयोग होईल.*
   ०१) 📱www.ask.com 📱- हे देखील google सारखेच सर्च इंजिन असून आपणास एखादी माहिती मिळवायची असल्यास www.ask.com ही वेब साईट टाका व येणाऱ्या सर्च Box मध्ये आपणास हवी असलेली माहिती शोधा.

०२) 📱 *MSNSEARCH*  www.searchmsn.com या सर्च इंजिन चा वापर करुन आपण माहिती शोधून घेऊ शकता.

०३) 📱 *Yahoo* www.yahoo.com _  आपणास एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असल्यास आपण या सर्च इंजिन चा वापर करु शकता. तसेच आपण इतर माहिती देखील शोधू शकता.

०४) 📱 *Rediff*  www.rediff.com या सर्च इंजिन द्वारे आपण वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळवू शकता.
*एकाच विषयाची माहिती आपण जर वेगवेगळ्या सर्च इंजिन वर शोधली तर आपणास अचुक व जी आपणास हवी आहे ती माहिती मिळू शकेल.*
    सर्च इंजिन  आपण अधिक माहिती करुन घेऊया. *कोणतीही माहिती शोधण्या आगोदर आपल्या Browser वर सर्च इंजिन चा पत्ता टाका* (जसे www.rediff.com)
आलेल्या पेजमधील *search* बाँक्स मध्ये ज्या विषयाची माहिती हवी आहे ते टाका.


आपली प्रतिक्रिया द्या.
*नितीन बाजीराव समुद्रे*
Blog-  http://ni3samudre.blogspot.in
Email- ni3samudre@gmail.com
Mob - 08156048686
*________________________________*
💠💠💠Ⓜ💲🅿💠💠💠
👉🏻 *महाराष्ट्र शिक्षक पँनल* 👈
💢💢💢💢💢💢💢💢💢💢                                                                                                                                                                                                                   *युट्युब ओपन केल्यानंतर आपोआप येणार Recommended अश्लील व हिंसक व्हिडीओनां प्रतिबंध करणे*

*प्रदिप पाटील SARAL online.com* 🅿🅱🅿
www.marathischooltondare.blogspot.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*मित्रहो*,


*आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात*

*पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो*

*या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे*

*आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील*

*१ ) संगणकावर setting करणे*

*सर्व प्रथम युट्युब ओपन करा*

*आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा*

*Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा*

*आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on  या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल*

*सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा*

*अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो*



*२ ) मोबाईल वर setting करणे*

*सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा*

*स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा*

*सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा*

*आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा*

*सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल*

*आता back या अशा प्रकारे मोबाईलवर  restricted mode ऑन झाला असेल*

*या settings करून आपण सुमारे 98% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त  वापरू शकतो*

                *धन्यवाद*

         ✍ *प्रदिप पाटील* ✍

              *पनवेल , रायगड*

    📱 *मोबाईल क्र.9222023947*



💢💢💢💢💢💢💢💢💢💢

Monday, November 14, 2016


💻📱 *Apps परिचय*👾
                   *(IBC)*

🎙 🎤 📲 *आता तुम्हाच्या मोबाईल ला बनवा माइक*🎙
🎙📲🎤🎙📲🎤🎙📲🎤🎙📲🎤🎙🎙📲🎤🎙📲🎤

🔵 *नाव*-  extra mic

🔵 *ऑपरेटिंग सिस्टम*- Android

🔵 *आकार*- 1.7 mb

🔵 *किंमत*- free

🔵 *कार्य कसे करते*-
1. Connect your device to an external speaker, and speak in front of  the internal microphone
2. Use a deconcentrator/an adapter (e.g. iRig), connect an external speaker and microphone
🔵⬇ *डाऊनलोड करण्यासाठीची लिंक*- 👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=extra.chan.audio.extramic
🔵 *उपयोग*-
1. Music Performance
2. Presentation
3. Outdoor Activity
4. Audio Amplification
 
🔵 *वरील aaps चा शैक्षणिकदृष्टया खुप चांगला उपयोग करता येऊ शकतो.*

 *महागडी माइक सिस्टम घेण्यापेक्षा ह्या app चा वापर करू शकतो. extra mic या apps प्रमाणे इतरही apps , मोबाइल ला माइक बनविन्यासाठी आहे. त्या तुम्ही play store वर शोधू शकता.*

📲🎙 *मोबाइल व्यतिरिक्त jack पिन असलेले 2 स्पीकर असले की झाली तुम्हाचि माइक सिस्टम तयार.*
           🎙  *परिपाठ घेणे, विद्यार्थी कविता, बडबड गीते, कवायत घेणे, बाल सभा, मुलाखत घेणे, अश्या ठिकाणी आपला हा मोबाईल माइक कामी पडतो.*
       *तर मग तुम्हीही करुण बघा तुम्हाच्या मोबाईलचा माइक*                                        📡🎙

Friday, November 4, 2016


™🇬 🇺 🇷 🇺 🇲 🇦 🇺 🇱🇪 🇪
*🔰गुरुमाऊली-एक शैक्षणिक चळवळ🔰*

  *चला डाऊनलोड करुया शैक्षणिक अॅप्स*

              *फक्त एका क्लिकवर*

  *Mp3 offline apps डाऊनलोड करा*


💜💙❤💚💛💜💙❤💚💛💥

🎀 *1.पहिली मराठी कविता  अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/1.html
🎀 *2.दुसरी मराठी कविता अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/2.html
🎀 *3.तिसरी मराठी कविता अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/3.html
🎀 *4.चौथी मराठी कविता अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/4.html
🎀 *5.पहिली इंग्रजी कविता अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/5.html
🎀 *6.दुसरी इंग्रजी कविता अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/6.html
🎀 *7.तिसरी इंग्रजी कविता अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/7.html
🎀 *8.चौथी इंग्रजी कविता अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/8.html
🎀 *9.संगीतमय पाढे अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/9.html
🎀 *10.ज्ञानरचनावाद फोटो अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/10.html
🎀 *11.अंकओळख अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/11.html
🎀 *12 .अक्षरओळख अॅप*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/12.html
🎀 *13.  Smart English app*
http://pravindakare.blogspot.in/2016/07/13-smart-english.html
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
🎓 *इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ*
🔁➡   http://goo.gl/FehlJf
💢 *युट्यूब चॅनल- प्रविण डाकरे*
🔁➡   https://goo.gl/ERcQJw
🎹 *पाढे-2ते30:mp3वVideo*
🔁➡   http://goo.gl/tc9tH1
🎯 *ब्लॉग बनवा-video,ppt,pdf*
🔁➡   http://goo.gl/mBV8O2
🔰 *संगीतमय मुळाक्षरे,बाराखडी,इतर*
🔁➡   http://goo.gl/ESwVNS
🚨 *मराठी कविता - 1 ते 4*
🔁➡   http://goo.gl/CwTzEt
💎 *इंग्रजी कविता -1 ते 4*
🔁➡   http://goo.gl/2PyDCw
♻ *मराठी व्हिडिओ कविता -1 ली*
🔁➡   http://goo.gl/jy0nLm
🌀 *मराठी व्हिडिओ कविता - 2 री*
🔁➡   http://goo.gl/n1bc89
🎁 *लेझीम व्हिडिओ-छोट्या भागात*
🔁➡   http://goo.gl/RY6WuN
🖼 *रचनावाद फोटो-ppt/pdf/video*
🔁➡   http://goo.gl/m7phoC

📲📲   🇵 🇷 🇦 🇻 🇮 🇳   📲📲
📲📲   🇩 🇦 🇰 🇦 🇷 🇪   📲📲
🏡 *सिमालवाडी ता.भुदरगड जि.कोल्हापूर*
*प्राथ.शिक्षक-ढाणकेवाडी,शिराळा,सांगली*
*अधिक माहितीसाठी👇🏻 ब्लॉगला भेट द्या*
       pravindakare.blogspot.in
   📲📲📲9423309214📲📲📲

Sunday, October 16, 2016


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाईन अॅप निर्मिती
हसत खेळत शिक्षण
1.English kids app
इंग्रजी किड्स अॅप
https://drive.google.com/file/d/0B4RUbVElMW_HWWxDbldYSHZnaEU/view?usp=docslist_api

2.digital school app
डिजीटल स्कूल
https://drive.google.com/file/d/0B4RUbVElMW_HcVc1U2JrQ2NxWk0/view?usp=docslist_api

3.balmitra app
बालमित्र
https://drive.google.com/file/d/0B4RUbVElMW_HMVNBWnZzSm1NTEk/view?usp=docslist_api

4.Marathi grammar app
मराठी व्याकरण
https://drive.google.com/file/d/0B4RUbVElMW_HTVcxVFZNbmk5ZVU/view?usp=docslist_api

5.zp pune app
 जि प पुणे
https://drive.google.com/file/d/0B4RUbVElMW_HM2VTM3hmVld6aGs/view?usp=docslist_api

6.English word 1st
 इंग्रजी शब्द
http://www.appsgeyser.com/3651446

7.numbers 1-100
अंकवाचन क्वीज
http://www.appsgeyser.com/3648751

8.match the words 1
सारखे शब्द जोडा
http://www.appsgeyser.com/3638302

9.match the words 2
सारखे शब्द जोडा
http://www.appsgeyser.com/3638501

10.match the row
सारखे चित्र जोडा
http://www.appsgeyser.com/3636975

11.counting time,money
कालमापन
http://www.appsgeyser.com/3627254

12.scratch and guess
स्क्रैच करा व नाव सांगा
http://www.appsgeyser.com/3631284

13.match the picture
सारखे चित्र जोडा
http://www.appsgeyser.com/3602347

14.matching puzzle
सारखे चित्र जुळवा
http://www.appsgeyser.com/3601450

15.king of math
गणितराजा
http://www.appsgeyser.com/3572756

16.dnaynracnawad
ज्ञानरचनावाद उपक्रम
http://www.appsgeyser.com/3572582

17.English king
 इंग्रजी शब्द वाचन
http://www.appsgeyser.com/3557141

18.guess the picture name
चित्राचे नाव ओळखा
http://www.appsgeyser.com/3552036

19.scratch and name
चित्र स्क्रैच करून नाव सांगा
http://www.appsgeyser.com/3547059

20.chitrakar
चित्रकार
http://www.appsgeyser.com/3546606

21.multiple king
गुणाकार
http://www.appsgeyser.com/3540013

22.guess English word
 मराठी शब्द व चित्र पाहून इंग्रजी शब्द सांगा
http://www.appsgeyser.com/3529900

23.match the picture
सारखे चित्र जोडा
http://www.appsgeyser.com/3528973

24.substraction game
वजाबाकी
http://www.appsgeyser.com/3519881

25.addition game
 बेरीज
http://www.appsgeyser.com/3515105

काही अॅप मधील PDF फाईल ओपन करण्यासाठी मोबाईल/टॅबलेट मध्ये wps office software आवश्यक आहे.

आणखी माहितीसाठी .....
https://sachinshelke7.blogspot.in/?m=1
किंवा
https://sachinshelke7.wordpress.com/
पोस्ट उपयोगी वाटल्यास नक्की शेअर करा.
श्री.सचिन शेळके
ता.दौंड,जि.पुणे
मो.9404402040

Monday, October 10, 2016

ऍडमिशन फॉर्म

पाचवी व आठवी कक्षा करीता ऍडमिशन फॉर्म साठी डाउनलोड वर क्लिक करा


डाउनलोड




Monday, March 14, 2016

शालेय अभिलेख

शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –
१) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे

     दाखल खारीज रजिस्टर,
    पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
     जन्म प्रमाणपत्र फाईल,
     शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
     विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
     टी.सी. फाईल,
     टी.सी. जावक रजिस्टर,
     निकाल रजिस्टर,
     बढती रजिस्टर,
     गळती रजिस्टर,
     मूल्यमापन नोंदवही,
     बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
     अपंग विद्यार्थी रजिस्टर


२) शिक्षकांसंबंधी अभिलेखे

    शिक्षक हजेरी रजिस्टर,
    पगारपेड रजिस्टर,
    शिक्षक सुचना रजिस्टर,
    शिक्षक हलचल रजिस्टर,
    शिक्षक रजेचे रजिस्टर,
    शिक्षक रजा अर्ज फाईल,
    वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
     मासिक अभ्यासक्रम प्रगतिपत्रक रजि.,
    पाठ टाचण वही,
     पगारपत्रक फाईल,
    मुख्याध्यापकांचे लॉगबुक



३) आर्थिक अभिलेखे

     स.शि.अ. रोकड रजिस्टर,
    स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
    स.शि.अ. लेजर रजिस्टर,
    सादील रोकड रजिस्टर,
    सादील खर्चाची पावती फाईल,
    सादील लेजर रजिस्टर,
    बांधकाम खर्चाची पावती फाईल,
    बांधकाम रोकड रजिस्टर,
    बांधकाम लेजर रजिस्टर,
    शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
    शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
    धनादेश नोंद रजिस्टर

४) शासकीय योजना अभिलेखे

    मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
    मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
    शालेय पोषण आहार रजिस्टर,
    उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
    उपस्थिती भत्ता देयके फाईल,
    अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
    आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
    दत्तक पालक योजना रजिस्टर


५) जडवस्तुसंग्रह अभिलेखे
(डेडस्टॉक रजिस्टर)

     जंगम मालपुस्तिका,
     सामान्य मालपुस्तिका रजिस्टर


६) कार्यालयीन इतर अभिलेखे

    पालक संपर्क रजिस्टर,
    आरोग्य तपासणी रजिस्टर,
    आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
    परीक्षा पेपर फाईल


अभिलेख जतन कालावधी
अ.क्र. अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नाव जतन करावयाचा कालावधी

(01) अ सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर कायम

(02) अ फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही कायम

(03) अ परिपत्रके, आदेश फाईल कायम

(04) अ भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही कायम

(05) अ मुख्याध्यापकाचे लॉगबुक कायम

(06) ब रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) 30 वर्षे

(07) ब कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती 30 वर्षे

(08) ब विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल 30 वर्षे

(09) ब नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र 30 वर्षे

(10) ब रोकड वही / खतावणी (स.शि.अ.) 30 वर्षे

(11) ब विद्यार्थी संचयी नोंदपत्रक 30 वर्षे

(12) ब सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे

(13) क-1 इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे 10 वर्षे

(14) क-1 शाळा सोडल्याचे दाखले 10 वर्षे

(15) क-1 फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही 10 वर्षे

(16) क-1 आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके 10 वर्षे

(17) क-1 विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके 10 वर्षे

(18) क-1 वसतिगृह खोलीभाडे नोंदवही 10 वर्षे

(19) क-1 महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार 10 वर्षे

(20) क-1 फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती 10 वर्षे

(21) क-1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) 10 वर्षे

(22) क-2 जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही 5 वर्षे

(23) क-2 आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब 5 वर्षे

(24) क-2 रोकडवही (शा. पो. आ.) 5 वर्षे

(25) क-2 शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही 5 वर्षे

(26) ड सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) 18 महिने

(27) ड शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज 18 महिने

Thursday, March 3, 2016

जिल्हे

एक अद्भुत गंमत
एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे

अग कमल उठ पाय धु  , रस ,भजॆ ,चहा बनव.

अ:- अकोला, अमरावती, अॊरंगाबाद, अहमदनगर
ग:-गङचिरोलि,गोंदिया
क:- कोल्हापूर
म:- मुंबई
ल:- लातूर
उ:- उस्मानाबाद
ठ:- ठाणे
प:- पालघर, पुणे, परभणी
य:- यवतमाळ
धु :- धुळे
र:- रायगड, रत्नागिरी
स:- सांगलि,सातारा, सोलापूर,  सिंधुदूर्ग
भ:- भंङारा
ज:- जळगाव,जालना
च:- चंद्रपूर
ह:- हिंगोलि
ब:- बिङ, बुलढाणा
न:- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबाद
व:- वर्धा, वाशिम

Monday, February 29, 2016

अभ्यास

बोर्डाची परीक्षा देणा-या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिंनींनो..... मला आज खुप महत्वाच विनंतीपूर्वकं सांगायचं आहे.…मी रणजित शिंदे,प्रताप महाविद्यालयात एका वर्षाला pramoted होतो,तर जिद्द,सातत्यपूर्ण केलेला अभ्यास, एकचित्त होत दिलेली परीक्षा यआधारावर नाशिक बोर्डाच्या मेरिटटलिस्ट मध्ये 3 रा (तृतीय) येण्याचा बहुमान मिळाला....आज मुख्याध्यापक् म्हणून कार्यरत असलो तरी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला परिक्षेला जाता जाता काही सूचना सांगतोय.......
• अभ्यास केला आहे. त्यामुळे काळजी नको.        शांत चित्ताने पेपर सोडवा।   👍सोपे प्रश्न वेळ वाया न जावू देता सुरवातीस सोडवून टाका,व् खात्रीचे मार्क्स आपल्या खात्यात जमा करुन घेत स्वतःचा आत्मविश्वास वाढवा.'सोप्या कडून कठिना कड़े'या पद्धतीने पुढे जात रहा.
💐 जागरण टाळा, पुरेसी झोप आणि संतुलित आहार तुम्हाला फ्रेश ठेवेल.
💐पेपर सोडवून आल्यानंतर पेपरमध्ये माझं काही राहून गेलं याचा आढावा जरूर घ्या… पण काळजी करू नका… गेलेला पेपर पुन्हा लिहिण्यासाठी तुमच्या हातात येणार नसतो.      त्यामुळे गेलेल्या पेपरच्या चिंतेत उदयाच्या पेपरच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका.
💐 लक्षात ठेवा आपल्या देशात संधींचा प्रचंड मोठा खजिना आहे. डॉक्टर, इंजिनिअर पलिकडे जाऊन शिक्षणाच्या, उच्च शिक्षणाच्या खुप संधी आपल्याकडे आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका
💐आपल्या ध्येयाप्रती समर्पित राहा. डगमगू नका.
💐सगळयात महत्वाचं म्हणजे कुठलाच निकाल किंवा रिझल्ट लागलेला नसतांना काळजीपोटी जीवाचं काही बरंवाईट करून घेऊ नका… कदाचित आपलं पेपर सोडवतांना खुप  चुकलं हा तुमचा भ्रम असू शकतो आणि तुम्ही खुप चांगलं लिहिलेलं असू शकतं.
💐जीवन अनमोल आहे. एक संधी गेली तर दुसरी संधी आयुष्यात तुम्हाला पहिल्या संधीपेक्षा मोठं करील. पण जीवन हातातून निसटून गेलं तर ते पुन्हा येणार नाही. त्यामुळे कुठलाही अविचार करू नका
💐लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या आई-वडिलांनी खुप खस्ता खाऊन, अडी-अडचणी सोसून शिकवलेलं असतं. तुमचं नैराश्य त्यांच्या पदरात टाकू नका. आई-वडिलांसाठी रडायला नाही-लढायला शिका.
💐तुम्ही तुमच्या आई-वडिलांची भविष्यातील गुंतवणूक आहात. ही गुंतवणूक कुचकामी ठरली तर आई-वडिलांनी काय करावे, याचा विचार करा आणि कुठल्याही अविचाराला मनात थारा देऊ नका, त्यानं कुठलेच प्रश्न सुटत नाहीत.
💐संयम आणि प्रयत्न या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही जीवनात कधीच अयशस्वी होऊ शकणार नाही.
💐दररोज उठल्यानंतर आई-वडिलांकडे पाहा, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि त्यांच्या पाया पडून परिक्षेला जा.. अभ्यासाला आई-वडिलांच्या आशीर्वादाचे कवच तुम्हाला नक्कीच सर्वोच्च पदी पोहचवेल. प्रामाणिकपणे आणि नेटाने पेपर पूर्ण करा आणि यशस्वी व्हा….                         😊👍😊
ALL THE BEST.                      😊🙏😊विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जास्त दबाव वाटत असल्यास घाबरु नका थेट माझ्याशी बोला.   आपलाच्,रणजित शिंदे सर,अमळनेर 9422282489

Sunday, February 28, 2016

विज्ञान

🌺🌺🌺🌺 जादूचे प्रयोग भाग  8  🌺🌺🌺🌺
    🍀 कापडाला जाळून पुन्हा निर्माण करणे🍀
कोणतीही हातचलाखी किंवा जादू नाही सरळसरळ विज्ञान तत्वाचा वापर करून हा प्रयोग करून दाखविता येतो
विद्यार्थी च्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षकांनी हे छोटे व सोपे प्रयोग विद्यार्थी ना करून दाखविले पाहिजे
🍂 एक सरळ सपट  बुड असलेले धातूचे भांडे घ्यावे  वाटीसुद्धा चालेल एक साधा रंगीत सुती कापड घ्या हा कापड भाड्यांभोवती पुर्ण पणे फिट असा आवरून घ्या व टोकाला पिळ देउन हातात जेणेकरून कापड सैल राहणार नाही
  दुसरा एक कापड राॅकेलमध्ये बुडवून चिमट्यमाध्ये पकडून पेटवावा व वाटीवरील कापडावर ठेवावा जाळ विझल्यावर राख फेकुन वाटीवरील कापड लोकांना दाखवावे
कापड मुळीच जळालेला नसणार कारण वाटी ही उष्णता वाहक आहे त्यामुळे भांडे उष्णता शोषून घेते व कापड जळत नाही
🙏🏻 टिप --  कापड जाळण्याचा प्रयोग लहान मुलांनी करायचा नाही तर मोठ्या  व्यक्ती नी करून दाखवायचा आहे🙏🏻
     सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

Monday, February 22, 2016

अभ्यास कसा करावा

10 वी चा
अभ्यास कसा करावा ?
बारावीची परीक्षा तर सुरु झाली. आता वेध लागलेत , दहावीचे. त्यांची परीक्षा येत्या 1 मार्चपासून सुरु होतेय. विद्यार्थी मित्रहो , वर्षभर तुम्ही भरपूर अभ्यास केला असेलच. आता या उरलेल्या दिवसात टेन्शन न घेता लक्ष देऊन अभ्यास करा.
  दहावीचे वर्षभर आणि विशेषतः आता परीक्षा जशी जवळ येईल , तशी घरातील वडिलधारी माणसे तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या असंख्य सूचनाही सुरू असतात. त्याचा राग येऊ लागतो आणि अशा त्रासिक मूडमध्ये अभ्यासात लक्ष लागत नाही ; पण वडिलधाऱ्यांच्या या वागण्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करा. आपली आई तिची सर्व कामे करूनही न दमता आपल्यासाठी कायम दिवस-रात्र उपलब्ध असते. आईने तिचा दिनक्रम आपल्या अभ्यासाच्या वेळेला पूरक बनवला आहे. तुम्हाला चांगले मार्क मिळावे , यासाठीच तिची तळमळ आहे , असा विचार करा आणि प्रसन्न मनःस्थितीत शांतपणे अभ्यासाला बसा. तुमचा अभ्यास चांगला होईल
सलग तीन-चार तास किंवा दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करू नका. दर तास-दीड तासाने
 आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करा. पहाटे लवकर किंवा रात्री जागून , यापैकी जे सोयीचे असेल , त्यानुसार वेळ ठरवा. पालकांनीही अभ्यासाच्या वेळेचा आग्रह धरू नये.
या काळात आहार संतुलित ठेवा. संतुलित म्हणजे सॅलड , कडधान्ये , सूप असेच काही नाही. रोजचेच जेवण ; पण जिभेसाठी जेवू नका. थोडक्यात , जेवल्यावर झोप येईल , असे चमचमीत पदार्थ , पक्वान्ने शक्यतो टाळा. वेळच्या वेळी ; पण मोजके आणि नेहमीचे जेवण करा. हॉटेलांतील अन्न शक्यतो टाळाच. विषय बदला.
विषय बदलण्यापूर्वी दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. त्यामध्ये आपल्या आवडीचे उदाहरणार्थ , गाणी ऐकणे , टीव्ही पाहणे , आई-वडिलांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे , कम्प्युटर गेम खेळणे असे काहीही करू शकाल. मात्र , हा ब्रेक दहाच मिनिटांचा असेल , याची काळजी घ्या.
पुन्हा अभ्यासाला बसताना सुरुवातीच्या पाच-सात मिनिटांत आधी तास-दीड तासात काय अभ्यास केला , याची उजळणी करून पाहा. त्यातील किती लक्षात राहिले आहे , याचा अंदाज घ्या आणि मगच नवीन विषयाची सुरुवात करा.

परीक्षेमध्ये जरी पाचपैकी कोणतेही चार सोडवा , असे ऑप्शन असले , तरी अभ्यास करताना कोणताही भाग ऑप्शनला टाकू नका. अभ्यास करताना जे जे अवघड वाटेल , ते ते शिक्षकांना विचारून शंका समाधान करून घ्या. अभ्यास करतानाच जर तुम्ही काही भाग ऑप्शनला टाकलात , तर हॉट्सचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. परीक्षेच्या वेळी , पाचपैकी कोणते चार अधिक चांगले येतात , ते पाहा आणि सोडवा.
अभ्यासाला बसताना जेव्हा आपण ताजेतवाने असतो , तेव्हा आपला मेंदूसुद्धा अधिक तल्लख असतो. अशा वेळी म्हणजे थोडक्यात जेव्हा आपला अभ्यासाचा मूड असतो , तेव्हा सामान्यपणे आपल्याला आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्यास आपण सुरुवात करतो. तसे न करता जेव्हा अभ्यासाचा मूड असेल , तेव्हा कठीण वाटणाऱ्या विषयाने किंवा न येणाऱ्या टॉपिकने अभ्यासाची सुरुवात करा ; कारण , बराच वेळ अभ्यास केल्यावर , कंटाळा आल्यावर आपण कठीण विषय अभ्यासाला घेतला , तर आपला मेंदू अधिक ताण घेण्याच्या परिस्थितीत नसतो. परिणामी , लगेचच झोप येऊ शकते.
रोजच्या दिनक्रमाचं व अभ्यासाचं वेळापत्रक बनवा. जे आपल्याला आचरणात आणता येईल , असंच वेळापत्रक तयार करा. उदाहरणार्थ , सकाळी किती वाजता उठणार , हे ठरवताना पहाटे उठावं , या सूत्रानुसार ' पहाटे पाच वाजता उठावे ' असे ठरवूच नका. कारण भल्या सकाळी उठणं तुम्हाला जमणार नाही हे तुम्हाला माहितेय. ' सकाळी सात वाजता उठणार ,' हेसुद्धा वेळापत्रक असू शकते. फक्त नंतरचा वेळ नीट हुशारीने वापरा. दिवसभरात किमान आठ ते दहा तास अभ्यास होईल आणि आपल्याला सोयीचे वाटेल , असे वेळापत्रक बनवा. महत्त्वाचे म्हणजे , जे ठरवाल , ते कठोरपणे आचरणात आणा.


परीक्षा म्हटल्यावर अनेक प्रश्न पडतातच. त्यातलेच काही नेहमीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं खास मुंटाच्या विद्यार्थी मित्रांसाठी...
उत्तरपत्रिकेवर आपले नाव आणि बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक कुठे लिहायचा असतो ? पुरवणीवरही पण तो लिहायचा असतो का ?
उत्तरपत्रिकेवर कुठेही आपलं नाव लिहायचं नसतं. पहिल्या पानावर एकाच ठिकाणी सही करायची असते. बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर असलेल्या ठराविक रकान्यातच , अंकांत आणि अक्षरांत लिहावयाचा असतो ; तसेच पुरवणीवरही ठराविक रकान्यातच बैठक क्रमांक लिहायचा असतो. इतर कोणत्याही ठिकाणी आपले नाव आणि बोर्डाकडून आलेला बैठक क्रमांक चुकूनसुद्धा लिहू नका.

प्रश्नपत्रिकेवर बैठक क्रमांक लिहायचा का ?
प्रश्नपत्रिकेच्या वरील पानावर व प्रश्नपत्रिकेच्या आतील प्रत्येक पानाच्या उजव्या बाजूससुद्धा बैठक क्रमांक लिहायचा असतो.

पर्यवेक्षकाची सही कुठे असते ?
आपल्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर आणि प्रत्येक पुरवणीवर पर्यवेक्षकाची सही आहे , याची खात्री करा.

उत्तरपत्रिकेत दोन्ही बाजूस समास सोडावा का ?
उत्तरपत्रिकेत डाव्या बाजूस समास आखलेलाच असतो. त्यात केवळ प्रश्नक्रमांक व त्या खाली उपप्रश्न क्रमांक लिहावा. उत्तरपत्रिकेत आखलेल्या रेषा उजवीकडील बाजूस अगदी शेवटपर्यंत नसतात. साधारण उजवीकडील एक सेंटीमीटर जागा कोरी ठेवलेली असते. त्यात काही लिहू नका. वेगळा समास आखून जागा सोडण्याची आवश्यकता नाही.

पुरवण्या किती घेता येतात ? पुरवण्यांवर क्रमांक लिहावे का ?
- आपल्याला उत्तरे लिहिण्यासाठी आवश्यक तितक्या पुरवण्या घेता येतात , त्यास कोणतेही बंधन नाही. पुरवण्यांवर क्रमांक लिहिला , तरी चालेल. उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर पुरवण्यांची संख्या लिहायची असते. पेपरच्या शेवटी करायचे हे काम असल्याने घाईमध्ये विसरू शकते. तसे न करता आठवणीने किती पुरवण्या जोडल्या , याचा आकडा न विसरता लिहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरवण्या क्रमाने बांधा.

उत्तरपत्रिकेला जोडलेला ग्राफचा कागद हा पुरवणीमध्ये मोजावा का ?
उत्तरपत्रिकेला जोडलेला ग्राफचा कागद हा पुरवणीमध्ये मोजला पाहिजे. केवळ ग्राफचा कागद जोडलेला असेल आणि एकही पुरवणी जोडली नसेल , तरी ग्राफच्या कागदासाठी एक पुरवणी अशी नोंद करा.

पेपर लिहिण्यासाठी कोणत्या रंगाच्या शाईचं पेन वापरावं ?
पेपर लिहिण्यासाठी निळ्या किंवा काळ्या रंगाच्या शाईचे पेन , बॉल पेन किंवा जेल पेन वापरावे. यापैकी ज्या रंगाचं पेन वापरण्याचं ठरवाल , त्या एकाच रंगाचं पेन वापरावं. दोन वेगवेगळ्या रंगांची पेन्स वापरू नयेत. निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनशिवाय इतर कोणत्याही रंगाच्या शाईचा वापर केल्यास पेपर तपासला जात नाही व गुणही दिले जात नाहीत.

रफ वर्क म्हणजे कच्चं लिखाण करण्यासाठी वेगळे कागद मिळतात का ? नसल्यास कच्चे लिखाण कुठे करावं ?
रफ वर्क करण्यासाठी सुटे वेगळे कागद मिळत नाहीत ; पण रफ वर्क प्रश्नपत्रिकेवर करू नका. रफ वर्क उत्तरपत्रिकेतच करायचं असतं. ते उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पानांवर करावे. रफ वर्क पेनने करू नये ; ते पेन्सिलनेच करायचे असते. ज्या पानावर रफ वर्क कराल , त्या पानाच्या वर तसे नमूद करा.

उत्तरं लिहिताना एका खाली एक अशी लिहावीत का ?
उत्तरपत्रिका पाठपोट २० पानांची असते. उत्तरपत्रिका मिळाल्यावर ती सुस्थितीत असल्याची व त्यात सर्व पाने असल्याची खात्री करून घ्या. उत्तरे लिहिताना प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. प्रश्नातील उपप्रश्नाचे उत्तर मात्र एका खाली एक त्याच पानावर लिहावे. उत्तर लिहिताना समासामध्ये प्रत्येक उपप्रश्नाचा क्रमांक नीट लिहावा. समासात प्रश्न किंवा उपप्रश्नाचा क्रमांक लिहिण्यासाठी वेगळ्या रंगाच्या शाईचे पेन वापरू नये.

अभ्यासासाठी योग्य वेळ कोणती ? पहाटे , दुपारी की रात्र ?
अभ्यास कोणत्या वेळी करावा , ते प्रत्येकानं ठरवावं आणि आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करावा. दुपारी अभ्यास होत नाही , तर संध्याकाळी करा , रात्री करा , पहाटे उठून करू शकता. पण दिवसभरात मिळून ८ ते १० तास अभ्यास होईल , हे पाहा.

मी जिंकणारच

परीक्षा अगदी जवळ आलीय , कितीही केला तरी अजून खूप अभ्यास बाकी आहे , या विचाराने मानसिक ताण येणं स्वाभाविक आहे ; पण राहिलेल्या अभ्यासाचा मानसिक ताण घेऊन जर अभ्यास करत असाल , तर वेळही वाया जाईल आणि अभ्यासही होणार नाही. परीक्षा जवळ आल्याचा स्वाभाविक ताण असू द्या ; पण अनाठायी मानसिक ताण घेऊ नका. या उलट किती अभ्यास राहिलाय , किती झालाय याचा अंदाज घेऊन राहिलेल्या अभ्यासाचं व दिवसांचं नियोजन करा आणि माझा अभ्यास ठराविक वेळेत मी पूर्ण करणारच , या मानसिकतेत अभ्यास करायला बसा. ' मला जमणार आहे. मी चांगले मार्क मिळवणार आहे ,' असे सकारात्मक विचार मनात ठेवा म्हणजे मानसिक ताणाशिवाय चांगला अभ्यास होईल.

बऱ्याच वेळा अभ्यास करायला सुरुवात केली , की झोप येऊ लागते. याचे कारण तो विषय कंटाळवाणा नसून , आपला मेंदू थकलेला असतो , हे ध्यानात घ्या. आपल्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही , तर मेंदू लवकर थकतो. त्यामुळे अभ्यास करताना झोप आली , तर थोडी हालचाल करा , उड्या मारा , थोडे चाला. एका जागेवर बसल्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. व्यायाम करण्याने , चालण्याने , धावण्याने ; थोडक्यात हालचाल केल्याने मेंदू पुन्हा तरतरीत होतो.

परीक्षा जवळ येईल , तशी झोप कमी करून जागरणं करून अभ्यास करू नका. पुरेशी झोप घेणंसुद्धा अत्यंत आवश्यक असतं. आपण जेव्हा झोपतो , तेव्हा मेंदूला विश्रांती तर मिळतेच ; पण झोपेच्या काळात मेंदू दिवसभरात जमा केलेल्या ज्ञानाचे , माहितीचे विश्लेषण करून त्याचे वर्गीकरण करत असतो. केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी हे आवश्यक असते.
द्वारा पोस्ट केलेले Sunil Rathod 

Saturday, February 20, 2016

Rhyming words 🗣 _______________

🗣           Rhyming words         🗣
                _______________  
   
     -🇵   🇷    🇲 🇦 🇸 🇰 🇮-

🌶 ack -
back, lack, pack, rack, sack, tack, yak, black, knack, quack, slack, smack, snack, stack, track, whack, attack

🏌ail -
bale, fail, hail, mail, male, nail, pail, tale, rail, sail, stale, scale, snail, whale, detail, email

🏍 air -
air, bare, care, chair, dare, fair, hair, pair, rare, wear, chair, flare, stare, scare, share, spare, square, there, where, aware, beware, compare, declare, despair, prepare, repair, unfair

🖌 ake -
ache, bake, fake, lake, make, rake, take, brake, break, flake, quake, snake, steak, awake, mistake

 🗑all -
all, ball, call, doll, hall, fall, tall, crawl, small, baseball, football

🏹 an -
an, can, fan, man, pan, ran, tan, van, plan, scan, span, began

🛐 and -
and, band, hand, land, sand, bland, command, demand, expand, stand, understand

⏸ap -
cap, gap, map, nap, tap, zap, chap, clap, flap, slap, snap, strap, trap, wrap

🕳 ar -
are, bar, car, far, jar, tar, star, scar, afar, guitar

🕶 at -
at, bat, fat, mat, pat, rat, sat, flat, that, splat, combat

🛍 ate -
ate, date, fate, mate, late, gate, rate, wait, crate, great, plate, skate, slate, state, straight, trait, weight, create

🐔ed -
bed, dead, fed, head, led, read, red, said, bread, fled, spread, thread, tread, instead

🦀 ell -
bell, fell, sell, well, yell, shell, smell, spell, farewell, hotel, motel

🍈 en -
den, hen, men, pen, ten, glen, then, when, wren, again

🍋et -
bet, get, jet, let, met, pet, set, vet, wet, yet, threat, barrette, reset, upset

🍉in -
bin, chin, in, pin, tin, grin, thin, twin, skin, begin, within

🍒ing -
king, ring, sing, wing, zing, bring, cling, fling, sling, spring, sting, string, swing, thing

🍟it -
bit, fit, hit, it, kit, lit, pit, sit, flit, knit, quit, skit, slit, spit, split, admit, commit, permit

🍝ite -
bite, kite, bright, fight, fright, knight, night, might, right, tight, white, write, delight, tonight

🍡oh -
go, hoe, low, mow, row, sew, toe, blow, crow, dough, flow, know, glow, grow, know, show, slow, snow, stow, though, throw, ago, although, below

🍶ot -
cot, dot, got, hot, lot, not, pot, rot, tot, bought, fought, knot, taught, shot, spot, squat, forgot

🍭ound -
crowned, found, ground, hound, mound, pound, round, sound, wound, around, surround

🍹oze -
bows, hose, nose, rose, toes, blows, flows, froze, grows, those

🍽 ub -
cub, rub, sub, tub, club, stub, scrub, shrub

🏖 un -
bun, fun, gun, one, run, son, sun, ton, won, done, none, begun, outdone, undone
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

              🏌Collected by 🏌
                    प्रमोद मस्की
                 ९६२३३८४४८२

Tuesday, February 16, 2016

सूत्र संचालन

सुत्रसंचालन चारोळी

 दिपप्रज्वलन

 अतिथींच्या आगमनाने
 गहिवरले हे सेवासदन
 अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
 प्रसन्न करावे वातावरण ---- (2)

एक छोटीसी ज्योत प्रतिक
 म्हणून काम करते
 थोडासा का होइना पण
 अंधार दूर करते.

जीवनाला हवी प्रकाषाची वात
 दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
 तरीही तिला आहे मानाचे स्थान
 हे आपणास आहे ज्ञान
 तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
 कर्यक्रमाची सुरूवात.

संस्कृती आहे आपली प्रकाषाची
 षितलता आहे त्यात चंद्राची
 दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
 हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची

 प्रास्ताविक

 गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
 साथ दयावी सर्वांनी मिळून
 आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
 जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
 ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
 आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
 प्रास्ताविकेचे ज्ञान

 जीवनाचे सार कळते
 ग्रंथ आणि पुस्तकातून
 कार्यक्रमाचा उद्देष कळतो
 प्रास्ताविकातून


मार्गदर्शन

 तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
 तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
 जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----

ज्ञानरूपी मार्गाच्या
 पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
 त्यासाठी मान आहे
 अध्यक्षीय मार्गदशनाचा

 बोलके करण्यास हवे असते संभाषण
 आधारासाठी हवे असते आश्वासन
 योग्य दिशा मिळण्यासाठी
 आवश्यक आहे मार्गदर्शन

आभार

कार्यक्रम झाला बहारदार
 भाशणही झाले जोरदार
 श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
 तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

 प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
 आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
 आपल्या मार्गदशर्नाने
 आम्हाला दिशा मिळाली
 शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.

थेंबाथेंबाने तलाव भरतो
 हाताहाताने कार्यक्रम फुलतो
 जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
 तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

व्संतात येतो फुलांना बहार
 तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
 श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
 तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार
  शुद्ध लेखनाच्या चुका दुरूस्त करून घ्य
फकीरा पोखरकर पुणे