Monday, February 29, 2016

अभ्यास

बोर्डाची परीक्षा देणा-या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिंनींनो..... मला आज खुप महत्वाच विनंतीपूर्वकं सांगायचं आहे.…मी रणजित शिंदे,प्रताप महाविद्यालयात एका वर्षाला pramoted होतो,तर जिद्द,सातत्यपूर्ण केलेला अभ्यास, एकचित्त होत दिलेली परीक्षा यआधारावर नाशिक बोर्डाच्या मेरिटटलिस्ट मध्ये 3 रा (तृतीय) येण्याचा बहुमान मिळाला....आज मुख्याध्यापक् म्हणून कार्यरत असलो तरी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला परिक्षेला जाता जाता काही सूचना सांगतोय.......
• अभ्यास केला आहे. त्यामुळे काळजी नको.        शांत चित्ताने पेपर सोडवा।   👍सोपे प्रश्न वेळ वाया न जावू देता सुरवातीस सोडवून टाका,व् खात्रीचे मार्क्स आपल्या खात्यात जमा करुन घेत स्वतःचा आत्मविश्वास वाढवा.'सोप्या कडून कठिना कड़े'या पद्धतीने पुढे जात रहा.
💐 जागरण टाळा, पुरेसी झोप आणि संतुलित आहार तुम्हाला फ्रेश ठेवेल.
💐पेपर सोडवून आल्यानंतर पेपरमध्ये माझं काही राहून गेलं याचा आढावा जरूर घ्या… पण काळजी करू नका… गेलेला पेपर पुन्हा लिहिण्यासाठी तुमच्या हातात येणार नसतो.      त्यामुळे गेलेल्या पेपरच्या चिंतेत उदयाच्या पेपरच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका.
💐 लक्षात ठेवा आपल्या देशात संधींचा प्रचंड मोठा खजिना आहे. डॉक्टर, इंजिनिअर पलिकडे जाऊन शिक्षणाच्या, उच्च शिक्षणाच्या खुप संधी आपल्याकडे आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका
💐आपल्या ध्येयाप्रती समर्पित राहा. डगमगू नका.
💐सगळयात महत्वाचं म्हणजे कुठलाच निकाल किंवा रिझल्ट लागलेला नसतांना काळजीपोटी जीवाचं काही बरंवाईट करून घेऊ नका… कदाचित आपलं पेपर सोडवतांना खुप  चुकलं हा तुमचा भ्रम असू शकतो आणि तुम्ही खुप चांगलं लिहिलेलं असू शकतं.
💐जीवन अनमोल आहे. एक संधी गेली तर दुसरी संधी आयुष्यात तुम्हाला पहिल्या संधीपेक्षा मोठं करील. पण जीवन हातातून निसटून गेलं तर ते पुन्हा येणार नाही. त्यामुळे कुठलाही अविचार करू नका
💐लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या आई-वडिलांनी खुप खस्ता खाऊन, अडी-अडचणी सोसून शिकवलेलं असतं. तुमचं नैराश्य त्यांच्या पदरात टाकू नका. आई-वडिलांसाठी रडायला नाही-लढायला शिका.
💐तुम्ही तुमच्या आई-वडिलांची भविष्यातील गुंतवणूक आहात. ही गुंतवणूक कुचकामी ठरली तर आई-वडिलांनी काय करावे, याचा विचार करा आणि कुठल्याही अविचाराला मनात थारा देऊ नका, त्यानं कुठलेच प्रश्न सुटत नाहीत.
💐संयम आणि प्रयत्न या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही जीवनात कधीच अयशस्वी होऊ शकणार नाही.
💐दररोज उठल्यानंतर आई-वडिलांकडे पाहा, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि त्यांच्या पाया पडून परिक्षेला जा.. अभ्यासाला आई-वडिलांच्या आशीर्वादाचे कवच तुम्हाला नक्कीच सर्वोच्च पदी पोहचवेल. प्रामाणिकपणे आणि नेटाने पेपर पूर्ण करा आणि यशस्वी व्हा….                         😊👍😊
ALL THE BEST.                      😊🙏😊विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जास्त दबाव वाटत असल्यास घाबरु नका थेट माझ्याशी बोला.   आपलाच्,रणजित शिंदे सर,अमळनेर 9422282489

No comments: