Sunday, February 28, 2016

विज्ञान

🌺🌺🌺🌺 जादूचे प्रयोग भाग  8  🌺🌺🌺🌺
    🍀 कापडाला जाळून पुन्हा निर्माण करणे🍀
कोणतीही हातचलाखी किंवा जादू नाही सरळसरळ विज्ञान तत्वाचा वापर करून हा प्रयोग करून दाखविता येतो
विद्यार्थी च्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षकांनी हे छोटे व सोपे प्रयोग विद्यार्थी ना करून दाखविले पाहिजे
🍂 एक सरळ सपट  बुड असलेले धातूचे भांडे घ्यावे  वाटीसुद्धा चालेल एक साधा रंगीत सुती कापड घ्या हा कापड भाड्यांभोवती पुर्ण पणे फिट असा आवरून घ्या व टोकाला पिळ देउन हातात जेणेकरून कापड सैल राहणार नाही
  दुसरा एक कापड राॅकेलमध्ये बुडवून चिमट्यमाध्ये पकडून पेटवावा व वाटीवरील कापडावर ठेवावा जाळ विझल्यावर राख फेकुन वाटीवरील कापड लोकांना दाखवावे
कापड मुळीच जळालेला नसणार कारण वाटी ही उष्णता वाहक आहे त्यामुळे भांडे उष्णता शोषून घेते व कापड जळत नाही
🙏🏻 टिप --  कापड जाळण्याचा प्रयोग लहान मुलांनी करायचा नाही तर मोठ्या  व्यक्ती नी करून दाखवायचा आहे🙏🏻
     सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती

No comments: