Friday, May 25, 2018

ЁЯП╡ *30 рдоे ,рдкुрдг्рдпрд╢्рд▓ोрдХ 'рдЕрд╣िрд▓्рдпाрдмाрдИ рд╣ोрд│рдХрд░' рдпांрдЪी рдЬрдпंрддी рдЪे "рд╕ूрдд्рд░рд╕ंрдЪाрд▓рди"* ЁЯОд

🏵 *30 मे ,पुण्यश्लोक 'अहिल्याबाई होळकर' यांची जयंती चे "सूत्रसंचालन"* 🎤

🥀|| सुस्वागतम् सुस्वागतम् सुस्वागतम् ||🥀

*मी ................* सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो.

मराठ्यांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे . *अहिल्याबाईंना " पुण्यश्लोक "असेही म्हणतात .* कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात हुशार असलेल्या अहिल्याबाई चे नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासात लिहिले गेले.

```"राज योगिनी सती```
```अहिल्या होळकरांची राणी.```
```अजुनी नर्मदा जळी,```
```लहराती तिच्या यशाची गाणी "```

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी अहिल्याबाई विषयी म्हटले आहे.

🎪 *स्थानापन्न करणे :-*

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरज असते ती जबाबदारी ची जाणीव असलेल्यांची, योग्य वाटचाल दाखवणाऱ्यांची व असे उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे *श्री..............* हे व्यासपीठावर आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो!

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
संपूर्ण सूत्रसंचालन वाचण्यासाठी खलील *"सूत्रसंचालन अँप"* डाऊनलोड करा !
https://play.google.com/store/apps/details?id=anchoring.andspeeches
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🤵 *कार्यक्रमाचे अध्यक्ष :-*

तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून *श्री............* हे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

(प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्दरचनेत थोडाफार बदल करावा)

🌹 *स्वागत /पुष्पगुच्छ :-*

```मानामनाच्या गाभार्‍यात```

```मूर्ती आपली सजली```

```स्वागतास खास आपल्या```

```वाहते हि सुमनांजली...```

आजच्या कार्यक्रमाचे *अध्यक्ष श्री..........* यांचे स्वागत *श्री...........* हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे *प्रमुख पाहुणे *श्री...........* यांचे स्वागत *श्री...........* हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

👯‍♀  *स्वागत गीत (असल्यास) :*

```मंगलदिनी, मंगलसमयी```
```झाले आपले आगमन येथे ..```
```करितो स्वागत हर्षभराने```
```प्रेमे गाऊनी स्वागतगीत येथे.```

अतिथी देवो भवः म्हणून फक्त पुष्पगुच्छाच स्वागत पुरेसे ठरणार नसल्याने शब्द सुमनांनी स्वागत करणं क्रमप्राप्त ठरतं ,पण आज आपण स्वागत गीता ऐवजी अहिल्याबाईच स्तृती घेणार आहोत . तरी मी त्यासाठी *श्री...........* यांना आमंत्रित करतो .

*स्तृती गीत :*

धन्य धन्य अहिल्याबाई ।
गेली कीर्ती करुनिया,
भूमंडळाचे ठायी।।
महाराज अहिल्याबाई ,पुण्यप्राणी ।
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्न खाणी ।।
संसार चालली दीनदुबळ्यांची आई ।
जेविल्या सर्व,मगच आपण अन्न खाई ।।
बांधिले घाट- मठ- पार । कुठे वनात पाणी गार ।।

(हे गीत किंवा दुसरे पण घेऊ शकता.)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
संपूर्ण सूत्रसंचालन वाचण्यासाठी खलील *"सूत्रसंचालन अँप"* डाऊनलोड करा !
https://play.google.com/store/apps/details?id=anchoring.andspeeches
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💐 *व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख :-*

आज आपले भाग्य म्हणून आपल्याला  *श्री...........* हे पाहुणे म्हणून लाभले आहेत म्हणून ....व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी *श्री...........* यांना आमंत्रित करतो.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
संपूर्ण सूत्रसंचालन वाचण्यासाठी खलील *"सूत्रसंचालन अँप"* डाऊनलोड करा !
https://play.google.com/store/apps/details?id=anchoring.andspeeches
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🏷 *निर्मिती :*
© *श्री. आशिष देशपांडे सर*
📲 9021481795
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments: