Friday, June 29, 2018

वार्षिक वेतनवाढ

*1 जुलै च्या वार्षिक वेतनवाढीवर बॊलु काही ...

*सन जुलै २०१४ पासुन शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढीची  परिगणना शालार्थ प्रणाली मध्ये होत असल्यामुळे शक्यतो वेतनवाढिच्या रकमेत चुका होत नसे. परंतु या वर्षी जुलै १८ च्या वार्षीक वेतनवाढीची परिगणना  off line कराव्या लागणार  अाहे. त्या मुळे वेतनवाढीची रक्कम १० च्या पटीत घेताना काही चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.*

*म्हणुन यावर्षीअापल्याला दिलेली वेतनवाढीची रक्कम बरोबर आहे की नाही याचा पडताळा करणे आवश्यक आहे.*

*कशी काढावी आपली वार्षिक वेतनवाढ...?*

*मुळवेतन+ग्रेड पे च्या ३%* *आलेली रक्कम आपली वेतनवाढिची रक्कम असेल.*

*परंतु ती रक्कम १० च्या पटीत करतांनाच चुक होते.*

*त्यासाठी खालील उदा.समजुन घेणे आवश्यक......*

*उदा. एखाद्या कर्मचा-याचे

मूळवेतन -8560/-

ग्रेड पे- 2800/-

एकुण - 11300/-

3 टक्के रक्कम - 340.80 पैसे.

वरील रक्कम १० च्या पटीत घेताना 8560+340 एकुण 8900/-
म्हणजे 8900+2800 एकुण. 11700 हे  वेतनवाढीनंतर होणारे वेतन.

*टिप..जर एखाद्याची वेतनवाढीची रक्कम 340.99 पैसे  जरी येत असेल तरी १० च्या पटीत करतांना ती फक्त 340 च धरावी लागेल.

परंतु  जर ती रक्कम 341 येत असेल तर १० च्या पटीत धरतांना ती 350 इतकी धरावी लागेल.*

*आयकर गणना करतांना अायकर  दहाच्या पटीत करण्याचे सुत्र येथे लागु होत नाही.*

*बरीच मंडळी आयकराचे सुत्र वेतनवाढीसाठी वापरतात.*

*आयकर रक्कम ३४४/- येत असेल तर ती दहाच्या पटित करतांना ३४०/- करावी लागते.*

*तसेच आयकर रक्कम ३४५ येत असेल तरच ३५० /- करावी लागते.*

* वेतनवाढीची परिगणना करतांना पुर्ण रुपयात रक्कम अाली तरच पुढच्या दहाच्या पटीत धरावी लागते.*

वरील उदा.त दर्शविल्या प्रमाणे .....

340.99 पैसे  आले तरी - 340 च

परंतु  जेव्हा पुर्ण 341 पुर्ण होतील तेव्हा मात्र 350 धरता येईल.

मग 341 पासुन 350.99
पैसे  अाले तरी 350/- धरावी लागेल.

*पुढे 351 आली तर मग 360/- या प्रमाणे.....!*

*मला वाटते वरील वेतनवाढ दहाच्या पटीत करण्याचे  विवेचन  आपल्याला कळले असेलच...!*

*.......धन्यवाद.....!*

No comments: