Tuesday, January 9, 2018

कृतीयुक्त गीते--

🌹🖊🕉🇮🇳: कृतीयुक्त गीते--

*१)एक फुगा अहा एक फुगा*

गंम्पू ने आणले साबणाचे फुगे - 2
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे - 2
एक फुगा अहा एक फुगा - 2

एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला
गंम्पूला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले ......

एक फुगा आजीच्या गालावर बसला
गंम्पूला तो लाडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....

एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंम्पूला तो चेंडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....

*संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद*
[🌹🖊🕉🇮🇳:

२)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर

औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
        गुरुजी छडी नका

शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी
आरसा त्याला उलटे करी
     गुरुजी छडी नका मारुजी


संकलक:तोटावाड एस
🌹🖊🕉🇮🇳:

३)उरात होतय धडधड
पाटी पूस्तक हातात आलि
अंगात भरलय वार
शाळेची घंटा झाली
अता अधिर झालोया
मग तयार झालोया
पाटि दप्तर घेवून शाळेत आलोया
वाचतय बूंगाट लिहतय झिंगाट
रंगात आलोया
वाचलय

झिंगझिंग झिंग झिंगाट

झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग

समद्या शाळेला झालि
माझ्या वाचनाचि घाई |२
कधि येणार हो बाई
माला आ ,म्हणजे आई
अता खेळून आलोया
लई वाचून आलोया
दूरून माळा वरून
तूमच्या शाळेत आलोया
ढिंच्याक जोरात
डिजिटल वर्गात
वाचाया आलोया
वाचलय
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग


अता उताविळ झालो
चित्र पाहून रंगलो
श्बद वाचून दंगलो
पट्य्या वाचून हसलो

अता तयार झालोया
तूमच्या वर्गात आलोया

लई खेळून वाचून या वर्गात आलूया

समद्या पोरात म्या लई जोरात वाचून आलोया

वाचल झिंग झिंग झिंगाट ......
...........,झिंग झिंग झिंग।।

🌹🖊🕉🇮🇳: *👩‍⚖👩

४)‍⚖सुंदरा👩‍⚖👩‍⚖*
➖➖➖➖➖➖➖
सुंदरा शाळेला येशील काय

मला शर्ट पण नाही
 मला स्कर्ट पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll 1ll

मला पुस्तक पण नाही
मला दप्तर पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll2ll

मला पेन पण नाही
मला पेंसिल पण नाही
मी कशी येऊ शाळेला ll 3ll

तुला शर्ट पण देईल
तुला स्कर्ट पण देईल
तुला पुस्तक पण देईल
तुला दप्तरपण देईल
तुला पेन पण देईल
तुला पेंसिल पण देईल

तु येणार का शाळेला
सुंदरा शाळेला येशील का

मी येणार शाळेला ॥



🌹🖊🕉🇮🇳:
" मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण" घेऊन उत्तम 'सुलभक' म्हणून तयार झालेल्या गुरुजींनी मुलांना शिकवल्यानंतर मुलांमध्ये आत्मविश्‍वास आला आणि...

*"वाचणार रे वाचणार 100% वाचणार"*

हे मुलाच्या बाबतीत साध्य झाल्यामुळे आत्मविश्वास आलेला मुलगा गुरुजींना म्हणतो
*"द्या हो गुरुजी पुस्तक,वाचून दाखवतो खडखडा"* .
 हा आत्मविश्वास मुलाच्या मनात निर्माण झालेला आहे आणि तो या '

 *प्रेरणा गीतातून*  गुरुजींना मुलगा सांगत आहे.

       ५) *प्रेरणा गीत*

*द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून*
*दाखवतो खडखडा*

कागद फाडून चेंडू केले,
वास,रंग,चव ओळखू आले
ध्वनी डबीतील चुकलो नाही
वर्णन, गप्पा, संवाद झाले
अशा 'गुरु'ची वाट झाडतो
हाती घेऊन फडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥१॥

पूर्वी वाचन चुकत होतो,
काना मात्रा हुकत होतो
गुरुजींच्याही 'शाब्बास'किला
नेहमी नेहमी मुकत होतो
कृती करुनी हुशार झालो
भरलाय ज्ञानाचा घडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥2॥

गप्पा,गोष्टी,गाणी,कोडी
साम्य-भेद चित्रांची गाडी
बसल्या बसल्या जोडू शकतो
समान अक्षरांची जोडी
'व' चे शब्द सांगू का मी?
लिहा फळ्यावर 'वडा'
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥३॥

'वाचन पाठ' मी वाचू शकतो
गाणी म्हणत नाचू शकतो
वाचन धेयापर्यंत आता,
न थांबता मी पोहचू शकतो
येऊ द्या साहेब,घेऊ द्या पुस्तक,
देऊ द्या कुठलाही धडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥४॥

🌹🖊🕉🇮🇳:
६)*शरीराची ओळख*

ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
मान वाकडी करा
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

हात पुढे करा
अंगठा आत घ्या
कोपरे दाखवा
मान वाकडी करा
गुडघ्यात वाका
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या

*संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद*
🌹🖊🕉🇮🇳:

७) वाचनगीत

एकच ध्यास वाचन विकास
की शंभर टक्के आता वाचणार ।।

 कागद तूम्ही फाडा नि जिबल्याही खेळा
कोलांटी उठल्या नि टायरही खेळा
तूम्हा कूणी नाही रोखणार
की शंभर टक्के आता वाचणार।।


उशीरा सुचली पण बाई छान युक्ती
नेहमीसारखी अभ्यासाची नाही हो सक्ती
आता रोज आम्ही शाळेत येणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

घरी जे खेळ तेच शाळेतही
 आले
गुपचूप बसणारे मुलंही बोलके झाले
चित्रावरून गोष्ट सांगणार।।
की शंभर टक्के आता वाचणार

अंकांची गाडी नि शब्दांचा डोंगर
चित्रगप्पा ,नाटुकली मज्जा कित्ती येणार
त्यातुनच आता शिकणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

शाळा आणि घर आता सारखेच वाटे
बाई गुरुजींशी वाटे बदललेत नाते
आत्मविश्वास आता वाढणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

शाळा आता पुर्वीसारखी अजिबात नाही
माझ्यासाठी तिथे आता आहे खूप काही
प्रेम आणि माझा सन्मान ।।
की शंभर टक्के आता वाचणार

आजवर जे आमच्यासाठी होतं मोठं कोडं
वाचन विकास कार्यक्रम ने
सारं केलं  सोप्पं ।।
वाटे किती मानावे आभार।।
की शंभर टक्के आता वाचणार

एकच ध्यास वाचन विकास
की शंभर टक्के आता वाचणार.


कवयित्री-विद्या बनाफर /बैस
जि प शाळा शिवणी
अकोला,विदर्भ
🌹🖊🕉🇮🇳: *🌴

    ८)शब्द वाढविण्याचे गाणे🌴*

*🌴🌴एक होता डोंगर...🌴🌴*

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.....*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडंं...अंड्यात पिल्लू...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंड...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...दाणा झाला चूर्रर्र...चिमणी उडाली भूर्रर्र....हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला..........*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

🌹🖊🕉🇮🇳:

९)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर

औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
        गुरुजी छडी नका

शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी
आरसा त्याला उलटे करी
  गुरुजी छडी नका मारुजी...

🌹🖊🕉🇮🇳:

१०)*अंगनात माझ्या मोरियो आला..*

अंगनात माझ्या मोरियो आला-२
मोर म्हणून बोलावितो..2
मोरियो घुंगरू वजवितो...2
हातातले कंगन दे मला आई
कंगन म्हणून बोलावितो
मोरियो....।।1।।
नाकातली नथनी दे मला आई
नथनी म्हणून बोलावितो
मोरियो...।।2।।
पायातली पैंजन दे मला आई
पैंजन म्हणून बोलावितो
मोरियो...।।3।।
कानातली बुगड़ी दे मला आई
बुगड़ी म्हणून बोलावितो
मोरियो...।।4।।
मोरियो घुंगरू वजवितो.....


११)पोर तुनी शाळा मा*

पोर तुनी शाळा मा धाड़ रे दादा
पोर तुनी शाळा मा धाड़...2
भाषा विषय ना तास भी शे ना..2
क ख ग घ शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी....।।1।।
गणित विषय ना तास भी शे ना-२
एक दोन तीन चार शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी...।।2।
इंग्लिश विषय ना तास भी शे ना-
A B C D शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी...।।3।।
कला विषय ना तास भी शे ना-२
गाना नि गोष्टी शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी ...।।4।।


 १२)गंपुने केले साबनाचे फुगे*

गंपुने केले साबनाचे फुगे
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे
एक फुगा अहा एक फुगा -2
एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला
गंपुला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।1।।
एक फुगा आजीच्या हातावर बसला
गंपुला तो लाडुच वाटला
एक फुगा अहा एक फुगा  -।।2।।
एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंपुला तो मोतीच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।3।।
एक फुगा आईच्या गालावर बसला
गंपुला तो पापाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।4।।


[१३)गुरूजी छड़ी नका मारु*

गुरूजी छड़ी नका मारु जी नि   लगाते हातावारी-२
शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरूजी
गुरूजी छड़ी....।।1।।
आवंदाच ग वारिस बाई मी
सहाव गाठलं ग
शिकन्यासाठी पहिलं पाऊल
शाळेत मी टाकलं ग
येतंय रडू मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
गुरूजी छड़ी.....।।2।।
शब्द वाचता वाचता माझी
मान दुखू लागलीं ग
अंक लिहिता लिहिता माझी
बोटं दुखू लागलीं ग
उलटे अक्षर काढले जरी
अरसा त्याला सुलटे करी    गुरूजी छड़ी....।।3।।

🌹🖊🕉🇮🇳:

१४)*झिंगाट reading song*

उरात होतय धड़धड़
पाटी पुस्तक हातात आली
अंगात भरलय वारं
अन शाळेची घंटा झाली
आता अधीर झालोया
 मग तायार झालोया
पाटी दप्तर घेऊन तुमच्या
शाळेत आलोय
वाचतंय गूँगाट लिहितय झिंगाट
रंगात आलोया झालंय
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
संद्या शाळेला झालिय
माझ्या वाचनाची घाई
कधी येणार हो बाईं मला
आई चा अ आ ई
आता खेळुन आलोया
लई वाचून आलोया
ढिंगच्याक जोरात डिजिटल वर्गात
शिकायला आलोया झालं
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
बाई उताविळ झालो
चित्र पाहुन दंगलो
शब्द वाचून दंगलों
पट्टया वाचून हसलो
आता तयार झालोया
तुमच्या वर्गात आलोया
लई खेळून वाचून वर्गामध्ये
पहिला आलोया
संद्या पोरात म्या लई जोरात
रंगात आलोया झाल
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट

🌹🖊🕉🇮🇳:

*१५)शाळा मा चाल मना नातुबा*

शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
तू पाटी नि पुस्तक भर
धर दप्तर खांदावर
चाल शाळा ना रस्ता धर
तुनी शाळा शे रस्त्यावर ।।1।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
तू वाचन शिकी ले रं
थोडं लेखन शिकी ले रं
तू गणित शिकना जर
पुढे जाईन आपलं घर ।।2।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
थोड़ सोताना करता कर
थोड़ समाज ना करता कर
जो शिक्षण लेस खरं
त्यानं जीवन शे सुंदर ।।3।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा
शाळा मा चाल मना....
              *स्वयंरचित*
🌹🖊🕉🇮🇳:

१६)नको ताई रुसू, कोपर्‍यात बसू,
येउ दे ग गालात खुदकन हसू |

इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग,
देऊ काय तुला हवे ते ग माग,
नवरा हवा का लठ्ठ हवी सासू ?

बाहुलीच्या लग्‍नाचा खेळ गडे खेळू,
लग्‍नात बुंदीचे लाडू आता वळू,
नवीन कपड्यात छान छान दिसू |

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट,
केशरीभात केला आहे मोठा थाट,
ओठात आले बाई लडिवाळ हसू |

🌹🖊🕉🇮🇳:

१७)किलबिल किलबिल पक्षी बोलती,
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती |
पानोपानीं फुलें बहरती,
फूलपाखरें वर भिरभिरती |
स्वप्‍नीं आले काही,
एक मी गाव पाहिला बाई |

त्या गावाची गंमत न्यारी,
तिथे नांदती मुलेच सारी |
कुणी न मोठे, कुणी धाकटे,
कुणी न बसते तिथे एकटे |
सारे हसती, गाती नाचती,
कोणी रडके नाही |

नाही पुस्तक, नाही शाळा,
हवे तेवढे खुशाल खेळा |
उडो बागडो, पडो, धडपडो,
लागत कोणा नाही |

तिथल्या वेली गाणी गाती,
पर्‍या हासर्‍या येती जाती |
झाडांवरती चेंडु लटकती,
शेतांमधुनी बॅटी |
म्हणाल ते ते सारे होते,
उणे न कोठे काही
🌹🖊🕉:

१८)सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
🌹🖊🕉🇮🇳:

१९)रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु
आमच्यासंगे बोला आता ढिश्यू ढिश्यू ढिश्यू
हाहा..... ही ही....... हो हो

आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं तोंडाला सुटेल पाणी

आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला ?
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?

गाल गोबरे गोरे गोरे लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

बावन पत्ते बांधु वाडा शर्यत खेळू घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

चिमणी खाई मोती-दाणे गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?
🌹🖊🕉🇮🇳:

२०)चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?

निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी.

आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?

आता तरी परतुनी जाशील का?
दूध न्‌ शेवया खाशील का?

आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल.

असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला.

हाकेला 'ओ' माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
🌹🖊🕉🇮🇳:

२१) ल ल्ला लला ललला ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे ?  पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ?  मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्याइवल्या घरट्यात चिमणाचिमणी राहातात
चिमणा चिमणी अन्‌ भवती चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीनें घास द्यावा पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे हासते छ्प्पर भिंती दारे !
🌹🖊🕉🇮🇳:

२२)अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ.

थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार.

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम.

वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी.

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार.

डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव.
🌹🖊🕉🇮🇳:

२३)नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरलीं रे
पावसांत न्हाऊं काहीतरी गाऊं
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यांत नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझीमाझी जोडी जमली रे
आभाळांत छान छान सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
🌹🖊🕉🇮🇳:

२४)येरे येरे पावसा
तुला देतो पैसा.

पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा.

ये ग ये ग सरी
माझे मडके भरी.

सर आली धावून
मडके गेले वाहून.
🌹🖊🕉🇮🇳:

२५)ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा..
🌹🖊🕉🇮🇳:

२६)अ आ आई म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ थ थ थवा
बाळ जरि खट्याळ तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई.
🌹🖊🕉🇮🇳:

२७) गाडी आली गाडी आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंट वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाहि ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

🌹🖊🕉🇮🇳

२८)ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे.

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे.

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे.

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाट्टेल्‌ ते होऊ दे.
🌹🖊🕉🇮🇳:

२९)राजा राणीची नको काऊ माऊची नको
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ आता झाली माझी झोपेची

राम हसायचा कसा राम रडायचा कसा
आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा
समजूत कोणी घातली त्या वेड्याची ?

राम काळा का गोरा दिसत होता का बरा
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा
आवड होती का ग त्याला खेळाची ?

राम गेला का वनी त्याला धाडीला कुणी
भीती नाही त्याच्या कशी आली ग मनी
सोबत तिथे त्याला होती का कोणाची
🌹🖊🕉🇮🇳:

३०)छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
'मोर्‍या मूर्खा !' 'गोप्या गद्ध्या !' देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा पुसती गिरवा बघु नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌
🌹🖊🕉🇮🇳:

३१)गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍यागोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !

🌹🖊🕉🇮🇳:

३२) झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

🌹🖊🕉🇮🇳:

३३)असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार.

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
'हॅलो हॅलो !' करायला छोटासा फोन.

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल.

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो.

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला.

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

🌹🖊🕉🇮🇳:

३४)ससेभाऊ ससेभाऊ
चार उडया मारा पाहू
कश्या  कश्या कश्या?
अश्या अश्या अश्या

अहो  अहो हत्ती
डुलडुलता  किती

कसे कसे कसे?
असे असे असे!

अहो अहो गाढवदादा
जरा तुमचा सुर काढा
कसा कसा कसा
असा असा असा


होँ... हो... होँ

🌹🖊🕉🇮🇳:

३५)लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरविते
टूक टूक ही बघते

नकटे नाक उडविते
गुबरे गाल फुगविते
दात कधी घाशिना
अंग कधी धुविना

इवले घरकुल मांडते
मांडता मांडता सांडविते
पोळ्या केल्या करपून गेल्या
भात केला कच्चा झाला
वरण केल पात्तळ झाल
तूप सगळ सांडून गेल

केळ्याच शिकरण करायला गेली
पडली खुर्चीतच
आडाच पाणी काढायला गेली
धपकन पडली आत

🌹🖊🕉🇮🇳:

३६)फिरायला गेला बोकड
धावत आले माकड

दोघे गेले हॉटेलात
बसून खाला मटारभात

मालक म्हणतो द्या पैसे
दोघांनी मिळून दिले ठोसे

माकडाने मारली उडी
पटकन पळवली सुपारीची पुडी

दोघे गेले सुपारी खात
मालक बसला चोळत हात.

🌹🖊🕉🇮🇳:

३७)काव काव काव काव कावळा म्हणाला
सोनुच्या घरी आला
चिव चिव चिव चिव चिमणी म्हणाली
सोनुच्या घरी आली
भू भू भू भू कुत्रा म्हणाला
सोनुच्या घरी आला
म्याव म्याव म्याव म्याव मांजर म्हणाली
सोनुच्या घरी आली
मिठू मिठू मिठू मिठू पोपट म्हणाला
सोनुच्या घरी आला
कुहू कुहू कुहू कुहू कोकिला म्हणाली
सोनुच्या घरी आली
डराव डराव डराव डराव बेडूक म्हणाला
सोनुच्या घरी आला
कुँक्क कुँक्क कुँक्क कुँक्क बदक म्हणाले
सोनुच्या घरी आले


🌹🖊🕉🇮🇳:

३८)सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तर्‍हेतर्‍हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई, थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता पण रे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणूस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावुनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्‍नाला !
आवडती रे वडिल मला !

👉    📱📕✏📚
*सुंदरा या गीताचे बोलीभाषा
(पावरी) अनुवादंन*
●●●●●●●●●●●●●●●●●●●●

३९) बबली शाळा मा चाल तू ..!2!

तह पाटी आप ,तह पुस्तक आप
तह पेन आप ,तह वही आप...
तू शाळा मा काह नि आवतली...
बबली शाळा मा चाल तू....!!2!!

तह फरक आप ,तह डगल आप
तह दफतर आप,तह पैयहा आप
तू शाळा मा काह नि आवतली..
बबली शाळा मा चाल तू.....!!2!!

तह कुदरी आप ,तह बिस्कीट आप
तह सहलीक लिजाम, तह किल्ला देखाड
तू शाळा मा काह नि आवतली ...
बबली शाळा मा चाल तू..!!2!!

मास्तर मी शाळा मा आविही ...
मेहेक पाटी बी आप,मेहेक पुस्तक बी आप
मेहेक पेन बी आप,मेहेक पेन्सिल बी आप
मेहेक फरक बी आप, मेहेक डगल बी आप
मेहक दफतर बी आप,मेहेक पैसा बी आप
मेहक कुदरी बी आप, मेहक बिस्कीट बी आप
मास्तर मी शाळा मा आविही..!!2!!


🌹🖊🕉🇮🇳:
ही गाणी कालबाह्य होऊ नयेत म्हणून सागळ्यांसाठी उपलब्ध करूँ देण्याचा प्रयत्न केला.
🌹🖊🕉🇮🇳:

👆🏻🌹🖊संकलन-श्री.याॆगॆंद्रसिंह शिवाजी पाटील प्राथामिक उपशिक्षक
(M.A.B.ed..)
🕉🇮🇳: जि.प.शाळा,हिसपूर ता.शिंदखेडा जि.धुळे...

No comments: