🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*अठ्ठेचाळिसावा◀*
*स्वर जोड्यांचे उच्चार*
👉इंग्रजीतील शब्दांमध्ये जवळ जवळ २१ प्रकारच्या स्वर जोड्या आहेत.
आपणास त्या स्वर जोड्यांचे उच्चार इंग्रजी विषयाचे वाचन शिकविताना माहित असणे आवश्यक आहे.
👉म्हणुनच आज आपण इंग्रजीतील *स्वर जोड्या व त्यांचे उच्चार* याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यांचे शब्द आपण उद्यापासुन शिकणार आहोत.
👉आजची ही माहिती विद्यार्थ्यांना वर्गात दिसेल अशा ठिकाणी लिहुन ठेवल्यास विद्यार्थ्यांना त्याचा इंग्रजी वाचनात नक्कीच फायदा होईल.
*स्वर जोड्या व त्यांचे उच्चार*
१)ai-ए हा प्रमुख उच्चार तसेच एअ,अ,इ असे ही उच्चार होतात.
उदा.main
२)ae- इ हा प्रमुख उच्चार तसेच एअ असा ही उच्चार होतो.
उदा.aeroplane
३)au- आॅ हा प्रमुख उच्चार होतो.
उदा.fraud
४)aw- आॅ हा प्रमुख उच्चार होतो.
उदा.dawn
५)ay- ए हा प्रमुख उच्चार होतो.
उदा.spray
६)ea-ई व ए हा प्रमुख उच्चार होतात.
उदा.beak
७)ee- ई हा प्रमुख उच्चार व ee नंतर लगेच r आल्यास इअ असा ही उच्चार होतो.
उदा.cheek . deer
८)eu- यू हा प्रमुख उच्चार होतो.
उदा. feud
९)ew- यू व ऊ असे प्रमुख उच्चार होतात.
उदा.flew
१०)ey- इ व ए असे प्रमुख उच्चार होतात.
उदा.monkey
११)ei- इ ,ए, आइ असे ही उच्चार होतात.
उदा.receive
१२)ie- इ व आइ हे प्रमुख उच्चार होतात.
उदा.brief
१३)oa- ओ हा प्रमुख उच्चार होतो. तसेच शब्दामध्ये oar असताना oa चा उच्चार आॅ होतो.
उदा.boat
१४)oe- ओ हा प्रमुख उच्चार होतो तसेच ऊ असा ही उच्चार होतो.
उदा. toe
१५)oi- आॅइ हा प्रमुख उच्चार होतो.
उदा. boil
१६)oo- उ हा प्रमुख उच्चार तसेच अ असा ही उच्चार होतो.
उदा.book
१७)ou- आउ हा प्रमुख उच्चार तसेच अ,आॅ असे ही उच्चार होतात.
उदा.ground
१८)ow- आउ व ओ हे प्रमुख उच्चार होतात.
उदा.brown
१९)oy- आॅइ हा प्रमुख उच्चार तसेच होतो.
उदा. alloy
२०)ui- उ हा प्रमुख उच्चार होतो.
उदा.fruit
२१)ue-उ हा प्रमुख उच्चार होतो.
उदा.blue
🐊
*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल स्वर जोड्या व त्यांचे उच्चार पाच वेळा लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment