Thursday, February 22, 2018

इंग्रजी वाचन

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*एक्कावन्नावा◀*
       
*स्वर जोडींचे उच्चार*

       *ea चा उच्चार ए*

👉आज आपण       *ea चा उच्चार ए*  असणारे शब्द शिकणार आहोत.

👉ea चा प्रमुख उच्चार ई व ए असा होतो.

👉ea या स्वर जोडीनंतर r आल्यास ea चा उच्चार इअ, एअ, अ असा होतो.

👉आज ea चा उच्चार ए असणारे शब्द शिकणार आहोत.

👉 आजचे शब्द
1)dead       11)leaven   
2)deaf        12)spread    
3)bread       13)steady  
4)death    14)weapon 
5)dread       15)zealot 
6)realm     16)feather   
7)break     17)instead 
8)steak     18)jealous    
9)behead   19)peasant    
10)breast   20)pleasant  

21)pleasure

22)treasure
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  break या शब्दामध्ये brea चा एक k चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
break मध्ये breaचा उच्चार ब्रे व k  चा उच्चार  क म्हणजे ब्रेक



    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  pleasure -  प्लेझर
      
        *🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: