Sunday, February 4, 2018

🌷 🌷🌷🌷🌷🌷
    *६० दिवसांत इंग्रजी वाचन*
    🌷🌷🌷🌷🌷🌷
    ▶ *दिवस-*
*एकोणचाळिसावा◀*
        
       *oचा उच्चार ओ*

👉आजपासुन आपण o चा उच्चार ओ असणारे शब्द शिकणार आहोत.

१)व्यंजनानंतर o हा स्वर नंतर व्यंजनानंतर e हा स्वर आल्यास बय्राच शब्दात  *oचा उच्चार ओ* होतो तर e चा उच्चार अ होतो.

२) o या स्वरानंतर ld ही व्यंजन जोडी आल्यास *oचा उच्चार ओ* होतो

३) ow शब्दाच्या शेवटी आल्यास बय्राच शब्दात *ow चा उच्चार ओ* होतो

👉 आजचे शब्द
1)no       11)sow       21)dose
2)oh      12)toe        22)doze
3)ok      13)also      23)flow
4)so      14)boat      24)fold
5)ago    15)bone      25)glow
6)bow    16)both       26)goat
7)low     17)coat       27)gold
8)old      18)cold       28)grow
9)own   19)comb      29)hold
10)row  20)crow      30)hole

👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.

👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.

उदा.  bone या शब्दामध्ये bo चा एक व ne चा दुसरा गट तयार होतो.

👉 *गटाचे उच्चार*
bone  मध्ये bo चा बो ne चा न  म्हणजे बोन

    

👉 *मराठी उच्चार*

वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.

उदा.  glow  - ग्लो
        *🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
  1)  वरिल प्रत्येक शब्द पाच  वेळा लिहा.

  2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.

वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.

      *रविंद्र भगवान गावडे*
            *उपशिक्षक*
       *जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
       *ता. माळशिरस, जि. सोलापुर*
        *9503999355*

No comments: