🌷 🌷🌷🌷🌷🌷
*६० दिवसांत इंग्रजी वाचन*
🌷🌷🌷🌷🌷🌷
▶ *दिवस-*
*ञेपन्नावा◀*
♦🍁 *या उपक्रमाचे पुस्तक हवे असल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा.* 🍁♦
*स्वर जोडींचे उच्चार*
*ee चा उच्चार इ व इअ*
👉आज आपण *ee चा उच्चार इ व इअ*असणारे शब्द शिकणार आहोत.
👉दोन व्यंजनांमध्ये ee ही स्वर जोडी आल्यास तिचा उच्चार इ असा होतो.
👉ee या स्वर जोडीनंतर r आल्यास ee चा उच्चार इअ असा होतो.
👉 आजचे शब्द
1)bee 11)weep 21)preen
2)fee 12)beer 22)green
3)beef 13)jeer 23)street
4)feed 14)leer 24)coffee
5)feel 15)bleed 25)toffee
6)glee 16)cheek 26)breeze
7)heed 17)creed 27)sneeze
8)jeep 18)creep 28)steeple
9)keel 19)creek 29)career
10)meek 20)breed 30)engineer
👉 फळ्यावर वरील एकेक शब्द लिहून एकेका विद्यार्थ्याकडून त्याचे वाचन करून घ्यावे.
👉 *शब्दांचे गट*
यामध्ये विद्यार्थ्यांना शब्दांचे गट करायला शिकवावे. प्रत्येक गटाखाली रेष ओढावी.
उदा. career या शब्दामध्ये ca चा एक ree चा दुसरा व r तिसरा गट तयार होतो.
👉 *गटाचे उच्चार*
career मध्ये ca चा उच्चार क व ree चा उच्चार रिअ (ee या स्वर जोडीनंतर r आल्यास ee चा उच्चार इअ होतो) व r चा उच्चार र म्हणजे करिअर
👉 *मराठी उच्चार*
वरील प्रत्येक शब्दाचे मराठीत उच्चार विद्यार्थ्यांना लिहायला शिकवावे. विद्यार्थ्यांनी शब्दांचे मराठीत उच्चार तयार केल्यास ते त्यांच्या कायम स्मरणात राहतात.
उदा. green - ग्रिन
*🖋🖋आजचा स्वाध्याय* 🖋🖋
1) वरिल प्रत्येक शब्द पाच वेळा लिहा.
2)वरील शब्दांचे उच्चार मराठीत लिहा.
वरील पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा . जर काही शंका असेल तसेच सुचना / मार्गदर्शन असेल तर आवश्य कळवा.
*रविंद्र भगवान गावडे*
*उपशिक्षक*
*जि. प. प्रा. शाळा, गुरसाळे*
*ता. माळशिरस, जि. सोलापुर*
*9503999355*
No comments:
Post a Comment